मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५

कर्तुत्ववानांचा सन्मान करण्याची रवळनाथची परंपरा : सौ. मीना रिंगणे
रवळनाथतर्फे आजरा येथे सत्कार समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
समाजातील कर्तुत्ववान आणि गुणवंतांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्याकडून आणखी उत्तम कार्य घडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान करण्याची परंपरा रवळनाथने जपली आहे असे प्रतिपादन ‘रवळनाथ’च्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांनी केले.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या आजरा शाखेतर्फे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, शाखा सल्लागार प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रा.डॉ. शिवशंकर उपासे म्हणाले, बँकिंग व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी रवळनाथ संस्थेने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील महत्वाचे योगदान दिले आहे. आजरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
प्रारंभी प्रा. मनोज देसाई यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तर सी.ए. परीक्षेत यश मिळविल्याबद्दल कु. सरस्वती माने यांचा सत्कार करण्यात आला. नूतन शाखा सल्लागार श्री. गौतम सुतार यांचाही यावेळी स्वागतपर सत्कार करण्यात आला.
शाखा चेअरमन डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शाखाधिकारी श्री. सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. सीईओ श्री. डी. के. मायदेव यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संचालिका श्रीमती उमा तोरगल्ली, सौ. रेखा पोतदार, शाखा सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. बाळासाहेब नाईक, मोतीराम बारदेस्कर, सुनीता रेडेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

वर्तमानात भगवद्गीतेला अनन्यसाधारण महत्त्व : डॉ.सचिन परब

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वर्तमानात श्रीमभगवद्गीता आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या आयुष्यामध्ये गीतेचे अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व शास्त्र मणी श्रीमद्भगवद्गीगीता आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेमध्ये आहेत असे प्रतिपादन डॉ. सचिन परब यांनी केले. आजरा येथे ब्रह्माकुमारीजतर्फे आयोजित श्रीमद्भगवद्गीता प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.तालुक्यातील वारकरी लोकांच्या मोठ्या उपस्थितीत ब्रह्मा कुमारी आजरा या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
वारकरी संप्रदायातील संदीप महाराज तसेच पोळगाव, देऊळवाडी, सातेवाडी, कोरिवडे, पेरणोली, मडिलगे, दाभील मेढेवाडी, वेळवट्टी , देवर्डे या गावातील ज्येष्ठ वारकरी उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी माधुरी बहनजी,नेसरी संचालिका यांनी विद्यालयाचा परिचय व स्वागत केले. डॉ. सचिनभाईंचा यावेळी वारकरी संप्रदायामार्फत सत्कार करण्यात आला.यावेळी बापू मनोळकर , गुरु गोवेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली संदीप महाराज यांनी आभार व्यक्त केले. यावेळी ह. भ. प. सुशांत गुरव महाराज, दयानंद भोपळे, संजूभाई सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


व्यंकटरावमध्ये तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मार्गदर्शन व वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा मधील इयत्ता अकरावी, बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले डोमिसाईल दाखला, जातीचा दाखला, डोंगरी दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला अशा विविध दाखल्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती व लवकरात लवकर दाखले विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मिळावेत यासाठी प्रत्यक्ष तहसील कार्यालयातील महसूल विभागातील सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार समीर माने यांनी सर्व दाखल्यांविषयी आणि त्यांची निगा कशी राखावी व त्या दाखल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले . परीक्षेपूर्वी या आवश्यक दाखल्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन विविध दाखले विद्यार्थ्यांनी जमा करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कामात तहसिल कार्यालय सर्वतोपरी मदत करेल असे सांगितले.
निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई , विकास कोलते, महसूल नायब तहसिलदार, व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य आर. जी. कुंभार उपस्थित होते.
प्रास्ताविक शिवाजी पारळे यांनी केले आणि आभार एम. ए. पाटील यांनी मानले.


संवेदनातर्फे पोलीस स्टेशनला वॉटर प्युरिफायर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वामी ट्रॅव्हल्स व संवेदना फाउंडेशन तर्फे आजरा पोलीस स्टेशनला वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले. यावेळी स.पो.नि. नागेश यमगर, संवेदनाचे अध्यक्ष आण्णाप्पा पाटील, डॉ.प्रविण निंबाळकर, गीता पोतदार, धनश्री देसाई, माधुरी पाचवडेकर, प्रशांत हरेर, ‘ स्वामी ‘ चे संजय कातकर व संवेदना पोलीस मित्र टीम उपस्थित होते.

आज शहरात...
♦ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी पादुका दर्शन सोहळा
स्थळ : दुरदुंडेश्वर मंगल कार्यालय, आजरा
वेळ : सायंकाळी सहा नंतर
♦ आनंदोत्सव
रोजरी इंग्लिश स्कूल येथे आनंदोत्सवाचा शुभारंभ आज दुपारी ३.४५ वाजता स. पो. नि. नागेश यमगर यांच्या प्रमुख उपस्थितीत…

फोटो क्लिक





