mrityunjaymahanews
अन्य

आजऱ्यात अशोकअण्णा चराटींचा वाढदिवस उत्साहात– येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांचा वाढदिवस आ. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

आजऱ्यात अशोकअण्णा चराटींचा वाढदिवस उत्साहात

 

आजरा:प्रतिनीधी

येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चराटींचा सत्कार झाला.’ यावेळी आमदार आबिटकर यांनी अशोकअण्णा हे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. सर्फनाला प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले.  विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. भरमूअण्णा पाटील म्हणाले, चराटी व त्यांच्या सहका-यांनी आपणाला बळ दिले. चराटी हे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी रहावे असे आवाहनही केले.
यावेळी चराटी म्हणाले, आजरा  तालुक्याच्या विकासासाठी शिंपी यांच्याशी युुती केली . आजरा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सत्तेवर कोणही असू देत कारखाना सुरू झाला पाहिजेत हीच भावना होती. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत साडेतीन कोटीचे कर्ज जिल्हा बँकने नाकारले. मग कारखाना एनपीएमध्ये असताना एकशे दहा कोटीचे कर्ज कसे दिले? हे कळाले नाही.” असा टोलाही त्यांनी लगावला.  जि.प .उपाध्यक्ष शिंपी यांचेही या वेळी भाषण झाले. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, आजरा अर्बनचे उपाध्यक्ष किशोर भुसारी, विलास नाईक, सुरेश
डांग, सुधीर कुंभार, अनिकेत चराटी, नगरसेविका सौ.संजीवनी सावंत,सौ.शुभदा जोशी, अनिरुध्द केसरकर, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, उद्योजक रमेश रेडेकर, राजेंद्र सावंत, किरण कांबळे यांच्यासह संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. बी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. दीपक सातोसकर यांनी आभार मानले.माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर, जयंत पाटील,राहुल देसाई,राजेंद्र गड्ड्यानवर यांनी चराटी यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अजातशत्रू ‘ दादा ‘

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मुश्रीफ जिंकले… अण्णा हरले… जिल्हा बँकेचा आजरा तालुक्यातील निकाल धक्कादायक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!