



तरुणाचा अपघातात मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुतार गल्ली आजरा येथील हर्षद एकनाथ सुतार या चोवीस वर्षीय तरुणाचा अडकूर- नेसरी मार्गावर बोंजुर्डीनजीक रात्री झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
भाडोत्री चारचाकी घेऊन चालक म्हणून हर्षद हा गेला होता. तो आज-याच्या दिशेने रात्री उशिरा परतत असताना गाडीची रस्त्याशेजारी झाडाला जोरदार धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला महागाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.
सुतार गल्ली येथील सुतार कुटुंबीय सध्या जोशी गल्ली येथे राहतात. बेताची घरची परिस्थिती असलेल्या सुतार कुटुंबियांवर या घटनेने मोठा आघात झाला आहे. हर्षद याच्या पश्चात आई, बहीण, वडील असा परिवार आहे.






