

उत्तूर येथे जुगार अड्ड्यावर छापा…
पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती.. अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद
उत्तूर (ता. आजरा) येथे उत्तूर- गारगोटी मार्गावर मारूती लक्ष्मण गुरव ((रा. महालक्ष्मी मंदिराजवळ) यांच्या हॉटेल व घराच्या पहिल्या ममजल्यावर रमी हा जुगार प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार गुरूवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर जागी छापा टाकला या छाप्यामध्ये रोख रकमेसह आठ लाख ६६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी तब्बल अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेले काही दिवस सदर ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी सापळा रचून सदर अड्ड्यावर छापा टाकला. येथे जुगार खेळणारे अकरा जण आढळून आले .
यामध्ये अड्डाचालक मारुती हनुमंत हत्तरगी (रा. उत्तूर ता. आजरा) घरमालक मारूती लक्ष्मण गुरव (रा. महालक्ष्मी मंदिर जवळ, उत्तूर ता. आजरा) मौसीन गौस मुल्ला ( रा. दर्गा गल्ली, आजरा ) शशिकांत महादेव कुरूंदकर ( रा. उत्तूर ता. आजरा) जानबा दत्तात्रय तानवडे (रा. उत्तुर ता. आजरा) शिवाजी शंकर घोडके (रा. उत्तूर, ता. आजरा ) विनायक धोंडीराम हळवणकर (रा. धामणे, ता. आजरा) राजू साताप्पा बरमनवर (रा. संकेश्वर, ता. हुक्केरी, जिल्हा बेळगांव) शंकर तातोबा मगदूम रा. धामणे, ता. आजरा) संतोष परशुराम कांबळे (रा. उत्तूर ता. आजरा ) संजय केशव शिंदे (रा. वडकशिवाले, ता. आजरा) यांच्यावर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे .
संबंधितांकडून रोख रकमेसह दोन मोबाइल, चारचाकी गाडी, दोन मोटरसायकली इत्यादी साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.
त्वरित पोलिसांशी संपर्क साधा: सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे
सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात काही ठिकाणी तीनपानी, रमी या प्रकारचे जुगार खेळले जात असल्याचे समजते. असे प्रकार आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा . गणेश व दुर्गामाता मंडपामध्ये जुगारासारखे अवैध प्रकार टाळावेत असे आवाहन आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी केले आहे.


सत्ता कोणाचीही असो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार..जयंत पाटील
‘उचंगी’चे दणक्यात पाणीपूजन
गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाला निधी देण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील बरेच प्रकल्प मार्गी लागत आहेत.सत्ता कोणाचीही असो प्रकल्प मार्गी लागले म्हणून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मागे राहणार नाहीत याची काळजी निश्चितच घेऊ, असे आश्वासन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. ते आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाच्या पाणी पूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सुरुवातीला १५ कोटी रुपये इतक्या खर्चाचा हा प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत सुमारे १३७ कोटी रुपयांचा निधी लागत आहे. अर्धा टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा या प्रकल्पामध्ये होणार असून कोल्हापूर पद्धतीचे बारा बंधारे यापूर्वीच तयार करण्यात आल्यामुळे प्रकल्पाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. प्रकल्प झाला म्हणून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कदापिही मागे राहणार नाहीत.प्रशासकीय अधिका-यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे पुनर्वसनाचे प्रश्न रेंगाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या दिवशी एखाद्या प्रकल्पाचे पाणी पूजन होते त्या दिवसापासून धरणग्रस्तांच्या आयुष्याची फरफट सुरू होते. अशी फरफट होणार नाही याची काळजी निश्चितच घेऊ.सदर पाणी पूजन प्रसंगी डॉ. भारत पाटणकर यांना कार्यक्रमास आमंत्रित न केल्याबद्दल खंत व्यक्त केली. अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा असे गौरवोद्गारही त्यांनी पाटणकर यांच्या संदर्भात काढले.
यावेळी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,खा.संजय मंडलिक,आम.राजेश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ महणाले, उचंगी प्रकल्पाचे खरे श्रेय हे विस्थापित व प्रकल्पग्रस्तांना जाते. प्रशासकीय अधिकारी संवेदनशील असते तर यापूर्वीच प्रकल्प पूर्ण झाला असता. आमदार राजेश पाटील यांनी उचंगी प्रकल्पाच्या प्रश्नांचा पाठपुरावा वेळेस केल्यामुळे प्रश्न मार्गी लागण्यास बर्यापैकी यश मिळाले . शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत आहे परंतु सर्वांनाच वैयक्तिक पाणी उचल करणे शक्य होणार नाही यासाठी शक्य तेवढ्या पाणीपुरवठा संस्था प्रकल्प क्षेत्रात काढाव्यात व पाणी उचलण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी स्वीकारावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, आजचा हा प्रसंग म्हणजे सामुदायिक आनंदाचा प्रसंग आहे. प्रकल्प मार्गी लागण्यामध्ये माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मोठा वाटा आहे.निसर्गाने कोल्हापूर जिल्ह्याला भरपूर पाणी दिले आहे. ते साठवून त्याचा योग्य वापर होण्याकरीता प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर माजी मंत्री पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, प्रकल्पाचा पाया स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी रचला तर त्याला कळस चढविण्याचे काम माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. माजी मंत्री हसन मुश्रीफ व खा. संजय मंडलिक यांनी हातभार लावला आहे. बरीच वर्षे रेंगाळलेला हा प्रकल्प दोन अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कालावधीत खऱ्या अर्थाने मार्गी लागला.जलसंपदा मंत्रीपदी जयंत पाटील व उपमुख्यमंत्रिपदी अजितदादा नसते तर हा प्रकल्प मार्गीलागण्यामध्ये अनेक अडचणी आल्या असत्या. प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल व संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करण्याकरता आपण बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पग्रस्तांच्या वतीने बोलताना कॉ. संजय तर्डेकर व कॉ. दशरथ घुरे यांनी आपला उचंगी प्रकल्पाला कदापिही विरोध नव्हता फक्त ज्यांनी या प्रकल्पांमध्ये मोठे योगदान दिले आहे अशा प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावेत यासाठी आपण आग्रही होतो असे स्पष्ट केले. यापुढे प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुकुंदराव देसाई यांनी तर प्रास्ताविक अल्बर्ट डिसोझा यांनी केले. आभार शिवाजी नांदवडेकर यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी , आजरा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रचना होलम , मसणू सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, रामाप्पा करिगार, भिकूमामा गावडे, दिगंबर देसाई , गंगाधर व्हसकोटी, महादेव पोवार, बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई , संतोष पाटील, उदय चव्हाण, महाबळेश्वर चौगुले, सुरज जाधव , भीमराव वांद्रे, अनील फडके, आप्पासाहेब गडकरी, ज्योतिबा भिकले, अभिषेक डोंगळे, प्रकाश पाटील, नारायण भडांगे, कॉन्ट्रॅक्टर संजय पाटील, नरेंद्र भद्रापुर, महाबळेश्वर चौगुले, सुभाष देसाई, प्रताप कोंडेकर, जयसिंग चव्हाण, जनार्दन बामणे , विलासराव धडाम, विजय देसाई , राजू होलम , मधुकर यलगार, अभय देसाई , विक्रम देसाई, विठ्ठल देसाई, सुरेश कुराडे , नगरसेवक अभिषेक शिंपी, जयसिंग चव्हाण, सुरेश बुगडे, तानाजी राजाराम, तानाजी बुगडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जोपर्यंत सरकार तोपर्यंतच खासदार मंडलिक शिंदे गटात
खासदार संजय मंडलिक हे आमचेच असून जोपर्यंत भाजप व शिंदे गटाचे सरकार राज्यात आहे तोपर्यंतच ते शिंदे गटात राहतील त्यानंतर ते आमचेच आहेत असेही माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पसरला.
कासेगावकरांचे योगदान
या प्रकल्प उभारण्यात डॉ. भारत पाटणकर यांनी प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले तर आपण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे कासेगावकरांचे योगदान असल्याचे स्पष्ट केले.
संध्यादेवींसह मान्यवरांची आठवण
उचंगी प्रकल्प उभारणी करता माजी खासदार स्व. सदाशिव मंडलिक, माजी आमदार स्व. नारसिंगराव पाटील, माजी मंत्री स्व. बाबासाहेब कुपेकर ,माजी मंत्री भरमूअण्णा पाटील ,बाबुराव गुरबे, माजी मंत्री रामराजे निंबाळकर ,माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रकल्प पूर्ततेसाठी प्रयत्न केले. तर डॉ .भारत पाटणकर कॉ. धनाजी गुरव कॉ. संपत देसाई काँ. अशोक जाधव यांनी प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्वांची आठवण आजच्या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी काढली.





