mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

शाळा बचाव आंदोलन समितीची आजरा तहसीलवर धडक

शाळा बचाव आंदोलन समितीची आजरा तहसीलवर धडक

वीसपेक्षा कमी पटावरील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे शाळा बचाव आंदोलन समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून झाली.

यावेळी बोलताना काँ. संपत देसाई यांनी वीस पाटाखाली शाळा बंद करणे म्हणजे डोंगर कपारीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेणे असा प्रकार आहे. यामुळे अनेक मुले केवळ परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत असे स्पष्ट केले.

यानंतर सदर मोर्चा थेट तहसील कार्यालयावर आजरा शहरातून आणण्यात आला. शासनाच्या या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात सदर. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कॉ. संजय तर्डेकर, तानाजी देसाई, पंचायत समिती माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, राजू पोतनीस यांच्यासह मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

भारतामध्ये सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अघोषित अशी ज्ञानबंदी इथल्या व्यवस्थेने बहुजन कष्टकरी आणि स्त्रियांवर लादलेली होती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर शिक्षण सर्वांसाठी खुले झाले महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख आदींनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आग्रह धरला व त्या दृष्टीने कृतिशील पावले टाकली.

शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या दृष्टीने राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला यासाठी, शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेले शिक्षक, इमारती, ग्रंथालय, अभ्यासिका, खेळाचे मैदान यासह गरजेचे असलेल्या सर्व सुविधा शासकीय शाळांना दिल्या जाव्यात, गेल्या दहा वर्षात शिक्षक भरती नसल्याने राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत विषय शिकवायला शिक्षक नाहीत. कला, क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलन प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, बळवंत शिंत्रे, एकनाथ आजगेकर, सुभाष विभुते, संजय घाटगे, मायकल फर्नांडिस, महेश शिंदे, संजय देवेकर, नारायण भडांगे, शांताराम पाटील, संभाजी बापट, सौ. सुचिता लाड, सौ.शोभा पाटील,सौ. प्रीती कांबळे,सौ. राजश्री पाटील,अनुष्का गोवेकर, अंकुश पाटील डॉ. नवनाथ शिंदे अमानुला आगलावे,राजाराम नेवरेकर यांच्यासह तालुक्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

सुळेच्या सरपंचपदी सौ.छायाताई सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

सुळे ता.आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. छायाताई संदीप सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडीवेळी निवडणूक अधिकारी म्हणून मलिग्रे विभागाचे मंडल अधिकारी पी.व्ही. जोशीलकर उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश फडके सदस्या जयश्रीताई फडके ,शिल्पा डोंगरे ,शांताबाई सुतार ,संदीप चव्हाण ,शिवाजी सुतार ,ग्रामसेवक किरुळकर पो. पा. सूर्यकांत केसरकर हजर होते निवडीनंतर आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक मा.राजाराम जाधव , जय किसान दूध संस्थेचे चेअरमन अनिल सूर्यवंशी त्याचप्रमाणे संदीप सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी ,कृष्णा सूर्यवंशी ,आप्पासाहेब जाधव, संजय दळवी ,अमित फडके, महादेव सूर्यवंशी ,जानबा रेडेकर, संभाजी रेडेकर .आदी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

दिपावली पाडव्यानिमित्य जनता बँक आजराकडे रु.8 कोटी 15 लाखाच्या ठेवी जमा

जनता सहकारी बँक लि.. आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्यानिमित्य एका दिवसात रु. 8 कोटी 15 लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. याचाच अर्थ सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास व बँकेबद्दल असलेली अस्मियता दिसून येते.

बँकेने आज पर्यंत अनेक यशाची शिखरे पार करत जिल्हयात तसेच देशात सर्वोकृष्ट बँक, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक सतत 10 वर्ष पुरस्कार प्राप्त केले आहेत.

बँकेने सर्व अद्यावत टेक्नॉलोजी सव्र्हस चालू केली असून नुकतेच बँकेने यु.पी.आय., गुगल पे, फोन पे, क्यु आर कोड, भिम इ. सेवा चालू करुन ग्राहकांना त्वरीत पेमेंट करणेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज व पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFE) मार्फत दिल्या जाणाऱ्या रु. 10 लाखापर्यंतची सबसिडीची कर्ज देवून तरुण उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करत आहे. तसेच बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प केला आहे. असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई व बँकेचे सीईओ श्री. एम. बी. पाटील यांनी सांगितले.

आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ५ कोटी ७० लाखाच्या ठेवी जमा

 

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल ५ कोटी ७० लाख ५५ हजार ४७० रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे यांनी दिली. सध्या बँकेकडे ७५९ कोटी १२ लाख रूपयाच्या ठेवी व ४७१ कोटी ०४ लाख रुपये कर्जे आहेत. असेही डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

…………..आजरा विशेष :-

आजरा तालुक्यात थंडीचा कडाका.

….

आजरा साखर कारखान्याकडून साखर उत्पादन सुरू.

….

 

उत्तुर फाटा ते  गवसे मार्गाची दुर्दशा झाल्याने ऊस वाहतूक वाहनचालक व पर्यटकांकडून संतप्त प्रतिक्रिया.

 

तालुक्यात प्रचंड उत्साहात दीपावली साजरी.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याजवळ लक्झरी व तवेरा अपघातात दहा जखमी…अण्णाभाऊ सूतगिरणीच्या अध्यक्षपदी अन्नपूर्णा चराटी

mrityunjay mahanews

आजरा तालूक्यातील उत्तूर येथे एकाची आत्महत्या..उत्तूर येथे मारामारी… एक जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!