बुधवार दि.२१ जानेवारी २०२६

आजरा नगरपंचायतीच्या विषय समित्यांवरही महिला राज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडी जाहीर झाल्या.जाहीर निवडीमध्ये पाचही समित्यांवर महिला सभापतींची निवड झाली आहे.
समित्या निहाय निवडी पुढील प्रमाणे…
सार्वजनिक बांधकाम समिती…
श्रीमती रहिमतबी सलीम खेडेकर (सभापती) सौ.अश्विनी संजय चव्हाण, सौ.अन्वि अनिरुद्ध केसरकर, श्री.मुसासरफराज इस्माईल पटेल, व श्री परशराम बामणे ( सर्व सदस्य)
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती…
सौ. पूजा अश्विन डोंगरे (सभापती) सौ.आसावरी महेश खेडेकर, सौ.पूनम किरण लिचम, श्री. अभिषेक शिंपी, श्रीमती कलाबाई शंकर कांबळे (सर्व सदस्य )
शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती…
सौ. पुनम किरण लिचम (सभापती) श्री.अनिकेत अशोक चराटी, सौ.अन्वि अनिरुद्ध केसरकर, श्री. निसार लाडजी, श्री विक्रम पटेकर (सर्व सदस्य)
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती…
सौ.अश्विनी संजय चव्हाण (सभापती) सौ.अन्वि अनिरुद्ध केसरकर, रहमतबी सलिम खेडेकर,सौ. रेश्मा नौशाद बुड्डेखान, श्री. असिफ मुनाफ सोनेखान (सर्व सदस्य)
महिला व बालकल्याण समिती..
श्रीमती निशांत समीर चांद (सभापती) सौ. आसावरी महेश खेडेकर, श्रीमती कलाबाई शंकर कांबळे, सौ.स्मिता सुधीर कुंभार (सर्व सदस्य)
स्थायी समिती…
अशोक काशिनाथ चराटी ( सभापती) सौ.पूजा अश्विन डोंगरे, श्रीमती रहिमतबी सलीम खेडेकर, पुनम किरण लिचम, सौ. अश्विनी संजय चव्हाण श्रीमती निशात समीर चांद (सर्व सदस्य)

आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेकरीता ५ तर पंचायत समिती ९ अर्ज दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समिती ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दोन जिल्हा परिषदेसाठी ४४ तर ४ पंचायत समितीसाठी ५५ अर्ज विक्री झाले आहेत.
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातून शिरीष हिंदूराव देसाई,विठ्ठल महादेव उत्तूरकर (प्रत्येकी एक) अर्ज दाखल केला आहे.
पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातून
सुधिर राजाराम देसाई (२), सुरेश कृष्णा शिंगटे, सुपल सुधीर रामदास, रणजीतकुमार सुर्यकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक) यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
उत्तूर पंचायत समिती करिता विकास वसंत चोथे,चंद्रकांत ईश्वर गोरुले (प्रत्येकी एक)
भादवण पंचायत समिती करीता
विजया जर्नादन निऊंगरे (२)
पेरणोली पंचायत समिती करीता यशोदा युवराज पोवार,रचना राजाराम होलम, श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (प्रत्येकी एक)
तर वाटंगी पंचायत समिती करीता किरण विश्वनाथ कोरे,भिमराव गणपती वांद्रे (प्रत्येकी एक) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज आघाड्यांचे चित्र स्पष्ट होणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यामध्ये विचित्र राजकीय घडामोडी सुरू असून आज लढतींचे पक्षनिहाय चित्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने स्पष्ट होणार आहे.
सद्यस्थितीस महायुतीच्या भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याने उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी आपापले उमेदवार तयार ठेवले आहेत.
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांची जिल्हा परिषदेकरीता उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपा व शिवसेना शिंदे गटात या मतदारसंघात निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे की स्वतंत्र लढायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असे असले तरीही येथे शिवसेना शिंदे गटाने ऐनवेळी अडचण नको म्हणून सक्षम पर्याय तयार ठेवले आहेत.
एकंदर चित्र पाहता उतूर सह पेरणोली मध्ये तिरंगी लढतीची शक्यता दिसत आहे.
महाविकास आघाडी संपुष्टात…?
आजरा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी संपुष्टात आल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश आपटे यांनी ताराराणी आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उबाठाने राष्ट्रवादीच्या सुधीर देसाई यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून पंचायत समितीची उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम करत आहे. त्यामुळे तालुक्यात महाविकास आघाडी संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
निवडणूक फोटो क्लिक...

शिवसेना उबाठा तर्फे पेरणोली पंचायत समितीकरीता सौ. यशोदा युवराज पोवार यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात आला.
सुधीर सुपल यांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शनाने पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

क्राइम डायरी…
एसटी बस मध्ये दारूच दारू…
आजरा पोलिसांच्या कारवाईत ३६ हजार रुपयांची दारू जप्त
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सावंतवाडी – नृसिंहवाडी बसमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या संदीप बाळासाहेब शेटके व नितीन गोरखनाथ पोरे ( रा. चंदुर तालुका हातकणंगले जि.कोल्हापूर ) या दोघांना सुमारे ३०० बाटल्यांसह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बेकायदेशीर बिगर परवाना दारू साठा बाळगल्या बद्दल महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुमारे ३५ हजार ४२६ रुपये इतक्या किमतीचा सदर मुद्देमाल आहे.
पोलिसांनी मंगळवार दिनांक २० रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बहिरेवाडी चेक पोस्टवर सदर बस अडवून तपासणी केली असता प्रवासी बॅगेमध्ये विविध कंपनीच्या सुमारे ३०० लहान मोठ्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याबाबतची फिर्याद महेश रावजी चिटणीस यांनी पोलिसात दिली आहे.
आजरा बस स्थानकावरून दुचाकी लंपास
आजरा बस स्थानक परिसरातील आंब्याच्या झाडाखाली उभी केलेली रमेश महादेव गावडे रा. कासार कांडगाव ता. आजरा यांच्या मालकीची स्प्लेंडर मोटरसायकल ( MH-09 EX 60 64) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
याबाबतची फिर्याद रमेश गावडे यांनी आजरा पोलिसात दिली असून हवालदार शिकलगार पुढील तपास करीत आहेत.
अकस्मित मृत्यू
लाकूडवाडी ता. आजरा येथील अमर भीमराव कांबळे ( वय ४८ वर्षे ) यांचे उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे आकस्मिक निधन झाले.
याबाबतची वर्दी वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांनी पोलिसात दिली असून पोलीस हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.
विष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
उत्तुर ता. आजरा येथील निलेश सुभाष गुरव या ३० वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल केले असता उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी संजय दादू गुरव यांनी पोलिसात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.
बातमी स्त्रोत ;- आजरा पोलीस स्टेशन




