

निधन वार्ता ह.भ.प.कृष्णा लक्ष्मण गुरव
हरपवडे (ता. आजरा) येथील कृष्णा लक्ष्मण गुरव (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.गुरव हे तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद गुरव यांचे ज्येष्ठ बंधू व जिल्हा परिषदेच्या महिला व बांधकाम समितीच्या माजी सभापती सौ. मनीषा गुरव यांचे दीर होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. दिवस कार्य दि. ६ नोव्हेंबर रोजी होणार असून ७ नोव्हेंबर रोजी फोटो पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
…
स्व.बाबुरावजी कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी आजऱ्यात विशेष कार्यक्रम
आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते स्व. बाबुरावजी कुंभार यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन आणि आजरा तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा कार्यगौरव पुरस्कार समारंभ आयोजित केला आहे.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता सदर कार्यक्रम होणार आहे. तरी दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. बाबुरावजी कुंभार यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आणि गौरवमूर्तींना शुभेच्छा देणेसाठी उपस्थित रहावे असे स्व.बाबुरावजी कुंभार गौरव समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
…
किणे- नेसरी मार्गावर अपघात
किणे व अर्जूनवाडी येथील दोघे ठार
किणे-नेसरी मार्गावर जाधव पोल्ट्री फार्म शेजारील बाजूस असणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व चार चाकीची धडक होऊन यामध्ये किणे येथील प्रकाश पांडुरंग केसरकर(वय ४०) व अर्जूनवाडी(ता.गडहिंग्लज) येथील विलास हुलजी पाटील (वय ४८) हे दोघेजण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रकाश केसरकर व विलास पाटील हे दोघे नेसरी येथून किन्याच्या दिशेने स्प्लेंडर मोटरसायकल वरून चालले होते . दरम्यान इंडस मोबाईल टॉवर जवळील चढतीला त्यांची गाडी आली असता आजर्याकडून येणाऱ्या मारुती इको कारने त्यांच्या मोटरसायकलीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रकाश केसरकर हे जागीच मृत पावले तर विलास पाटील यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचे निधन झाले. या अपघाताची फिर्याद गणपती पांडुरंग केसरकर यांनी नेसरी पोलिसात दिली असून चार चाकी चालक सचिन सुरेश साखरे रा.नेसरी ता. गडहिंग्लज याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केसरकर हे चंदगड येथील साखर कारखान्यात तर पाटील हे वन विभागामध्ये सेवेत होते.











