mrityunjaymahanews
अन्य

उचंगी प्रकल्पाचे  मेव्हण्या-पाहुण्यांनी  श्रेय लाटू नये : शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे

उचंगी प्रकल्पाचे  मेव्हण्या-पाहुण्यांनी  श्रेय लाटू नये : शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे

उचंगी पुनर्वसनासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. आम.राजेश पाटील यांनी केवळ बैठका लावल्या तर खा. मंडलिक यांनी पाणी पूजनावेळी प्रकल्पस्थळी पाय ठेवला.त्यामुळे आमदार व खासदार मेव्हण्या- पाहुण्यांनी उचंगी चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

यावेळी देवणे म्हणाले,आजरा तालुक्याला वरदायी ठरणारा उचंगी प्रकल्प गेली २० वर्षे रखडला. पुनर्वसन १००% व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे व त्यासाठी शिवसेनेने लढे उभे केले. मोर्चा, आंदोलने केली. मंत्रालयात राज्य सरकारला बैठक घेणे भाग पाडले. यावेळी पुर्नवसन, पाटबंधारे, अर्थ खात्याचे प्रधान सचिव यांनाही उपस्थित ठेवले. त्यावेळी दरमहा आजरा येथे पुनर्वसन बैठकीची मागणीही केली व ती पूर्ण केली म्हणून तर पुर्नवसनासाचे प्रश्न मार्गी लागाले.

पाटबंधारे खाते ८०% धरणाचे काम पूर्ण झालेवरही घळभरणी करत नव्हते. आजरा येथे भव्य मोर्चा व टप्प्याने आंदोलन करत अंतीम क्षणी पुजन करुन प्रातिनिधीक घळभरणी केली. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना संघटीत केले व शिवसेना या प्रश्नावर आग्रही राहिली. शेवटी २०२२ साली घळभरणी झाली व उचंगी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.

शिवसेनेने साध्या पध्दतीने उचंगीचे पाणी पूजन केले म्हणून चंदगडच्या आमदारांच्या व खासदारांच्या जिव्हारी लागले व त्यांनीही वाजत गाजत पूजन केले. पण आमचा त्यांना प्रश्न आहे उचंगी प्रकल्पावर पुनर्वसनासाठी घळभरणी झाली नाही त्यावेळी आपण कोठे होता ? जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठक लावली म्हणजे उचंगी प्रकल्प पूर्ण झाला असे नाही. त्यासाठी कष्ट सोसावे लागतात. म्हणून आमदार-खासदारानी मेहूण्या पाहूण्यांनी उचंगीचे श्रेय लाटू नये. आजऱ्याच्या शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे डोळे उघडे आहेत याचे त्यांनी भान ठेवावे.यावेळी तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत , युवराज पोवार , ओमकार माद्याळकर, दिनेश कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

तर राज्यभरातील कष्टकरी जनता रस्त्यावर उतरवू : डॉ. भारत पाटणकर
सर्फनाला प्रकल्लपग्रस्तांच्या मेळाव्यात इशारा

शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय घळभरणीचे काम करू देणार नाही, पोलीस बळाचा वापर करायचा प्रयत्न झाल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील सर्फनाला प्रकल्पग्रस्त तीव्र संघर्ष करतील. वेळ पडली तर राज्यभरातील कष्टकरी जनता रस्त्यावर उतरवू असा खणखणीत इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी आज पारपोली येथील रामलिंग मंदिरात झालेल्या सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात दिला.

ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, चळवळीचे ज्ञान आणि प्रामाणिकपणा नसेल तर लढा फसतो, हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले आहे हे घडायचे नसेल तर प्रामाणिक आणि चळवळीचं ज्ञान असलेलंच नेतृत्व लोकांनी स्वीकारायला हव.. त्यामुळं सर्फनाला प्रकल्पग्रस्तांनी आता आपलं नेतृत्व तपासून घ्यावं आणि मगच लढ्यात उतरावे. यावेळी श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की येणारे वर्ष हे सर्फनाला प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्षाचे वर्ष आहे. त्यामुळे आता आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागणार आहे. पुनर्वसनाचे सगळे प्रश्न सोडविण्याची खात्री मिळेपर्यंत पाटबंधारे खात्याला इकडे आता पाय ठेवू द्यायचा नाही. उरमोडी ते चित्री असा यशस्वी संघर्ष करून श्रमुदने आधी पुनर्वसन मगच धरण हा शासन निर्णय शासनाला करायला लावला. या इतिहासाला जागून आपण संघर्षाला तयार राहूया.

यावेळी नारायण भडांगे, अशोक मालव, हरी सावंत, गोविंद पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अमरसिंग ढोकरे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. यावेळी दशरथ घुरे, निवृत्ती शेटगे, शंकर ढोकरे, प्रकाश शेटगे, धोंडिबा सावंत, तुकाराम गुंजाळ, हरिबा जाधव, कुंडलिक शेटगे, अनिल अमूनेकर, प्रकाश कविटकर यांच्यासह खेडगे, पारपोली आणि गावठाण गावातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित त्या.

पुनर्वसनाचा प्रश्न भावनेवर सोडविता येत नाही.

पुनर्वसनाचा प्रश्न हा भावनेवर सोडविता येत नाही त्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक असते  त्यामुळे सर्फनाला प्रकल्पातील प्रमुख कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर ८ ऑक्टोबर रोजी डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे असे काॅ.संपत देसाई यांनी स्पष्ट केले.

 

संवेदना संजीवनी महारक्तदान शिबीर उत्साहात

संवेदना फाऊंडेशन आजरा मार्फत संवेदना संजीवनी महा रक्तदान शिबीर पं. दिनदयाळ विद्यालय , आजरा येथे पार  पडले .
शिबीराचे उद्घाटन संवेदना महिला शक्ती टीमच्या सदस्या सौ.शुभांगी देसाई , सौ. मिलन केसरकर , सौ.अलका हरेर , सौ.कविता तिप्पे , सौ. सुरेखा खाडे , सौ. सोनम कातकर हस्ते करण्यात आले.
आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील २०० रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आजरा तालुक्यात पहिल्यांद्याच विक्रमी २१३ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता ग्राम पुरस्कार यामध्ये ज्या गावचे सर्वात जास्त रक्तदाते होतील त्या गावाला सन्मानचिन्ह अध्यक्ष श्री.आण्णाप्पा पाटील व उपाध्यक्ष श्री.पांडुरंग पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मडिलगे गावचा तर व्दितीय आजरा  हात्तिवडे गावचा तृतीय  क्रमांक आला.
तसेच भविष्यात हा उपक्रम आणखी मोठा करण्याचा संकल्प डॉ प्रवीण निंबाळकर यांनी मांडला .
या शिबिरासाठी संजीवन ब्लड सेंटर, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.
सर्व रक्तदात्यांना संवेदना कॅप, झाडांची रोपे भेट देण्यात आले. या कार्यक्रमात झोका इन्फोटेंन्मेंट कंपनीच्या झोका यू ट्यूब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम मोफत पहायला मिळेल.
संवेदना संजीवनी टीमचे प्रमुख डॉ. प्रविण निंबाळकर, सचिव श्री संतराम केसरकर सर , डॉ. सुरजीत पांडव, डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. बळीराम पाटील ,वृक्षमित्र श्री.निलेश कांबळे , रोहन होन्याळकर , अमर पाटील , शरद पाटील , प्रशांत हरेर आदी मंडळी नी विशेष सहकार्य केले. श्री सुरेश देशमुख  यांनी सूत्रसंचलन केले .
यावेळी संवेदना फाऊंडेशन चे व झोका इन्फोटेंन्मेंट चे सर्व सदस्य उपस्थित होते.

म्हैशीने फरफटत नेल्याने धरणग्रस्त शेतकऱ्याचा ओढ्यात बुडून मृत्यू

म्हैशीला चारवण्यासाठी गेलेल्या आरदाळ( ता. आजरा)  तानाजी विठोबा बाबर या ५५ वर्षीय धरणग्रस्त शेतकऱ्याचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.सदर घटना शुक्रवार दिनांक २ रोजी दुपारी १२ वाजता घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरदाळ येथील तानाजी बाबर हे म्हैस चारण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते. दरम्यान ओढ्यातील पाणी पाहताच पाण्याच्या दिशेने म्हैस पळू लागली. यामध्ये म्हशीचे दावे त्यांच्या पायात अडकले व  म्हैशीबरोबर ते फरफटत जाऊन ओढ्याच्या पाण्यामध्ये बुडाले.पाय दोरीत अडकल्याने स्वतः चा बचाव करण्यावर त्यांना मर्यादा आल्या यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी शिवाजी विठोबा बाबर यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत .या घटनेबद्दल आर्दाळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews

प्रशांत सयाजीराव देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!