mrityunjaymahanews
अन्य

पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश- श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

 

सातारा येथील बैठकीत पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश

सातारा- प्रतिनिधी
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता  हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. यावेळी संबंधित सर्व कार्यकारी अभियंत्यांना सूचना करताना धुमाळ म्हणाले, घळभरणी झाली की आपल्याकडून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष अक्षम्य दुर्लक्ष होते. अधिकारी बदलून गेला की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच राहतात. आजरा तालुक्यातील घळभरणी झालेला आंबेओहळ प्रकल्प आणि अपुरे असलेल्या उचंगी व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचा सुनियोजित आराखडा बनविणे आवश्यक आहे. तो पंधरा दिवसात बनविण्याच्या सूचना त्यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.
यावेळी झालेले निर्णय
चाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला पुढील महिन्यात होणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल,
आंबेओहळ मधील ज्या पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप झाले नाही व ज्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे अशा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दिली जाईल,
पारपोली पैकी खेडगे ग्रामस्थांनी संपूर्ण पुनर्वसनाची मागणी केली आहे, त्याच्या संपदानाबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी देणे, उचंगी, सर्फनाला आणि आंबेओहळ धरणातील ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन, भूखंड, पॅकेज द्यायचे आहे ते कोणत्या तरखेपार्यंत देता येईल त्याचा आराखडा पंधरा दिवसात बनवून त्याची अमलबाजवणी सुरू होईल,पर्यायी जमिनीवर नाहक बोजा चढविला आहे तो कमी करण्यात येईल,
संकलन दुरुस्तीच्या प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून संकलन अद्यावत करण्यात येईलअसे निर्णय घेण्यात आले.
आंबेओहळ धरणाची घळभरणी पुनर्वसन शिल्लक असताना झाली हे मान्य करून उर्वरित कोणत्याही प्रकल्पात पुनर्वसनाचे काम झाल्याशिवाय घळभरणी केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ भारत पाटणकर यांच्यासह कॉ संपत देसाई, प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, डी. के. बोडके, बजरंग पुंडपळ, दशरथ घुरे, शिवाजी गुरव, विष्णू मांजरेकर, चंद्रकांत कविटकर, महादेव खाडे, धोंडिबा सावंत, शिवाजी येजरे यांच्यासह श्रमुदचे तीन जिल्ह्यातील कार्यकर्ते उपास्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात एकाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निंगुडगे येथे मारहाणीत एक जखमी…

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष… ताराराणी आघाडी

mrityunjay mahanews

आजरा आगारातील चालकाची आत्महत्या…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!