mrityunjaymahanews
अन्यठळक बातम्या

सातच्या बातम्या

 

 

आजरा साखर कारखान्यात इच्छुकांची मांदियाळी

                    ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         आजरा साखर कारखान्याच्या अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १५३ इच्छुकांनी १७८ इतके अर्ज दाखल केले असून दाखल अर्जांची संख्या पाहता निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        एकीकडे बिनविरोधची चर्चा सुरू असताना दुसरीकडे इच्छुकानी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने स्थानिक नेत्यांचे जिल्हा पातळीवरील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे बिनविरोध ची शक्यता बऱ्यापैकी मावळत चाललेली आहे

गट क्र. एक – उत्तूर मडिलगे गट

१)संजय शेणगावे

२)प्रकाश चव्हाण

३)दिपक देसाई

४)मारूती घोरपडे

५)शिरीष देसाई

६)भिकू गुरव

७)सदानंद पाटील

८)पांडुरंग दिवटे

९)धोंडीराम सावंत

१०)निवृत्ती पाटील

११)उमेश आपटे

१२)संजय उत्तूरकर

१३)वसंतराव धुरे

१४)शंकर आजगेकर

गट क्र. दोन – आजरा श्रृंगारवाडी गट

१)युवराज पोवार

२)दिगंबर देसाई

३)अशोक चराटी

४)गणपतराव देसाई

५)जयवंत शिंपी

६)विलास नाईक

७)राजाराम होलम

८)विजय देसाई

९)राजाराम होलम

१०)संभाजी पाटील

११)शिवाजी नांदवडेकर

१२)सुभाष देसाई

१३)सुभाष देसाई

१४)अभिषेक शिंपी

१५)प्रकाश बुगडे

१६)महादेव होडगे

१७)तुळसाप्पा पोवार

१८)विश्वास गाईंगडे

१८)बाबुराव नार्वेकर

२०)आबुताहेर तकिलदार

२१)रशीद पठाण

२२)शिवाजी नांदवडेकर

२३)अशोक चराटी

२४)मुकुंद देसाई

गट क्र. तीन – पेरणोली गवसे गट

१)उदयसिंह पवार

२)सहदेव नेगवे

३)दशरथ अमृते

४)सदाशिव डेळेकर

५)गोविंद पाटील

६)मुकुंद तानवडे

७)अजिंक्य तानवडे

८)रामचंद्र पाटील

९)जोतिबा चाळके

१०)रणजित देसाई

११)अजिंक्य तानवडे

१२)प्रकाश पाटील

१३)राजेंद्र सावंत

१४)शिवाजी पाटील

१५)सर्जेराव देसाई

१६)सर्जेराव देसाई

१७)इंद्रजित देसाई

१८)शांताराम पाटील

१९)शामराव बोलके

२०)तुकाराम गावडे

२१)सुधीर देसाई

२२)बाबासाहेब पाटील

२३)किरण तानवडे

२४)दौलती पाटील

२५)दशरथ अमृते

२६)रणजित देसाई

२७)लहू पाटील

२८)प्रकाश पाटील

२९)शिवाजी पाटील

३०)इंद्रजीत देसाई

गट क्र. चार – भादवण गजरगाव गट

१)मधुकर देसाई

२)संजय पाटील

३)सुधीरकुमार पाटील

४)राजेंद्र मुरूकटे

५)मनोहर पाटील

६)शिवाजी कुराडे

७)आनंदा कुलकर्णी

८)भिवा जाधव

९)आनंदा जोशिलकर

१०)गोपाळ केसरकर

११)राजेश जोशीलकर

१२)अंजना रेडेकर

१३)बाळकृष्ण चव्हाण

१४)बाबासाहेब देसाई

१५)मधुकर देसाई

१६)अंजना रेडेकर

१७)अनिरूध्द रेडेकर

१८)मनोहर जगदाळे

१९)संभाजी सरदेसाई

२०)राजाराम पाटील

२१)संजय पाटील

२२)आनंदा पाटील

२३)आनंदा कुलकर्णी

२४)संजय पाटील

२५)बाजीराव पाटील

गट क्र. पाच – हात्तिवडे मलिग्रे गट

१)आनंदराव बुगडे

२)विष्णू केसरकर(२ अर्ज)

४)शंकर उगाडे

५)सदाशिव माणगांवकर

६)संभाजी पाटील

७)अनिल फडके

८)शिवाजी लाड

९)तानाजी राजाराम

०)सुरेश सावंत

११)गोविंद नारळकर

१२)सुर्यकांत रेडेकर

१३)रामचंद्र पाटील

१४)राजाराम जाधव

१५)पांडुरंग हरेर

१६)पांडुरंग हरेर

१७)सुनिल शिंत्रे (२ अर्ज)

२८)सुरेश सावंत

१९)रमेश बुगडे

ब वर्ग बिगर उत्पादक सभासद गट

१)नामदेव नार्वेकर

२)नौशाद बुडेखान

३)संतोष भादवणकर

४)अशोक तर्डेकर

५)नामदेव नार्वेकर

६)उदयराज पवार

७)जनार्दन टोपले

८)रामचंद्र पाटील

९)अनिरूध्द रेडेकर

१०)अशोक तर्डेकर

११)सुनिल शिंत्रें

१२)जयवंत शिंपी

अनुसुचित जाती-जमाती प्रतिनिधी गट

१)मलिककुमार बुरूड

२)अशोक कांबळे

३)दिनेश कांबळे

४(गोविंद जाधव

५)मलिककुमार बुरूड

६)किरण कांबळे

७)हरी कांबळे

८)भाऊसो कांबळे

९)शिवाजी कांबळे

१०)शशिकांत सावंत

११)तानाजी दावणे

१२)अशोक कांबळे

महिला प्रतिनिधी गट

१)सुनिता रेडेकर

२)सुजाता पाटील

३)रचना होलम(२ अर्ज)

४)संगीता माडभगत

५)रचना होलम

६)रेखा राजाराम

७)सुमित्रा देसाई

८)चेतना देसाई

९)श्रध्दा शिंत्रे

१०)मनिषा देसाई

११)सुमन डेळेकर

१२)सुमन पोतनीस

१३)अंजना रेडेकर

१४)सुनिता रेडेकर

५१५गिता वांगणेकर

१६)राजश्री पवार

१७)वृषाली कोंडूसकर

इतर मागास प्रतिनिधी गट

१)जनार्दन टोपले

२)गोविंद पाटील

३)रामचंद्र पाटील

४)राजेंद्र मुरूकटे

५)अभिषेक शिंपी

६)अबुताहेर तकिलदार

७)काशिनाथ तेली

८)जनार्दन टोपले

९)रशिद पठाण

१०)रियाज तकिलदार

११)नौशाद बुडेखान

१२)गिरीधर कुराडे

१३)नामदेव नार्वेकर

१४)विजय गुरव

१५)मधुकर येलगार

१६)बाबु येडगे

१७)बाजीराव पाटील

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

१)कल्लाप्पा नाईक

२)संभाजी पाटील

३)कल्लाप्पा नाईक

४)मालुबाई गवळी

५)बयाजी मिसाळ

६)बाबू येडगे

७)विकास बागडी

संस्थापक अध्यक्षांच्या कन्या दूरच…

आजरा साखर कारखान्याच्या यावेळी निवडणुकीकरिता संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांच्या कन्या सौ. सरोज सरनाईक व सौ. मंजुषा इंगवले यांनी एकमेव पत्रकार बैठकीला हजेरी लावून अप्रत्यक्षरीत्या संचालक मंडळात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु कारखान्याची एकंदरीत परिस्थिती पाहता या मंडळींनी उमेदवारी पासून दूर राहणे पसंत केले आहे.

केवळ तीन संचालक रिंगणाबाहेर…

निवडणुकीकरता आपण इच्छुक नाही असे म्हणणाऱ्या बहुतांशी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आनंदा कांबळे,लक्ष्मण गुडुळकर व सौ. विजयमाला देसाई वगळता अन्य सर्व विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

थांबवायचे कोणाला…?

कारखाना आर्थिक अडचणीत आहे याची जाणीव असून सुद्धा प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता थांबवायचे कुणाला ?  हा प्रश्न मात्र आघाडी प्रमुखांना सतावू लागला आहे.

दिवाळी बाजार गेला खड्ड्यात…?

                 ◼️आजरा:प्रतिनिधी◼️

          आजरा येथील संभाजी चौकामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे काल दिवाळी बाजारासाठी आलेल्या तालुका वासीयांना या भागातून जाताना अक्षरशः कसरत करावी लागलीच पण हा प्रकार पाहून बाजार गेला खड्ड्यात… अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

           मोठ्या हौसेने नगरपंचायतीने गाजावाजा करत संभाजी चौकासह बाजारपेठेमध्ये मोठा पाऊस झाल्यास वारंवार निर्माण होणारी तळ्याचे स्वरूप लक्षात घेऊन पाणी निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाकून गटर्स बांधण्याचा निर्णय घेतला.

            लाखो रुपये खर्चून या निर्णयाची
अंमलबजावणी केली. प्रत्यक्षात मात्र पावसाळ्यात येथे तळ्याचे स्वरूप प्राप्त होताना दिसले.गेले दोन दिवस येथे नळ पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या गळतीमुळे भल्या मोठ्या ख खड्ड्यामध्ये पाणी साठले असल्याने व या खड्ड्यातून लहान मोठ्या गाड्या जात असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरीस भर म्हणून दुसऱ्या बाजूला याच गटरवर घालण्यात आलेले लोखंडी झाकणही बाद झाल्याने या झाकणावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

        परिणामी काल आठवडा बाजार दिवशी दिवसभर वारंवार या चौकात वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती रस्त्याचे वाटोळे तर झालेच आहे पण किमान शहरातील असे मोठे खड्डे तरी बुजवावेत जेणेकरून शहरवासींच्या डोक्याचा ताप कमी होईल अशी आशा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

भाजपाला रोखण्यासाठी दिवाळीनंतर बैठक

                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         दिवाळी नंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर लोकमोर्चा २०२४ सोबत तातडीने बैठक घेण्याचा निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत घेण्यात आला.

         यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, वाहरू सोनवणे,’ हिंदी है हम हिंदोस्ता ‘ चे हुमायून मुरसल, सतिश लोंढे, सत्यशोधकचे किशोर जाधव, बहुजन सत्यशोधकचे सचिन बगाडे यांच्यासह लोकमर्चा २०२४ चे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.

         याबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि लोकमोर्चा २०२४ मधील पक्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हावार संयुक्त बैठका व मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार, धुळे इत्यादी जिल्ह्यात पुढील महिण्यात या बैठका व मेळावे घेण्याचे नियोजन करण्याचे ठरले.

         भाजप विरोधी मतांची एकजूट करणे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांचा पराभव करणे यासाठी ही बैठक होती.

निधन वार्ता

 दिगंबर तेजम

दर्डेवाडी ता. आजरा येथील दिगंबर पांडुरंग तेजम( वय ५४) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार असून ते रेशीम उद्योग केंद्रामध्ये कामाला होते.

 

संबंधित पोस्ट

News

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकरांमध्ये उत्सुकता

mrityunjay mahanews

BREAKING …

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!