




‘मृत्युंजय महान्यूज ‘चे थाटात उद्घाटन
आजरा:विशेष प्रतिनिधी
‘न्यूजमेकर्स ‘ग्रुपच्या’ वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मृत्युंजय ‘महान्यूज’ या पोर्टल चॅनलचे आमदार प्रकाश आबिटकर , जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते व ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, आजरा साखर कारखान्याचे संचालक सुधीर देसाई, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, नगरसेवक आलम नाईकवाडे ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले,माजी पं.स. सभापती मसणु सुतार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, विजयकुमार पाटील, विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जि.प.च्या माजी महिला बालकल्याण समिती सभापती सौ. मनीषा गुरव, राहुल देसाई, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू सावंत, युवराज पोवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, चंद्रकांत सांबरेकर, सौ.सरिता सावंत, नगरसेविका सुमैय्या खेडेकर ओंकार माध्याळकर आजरा सूतगिरणीचे संचालक जी. एम. पाटील आजरा समृद्धी कंपनीचे संचालक नारायण मुरकुटे, कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे, रामचंद्र मुरकुटे,विक्रम देसाई,रोहित शेंडे ,उत्तम देसाई, अनिकेत कवळेकर भादवणचे सरपंच संजय पाटील, दत्तात्रेय पाटील, रोहित शेंडे, आनंदा घंटे, सिद्धेश नाईक, वैभव सावंत,उत्तम देसाई, योगेश पाटील, अण्णासाहेब पाटील, प्राचार्य सुनील देसाई, प्राचार्य शिवाजी गुरव,दिलावर चाँद,डॉ.पी.एम.जालकर, प्रकाश पाटील,गोविंद गुरव, अण्णासाहेब पाटील, महेश नार्वेकर, तुफेल आगा,अनिकेतशिंत्रे, महेश माने,सचिन भोसले,विनोद ओतारी,सुरज जाधव, सुधाकर वंजारे, संतोष भाटले, विजय थोरवत, बाळासाहेब इंगळे, पत्रकार रणजित कालेकर, प्रा.रमेश चव्हाण, सुनील पाटील, संभाजी जाधव, सचिन चव्हाण, श्रीकांत देसाई, समीर मोरजकर, पिंटू रांगणेकर, रोहित बूरुड, अनिकेत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

