mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार दि. २२ मार्च २०२६

पतीला माझी काळजी नाही…?
पत्नीची आत्महत्या


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पती आपणाला वेळ देत नाही, पतीला आपली काळजी नाही. साधे आधार कार्ड देखील बदलता येत नाही अशा किरकोळ कारणावरून रागाच्या भरात पत्नीने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरीवडे ता. आजरा येथे घडली. संगीता हेमंत पाटील ( वय ३१ वर्षे ) असे मृत पत्नीचे नाव आहे. सदर घटना शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी घडली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

सूर्य घर योजनेसह मुख्यमंत्री बळीराजा योजना प्रभावीपणे राबवणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत २५ कोटींचे पाणंद रस्ते तयार करण्याबरोबरच व सूर्य घर योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.भादवण ता. आजरा आयोजित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवार व आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष अनिल फडके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

भाषणातून मतदार बंधूंचे आभार मानले. उमेदवारांना विकासासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान केले कागल मतदार संघाला नवीन १४ गावे जोडलेले आहेत त्यांची धुरा जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्यावर सोपवली आहे, दर शुक्रवारी प्रत्येक गावातील प्राथमिक शाळेचे स्वरूप, पिण्याचे पाण्याचे प्रश्न आरोग्य विषयक प्रश्न, याविषयी सभापती व उपसभापती आपल्या दारी ही संकल्पना शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत राबविण्यात यावी अशा सूचना केल्या ‌ सूर्य घर योजनेद्वारे आपल्या घरावर सोलर बसवून झिरो बिल येणार यासाठी केडीसी बँकेकडून कर्ज देण्यात येईल असेही सांगितले.

यावेळी सभापती सौ. जयश्री गाडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणू असे सांगितले.

यावेळी उपसभापती सवय यशोदा पोवार, आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष अनिल फडके, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, सुधीर देसाई आदींची भाषणे झाली.

कार्यक्रम प्रसंगी आजरा कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, दीपक देसाई, सुधीर सावंत, दत्ता जाधव, संजय येजरे , इंद्रजीत गाडे., विकास होतआ,नंदा कुंभार, गणपतराव सांगले, बी.टी.जाधव, विष्णू मुळीक, सदाशिव पाटील, सतीश पाटील, एम.के. देसाई, राजू मुरकुटे, दशराज आजगेकर, संजय येसादे, इतर मान्यवर उपस्थित होते.

आजऱ्यात रमजान ईद उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला.

ईदच्या पार्श्वभूमीवर हाफीज तौफिक काकतिकर यांनी नमाज पठण केले तर हाफिज अब्दुल गफार लमतुरे यांनी कुतबा पठण केले. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी सर्व धर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर ठीक- ठिकाणी मेजवानीचे बेत पार पडले. आजरा बाजारपेठेत दिवसभर गर्दी होती.

साळगाव बंधारा दुरुस्तीसाठी अखेर ५९ लाख रुपये मंजूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिरण्यकेशी सर्फनाला माध्यम प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या साळगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गेल्या काही दिवसांमध्ये दुरवस्था झाली आहे. एकीकडे बंधाऱ्याची दुरुस्त गरजेची झाली असताना दुसरीकडे मे महिन्यात तब्बल सोळा वर्षांनी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेस हा मोठा अडसर धरण्याची शक्यता आहे. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या विशेष प्रयत्नाने जलसंपदा विभागाने या बंधाऱ्याच्या दुरुस्ती करिता ५८ लाख ७० हजार रुपये इतकी अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर केली आहे. यात्रेपूर्वी सदर बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.

यासाठी जितेंद्र भोसले, सरपंच धनंजय पाटील, दयानंद नेऊंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

आजरा साखर कारखान्याचे हंगाम २६-२७ करिता तोडणी वाहतूकीचे करारास प्रारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करणेस आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली. कारखान्याने मागील हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणेचा विचार करून येत्या हंगामात ४.५० लाख ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवून सदर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करणेस सुरुवात केली आहे.

कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी याप्रसंगी सांगितले कारखान्याचे पुढील काळात कारखाना लवकर सुरू करणेसाठी नियोजन करत आहोत कारखाना सध्या कमी दिवसांत जास्त गाळप करणे आता जरुरीचे झाले आहे तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील आपला ऊस लवकरात लवकर जावे अशी अपेक्षा असते त्यामुळे सक्षम यंत्रणा उभी करणे हे अत्यंत जरुरीचे आहे असेही याप्रसंगी सांगितले.

यावेळी कारखान्याचे संचालक श्री.रणजित देसाई, कार्यकारी संचालक श्री.संभाजी सावंत,मुख्य शेती अधिकारी श्री. विक्रमसिंह देसाई, ऊस कंत्राटदार व कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता

हौसाबाई येसादे

हाजगोळी बुll ता. आजरा येथील श्रीमती हौसाबाई दत्तू येसादे ( वय ८२ वर्षे ) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

छाया वृत्त…

अपघात झाला पण सुदैवाने बचावले

चालत्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुलगाव नजीक भरधाव चार चाकी पलटी होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी मात्र बचावले.

फोटो क्लिक…

आजरा पंचायत समितीच्या नूतन उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी आपल्या उपसभापती पदाचा कार्यभार नुकताच मान्यवरांचे उपस्थितीत स्वीकारला. मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते व जि. प. सदस्य सुधीर देसाई, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

आजचे पंचांग

दिनांक : २२ मार्च २०२६
वार : रविवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (रात्री ०९.१६ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (रात्री १०.४२पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : वैधृति योग (दुपारी ०३.४१ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : वाणीजा करण (सकाळी १०.३६ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मेष राशी (२३ मार्च पहाटे ०४.१३ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.१८ ते सायंकाळी ०६.४९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.४२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!