mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार   दि. २५ जानेवारी २०२५  

कडकडीत बंद…
उत्स्फूर्त प्रतिसाद


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरांमध्ये झालेल्या आंतरधर्मीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने आजारा बंदची हाक देण्यात आली होती. याला स्थानिक व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दिवसभर बाजारपेठ बंद होती. बंदच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस पथकांसह गृहरक्षक दलाचे जवान व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी दिवसभर आजरा शहरात ठाण मांडून होते.

      सुमारे आठ – दहा दिवसांपूर्वी शहरातील एका प्रेमी युगुलाने आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर याचे पडसाद आठवडाभर शहरात उमटत होते. सदर युवक व युवती पोलीस ठाण्यास हजर झाल्यानंतर संतप्त तरुणांनी एकत्र येऊन अशा प्रकारांचा निषेध नोंदवत असे प्रकार  इथून पुढे न घडण्यासाठी आजरा बंदची हाक दिली.

      आठवडा बाजाराचा दिवस असूनही शहरात दिवसभर सर्व उलाढाल ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ बंदच अवस्थेत होती. हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करताना दिसत होते. त्यांच्या या आवाहनालाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता.

     बंद कालावधीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कुत्रे आडवे आले… मोटरसायकल घसरली..
एक जण गंभीर जखमी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वाटंगी फाटा ते यमेकोंड दरम्यान आजऱ्याहून यमेकोंडच्या दिशेने निघालेल्या तानाजी सखाराम कातकर ( वय ५२ वर्षे रा.यमेकोंड) यांच्या दुचाकीखाली कुत्रे आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कातकर यांच्या डोक्याला व इतरत्र मार बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.

      गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.

देवस्थान जमीन धारकांचे धरणे आंदोलन

 लेखी पत्रानंतर  मागे

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील देवस्थान जमिनी वरील सातबारा पत्रकी मालकी हक्कातील नाव कमी करून मालकाचे नाव इतर हक्कात घालणे बाबत तहसीलदार यांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत आजरा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदरचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्याबरोबर आंदोलकांची चर्चा झाली. आंदोलकांना लेखीपत्र दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.

         संघटनेचे जिल्हा समिती सदस्य कॉ. शिवाजी गुरव यांचे भाषण झाले. किसान सभा देवस्थान जमीन धारक संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कॉ. अमोल नाईक, उपाध्यक्ष बाळासाहेब कामते, गुरव समाज संघटनेचे गोविंद गुरव, हनुमंत गुरव, विशाल गुरव, कल्पना गुरव, संतोष गुरव, विलास गुरव, जयवंत पाटील, विठ्ठल मुगुडकर, तुकाराम गुरव, कृष्णात गुरव, मारुती गुरव, सूर्यकांत गुरव, संजय गुरव, विनायक पाटील यासह देवस्थान जमीन धारक शेतकरी उपस्थित होते.

शहरानजीक भरले बाजार…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरांमध्ये काल शुक्रवारी अचानकपणे पुकारण्यात आलेल्या ‘आजरा बंद’ ची माहिती बाहेरगावाहून येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी सुलगाव फाटा व एमआयडीसी येथे आपली दुकाने थाटली होती.

      यामुळे सुलगावसह एमआयडीसी परिसरात दोन्ही बाजूनी येणाऱ्या तालुकावासीय व स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. भाजीपाला, कडधान्ये, मच्छी व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

संवेदना फाऊंडेशनच्या वतीने कोवाडे येथे व्याख्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोवाडे ता.आजरा येथे, संवेदना फाऊंडेशनच्या वतीने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ व सुजाण पालकत्व आणि ओळख संवेदनाची, या विषयावर तानाजी पावले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

      कोवाडे व पंचक्रोशीतील नागरिकांनी सातेरी देवालयासमोर सायंकाळी ७ वा होणाऱ्या या व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन संवेदना सदस्यांनी केले आहे.

फोटो क्लिक 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश- श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!