mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरगुन्हाठळक बातम्या

२३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला… आजरा तालुक्यातील घटना

वैफल्यग्रस्त तरुणाची सासूरवाडीत आत्महत्या… ?आजरा तालुक्यातील प्रकार

आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील स्वप्निल मारुती दिवटे या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीतील वृक्षावर आढळला. चार-पाच दिवसापूर्वी त्याच्या घटस्फोटाबाबतची चर्चा होऊन तसा करारनामाही झाला होता. कौटुंबिक वैफल्यातून सदर प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की स्वप्निल हा चार दिवसापासून बेपत्ता होता. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात वडील मारुती दिवटे यांनी दिली होती. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता दरम्यान आज त्याची दुचाकी पेरणोली वझरे मार्गावर उभा केलेल्या स्थितीत आढळली. त्याच्या शोधार्थ यमेकोंड येथील काही मंडळी आली असता त्याच्या सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीत त्याचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबतचे वृत्त आजरा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अधिक चौकशी केली असता स्वप्निल याचा पेरणोली येथील एका मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. वर्षभरापासून सदर मुलगी माहेरी रहात होती. अखेर चार दिवसापूर्वी या दोघांचाही घटस्फोट घेण्याचा निर्णय त्यांच्या पालकांसमक्ष घेण्यात आला होता. तसा करारनामाही वकिलांकडून करून घेण्यात आला होता. यानंतर स्वप्नील अस्वस्थ होता असेही समजते. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. स्वप्निल याच्या पश्चात आई,वडील व चार बहिणी असा परिवार आहे.

……

 

चव्हाणवाडीतून महिला बेपत्ता

चव्हाणवाडी (ता. आजरा) येथून सौ.रेश्मा दत्तात्रय मगदूम (वय २७) ही विवाहिता २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चंदनाचा अवैध साठा वन विभागाकडून हस्तगत… दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा शहरामध्ये एका घरात चंदनाच्या लाकडाच्या तुकड्याचा अवैध साठा करून विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त बातमी मानद वन्यजीव रक्षक यांना मिळाली त्यानुसार वनविभागाकडून सदर मालाची खातरजमा करनेकामी (डमी) बनावट ग्राहक तयार करून पंचा समक्ष मौजे आजरा येथील सिद्धिविनायक कॉलनी येथील लाकडाच्या व्यवहाराबाबत बोलणी करून चंदन तुकडे लाकूड माल घरात असलेची खात्री करून घेऊन सौ. स्मिता डाके वनक्षेत्रपाल आजरा यांचे नेतृत्वाखाली पथकाने संशयितांच्या घरी धाड टाकून घर झडती घेऊन चंदन तुकडे १९ किलो विक्रीसाठी खताच्या गोणीत भरून ठेवलेले जप्त करून ताब्यात घेतले. संबंधितांच्या विरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ व महाराष्ट्र वन नियम २०१४ मधील तरतुदी नुसार वनगुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सौ. स्मिता डाके परीक्षेत्र वनाधिकारी आजरा करत आहेत. सदरची कारवाई श्री. आर. आर. काळे (उपवनसंरक्षक कोल्हापूर), श्री. नवनाथ कांबळे ( सहा. वनसंरक्षक कोल्हापूर ) जीवन पवार (मानद वन्यजीव रक्षक ) यांचे मार्गदर्शन खाली श्री. बालेश न्हावी (वनपाल ), कृष्णा डेळेकर, रणजित पाटील, सुनील भंडारी, प्रियांका पाटील, नम्रता दंडगीदास (वनरक्षक )
कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, मारुती शिंदे, शिवाजी मटकर आदी वनमजूर यांनी सहभागी होऊन पार पाडली.

जप्त माल:-
चंदन तुकडे १९ किलो
इलेक्ट्रिक वजनकांटा
२ मोबाईल

भाजपा आजरा कडून एस. टी. कर्मचा-यांना धान्य वाटप.

आजरा एस. टी. आगार येथे आपल्या विविध मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आणि गेली १२० दिवस उन्हा- तान्हात आपल्या मुलाबाळांना घेऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या सर्व कर्मचारी बंधवांना भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या सहकार्याने आणि भा. ज. पा. आजरा या पुढाकाराने धान्य वाटप करण्यात आले.

ऐन दिवाळी सणापासून आज पर्यंत गेली १२० दिवस कर्मचारी बांधव संपावर आहेत. या दरम्यान एकूण ९३ कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या. पण दुर्दैव असे की एकाही अ महाविकस आधाडीच्या नेत्याने या आंदोलन कर्त्याना किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली नाही किंवा सांत्वनही केले नाही. परंतु बलात्काराच्या भ्रष्टाचाराच्या, मनी लॉडिंग प्रकरणात महाविकास आघाडीचे एक से एक बडे नेते तुरुंगात गेल्याने या नेत्यांना मात्र यायला आणि त्यांचे सांत्वन करायला एक दिवसही सवड नाही या बाबत सर्वांनी या प्रकरणी निषेध नोंदविला.

एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत आणि गोर गरीबांची लाल-परी पुन्हा ताकतीने चालू व्हावी यासाठी देवाला साकडे घालण्यात आले. यावेळी भा.ज.पा तालुकाध्यक्ष श्री. सुधीर कुंभार, माजी अध्यक्ष श्री.अरुण देसाई, सरपंच परिषदेचे श्री. संभाजीराव सरदेसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी सर्व एस.टी. कर्मचारी बांधव उपस्थित होते.

आरदाळ येथे गवत गंजीला आग लागून १५ हजारांचे नुकसान.

आरदाळ (ता. आजरा) येथील शशिकांत आनंदा कांबळे यांच्या गवत गंजीला आग लागून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा सदर प्रकार घडला. जनावरांच्या गोठ्याच्या मागील बाजूस असलेल्या गवताला रात्री अकरा वाजता अचानक आग लागली. महिन्याभरापूर्वी याच गोठ्याला आग लागून जनावरे भाजून जखमी झाली होती. जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्यासाठी मदत केली.

आजरा येथे बारावीची सहा उपकेंद्रे

२०२२ बारावीची बोर्ड परीक्षा covid-19 प्रादुर्भावामुळे ज्या शाळेत विद्यार्थी शिकतो तेथेच परीक्षा घ्यावी या शासकीय निर्णयामुळे आजरा तालुक्यातील बारावी बोर्ड परीक्षा विविध सहा केंद्रांवर होणार आहे. त्या अंतर्गत साजरा 0५३१ केंद्राचे एकूण सहा उपकेंद्रात विभाजन करण्यात आले आहे मुख्य केंद्र म्हणून आजरा महाविद्यालयाची नेमणूक आहे. त्या अंतर्गत उपकेंद्र म्हणून आजरा ज्युनियर कॉलेज, एच. एस. सी. व्होकेशनल, पंडित दीनदयाळ ज्यु.कॉलेज व डॉ. झाकीर हुसेन उर्दू स्कूल आणि ओम पेरामेडिकल कॉलेज या ठिकाणी परीक्षा होतील. तेव्हा तालुक्यामधील जे विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आजरा ०५३१ केंद्राचे प्रमुख प्रा. मनोज देसाई यांनी प्रसिद्ध केले आहे. आजरा केंद्रांतर्गत एकूण सहा उपकेंद्रे- आजरा ज्युनिअर कॉलेज (५५१ )आजरा व्होकेशनल (५५ )व्यंकटराव हायस्कूल ( २६७ )दीनदयाळ हायस्कूल (२९)ओम  पेरामेडिकल (४४) डॉ. झाकीर हुसेन कॉलज(२४), एकूण ९७० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा मनसेचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले व उपद्रव या पार्श्वभूमीवर परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या चार पाच दिवसामध्ये सोहाळे, ता- आजरा येथे पिसाळलेल्या रानटी वन्य प्राण्याने दोन नागरिकांचा चावा घेतला. ती घटना ताजी असताना काल याच गावातील तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर गव्याने हल्ला केला व त्यांना जखमी केले. अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांना त्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

वन्य प्राणी दिवसा ढवळ्या नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी व जखमिंना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व तालुका अध्यक्ष अनिल निउंगरे यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाच्या कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देतानाचंद्रकांत सांबरेकर तालुका सचिव,सुधीर सुपल
जिल्हा उपाध्यक्ष, आनंदा घंटे तालुका उपाध्यक्ष,पूनम भादवणकर,जिल्हा महिला उपाध्यक्षा, सरिता सावंत उपस्थित होत्या.

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छ्त्रपती छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मनसेच्या वतीने येथे मराठी भाषा दिन साजरा  व ‘माझी स्वाक्षरी माझा अभिमान’अभियान राबवण्यात येणार आहे.


उचंगी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित

उचंगी येथे सुरू असणाऱ्या घरभरणी च्या पार्श्वभूमीवर आज रविवार दिनांक २७ रोजी घळभरणी काम बंद आंदोलन करण्यात येणार होते. दरम्यान याबाबतची पालकमंत्र्यांची असणारी भूमिका व आयोजित केलेली बैठक विचारात घेऊन सदर आंदोलन महाराष्ट्र राज धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेने स्थगित केले असल्याचे पत्रक कॉम्रेड संजय तर्डेकर,संजय भडांगे आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.

मराठा महासंघातर्फे आजऱ्यात रास्ता रोको

मराठा महासंघाच्या वतीने खा.छत्रपतीसंभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी  मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता .. सिंधू केळकर

श्रीमती सिंधु गोविंद केळकर(वय ७५)
मुळ गाव आजरा सध्या रा.सांगली यांचेे सांगली येथे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे ३ मुली,जावई,नातवंडे असा परीवार आहे.

मृत्युंजय महान्यूज’च्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप  मध्ये ९६३७५९८८६६ हा नंबर ॲड करा व दररोजच्या ताज्या बातम्या त्वरित मिळवा..

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘छावा’ मुळे आजऱ्याच्या मातीचा सुगंध जगभर दरवळला…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!