
🟥🟧🟨🟩🟦🟪⬛🟫⬜🟥🟧🟨🟩


हमारे पास बहोत पैसा है म्हणून कारखान्यात आलेल्या अशोक चराटी यांनी कारखाना देशोधडीला लावला…मुकुंदराव देसाई

आजरा: प्रतिनिधी
हमारे पास बहोत पैसा है …म्हणून कारखान्यात आलेल्या अशोक चराटी यांनी कारखाना देशोधडीला लावला . आता मात्र कारखाना अडचणीत आणणारे चराटी मोठ्या बाता मारत आहेत. पण केवळ बोलून कारखाना चालविता येत नाही असा टोला कारखाना संचालक मुकुंदराव देसाई यांनी विरोधी संचालक अशोक चराटी यांना लगावला. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कारखाना कामगार मेळाव्यात ते बोलत होते, अध्यक्षस्थानी संचालक विष्णूपंत केसरकर होते.
केंद्रातून १५० कोटींचे कर्ज मंजूर करून आणण्याची भाषा करणा-या चराटी यांनी कारखाना बंद पडला तेव्हा ही तत्परता का दाखविली नाही? असा सवालही देसाई यांनी केला.
कारखाना सुरू करण्यात जिल्हा बँक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर कामगारांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून यापुढेही सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्याची आमची भूमिका आहे. मात्र विरोधक निवडणूक लावण्यासाठी आघाडीवर आहेत. चराटी यानी जिल्हा बँकेचे साडेतीन कोटी रूपये कर्ज जाणीवपूर्वक थकीत ठेवल्याने इतर कर्ज थकीत राहीले त्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागला त्यातून मंत्री मुश्रीफ यांनी मार्ग काढल्याचे सांगून संस्था चालविणान-याच्या मागे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी कारखाना सुरू करण्यात कामगारांचा त्याग महत्वाचा राहीला असल्याचे सांगितले. कोणतीही गोष्ट तोंडाने बोलणे सोप आहे. पण वास्तव समजून घेतले पाहिजे आम्ही आजही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्नशील आहोत. पण कोणी निवडणूक लादणार असेल तर आम्ही मागे राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. माजी चेअरमन वसंतराव धूरे म्हणाले, गेल्या सात वर्षात पहिली तीन वर्षे चराटी यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी या तीन वर्षात कारखान्यावर शंभर कोटींचे कर्ज केले.त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धूळफेक करू नये असे आवाहनही घुरे यानी केले.

कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश देसाई, कामगार श्रीपती पोवार, धनाजी किल्लेदार यांनी कारखान्याबाबत कामगाराची भूमिका स्पष्ट केली. कारखान्याकडे लक्ष देणार असाल तरच उमेदवारी करा असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ संचालक केसरकर यांनी कारखान्याच्या स्थापनेपासूनचा जाढावा घेतला. विरोधकांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नसल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्याला संचालक एम. के. देसाई, तालुका संघाचे चेअरमन विठ्ठलराव देसाई, धनाजी शिंदे कर्मचारी चंद्रकात सांबरेकर, के. के. कांबळे, रमेश देसाई, संजय उत्तूरकर, बाळासाहेब देसाई, भरत कातकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. अनिल फडके यांनी आभार मानले.
कै.वसंतराव देसाई विकास आघाडी स्थापन
पालकमंत्री हसन मुश्रीफ व आम.सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कै.वसंतराव देसाई विकास आघाडी स्थापन करीत असल्याचे यावेळी विष्णूपंत केसरकर यांनी जाहीर केले.
विद्यमान अध्यक्ष प्रा.शिंत्रे यांच्या भूमीकेबद्दल संभ्रमावस्था…
विद्यमान अध्यक्ष प्रा.शिंत्रे एकीकडे सदर मेळावा सुरू असताना कारखान्यावर उपस्थित असूनही त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
माघारीपूर्वी १५० कोटी आणा माघार घेऊ...
चराटी यानी कोणाकडूनही १५० कोटींचे पॅकेज आणावे. उमेदवारी अर्ज
माघारीच्या मुदतीपूर्वी दोनj दिवस आधी पर्यंत उपलब्ध करावे आम्ही निवडणूकीतून माघार घेऊ असे जाहीर आव्हान जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी चराटी यांना दिले.
द्या.. पण कोठून..?
कारखाना कामगारांच्या बोनससह पगार वाढीचा प्रश्न समोर आला की सहजपणे अशोकअण्णा चराटी देऊन टाका… घेऊन टाका… अशी भाषा वापरतात पण ते द्यायचे कुठून ? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी अद्याप दिलेले नाही असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.
वेळ आली की बोलेन…
अजूनही आपणाला कारखाना बिनविरोध निवडणुकीची आशा आहे. परंतु अशोकअण्णा चराटी जर दिशाभूल करणारी विधाने करत असतील व निवडणूक बिनविरोध झालीच नाही तर मात्र आपण त्यांचा योग्य त्यावेळी समाचार घेऊ असे गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी सांगितले.



ग्रामदैवत रवळनाथ व छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाच धरणातील पाण्याचा जलाभिषेक करणार..
सकल मराठा निर्णय

मराठा समाजाला तातडीने आरक्षण व मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तालुक्यातील पाच धरणांच्या पाण्याचा जलाभिषेक घातला जाणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा जलाभिषेक केला जाणार आहे. चित्री, आंबेओहोळ, एरंडोळ, उचंगी, खानापूर या धरणातील पाणी त्या गावचे सरपंच आजऱ्यात घेऊन येणार आहेत. आजरा तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवांनी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.



व्हिलेज लाईफ फाउंडेशन मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप…

आजरा: प्रतिनिधी
व्हिलेज लाईफ फाउंडेशन मुंबई चे वतीने कोरीवडे (ता. आजरा) येथे विद्या मंदिर कोरीवडे प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कोरीवडे चे सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप रायकर होते.
सुरुवातीला विद्यामंदिर कोरीवडे विद्यार्थिनी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी कवी प्रकाश केसरकर यांनी सोनेरी भुंगा, हसा हसा की हसा, विमान या कविता सादर केल्या. व्हिलेज लाईफ फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त सागर शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्मामातुन राबवत असलेल्या कार्याचा मागवा घेतला.
या कार्यक्रमाला अनिरुद्धफडके, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आदि मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्रभारी मुख्याध्यापक शहानवाज मुल्ला यांनी केले तर आभार विजय कांबळे यांनी मानले.



अतिक्रमणे काढून आमच्या जागेतून रस्ता न्या…
आजरा बस स्थानक परिसरातील जागा मालकांची मागणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा बस स्थानक परिसरात वर्षानुवर्षं अतिक्रमित जागांवर अनेकांनी आपले साम्राज्य उभारले असून यामुळे या अतिक्रमित जागांच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या जमीन धारकांची फार मोठी अडचण झालेली आहे . सध्या आंबोली- गडहिंग्लज या मार्गाचे रुंदीकरण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे .या मार्गाच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण धारक हे अडथळा ठरत असून अतिक्रमणामुळे मार्गाचे रुंदीकरण होऊ शकत नाही . अशावेळी आम्ही आमच्या जमिनी रस्त्यासाठी द्यावयास तयार आहोत परंतु येथे रुंद व प्रशस्त अशा स्वरूपाचा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी आजरा येथील बस स्थानक परिसरातील जागा मालकांनी एका लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे .
मूळ मालकांच्या जागांसमोरच रस्त्या शेजारी अनेकांनी अतिक्रमणे केली असल्याने मूळ मालकांच्या जागा तशाच पडून आहे वेळोवेळी विनंती करूनही अतिक्रमणे काढली न गेल्याने जागामालकांसमोर अनेक अडचणी तयार होत आहेत .किमान आता तरी रस्त्याच्या कारणास्तव ही अतिक्रमणे हटवण्याची प्रशासनाला संधी असून ही अतिक्रमणे तातडीने हटवावीत् व रस्त्याचे रुंदीकरण करावे यासाठी आमच्या जमिनीची गरज असल्यास त्या देण्यास तयार आहोत असेही या निवेदनात म्हटले आहे.



🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬜🟥🟧🟨🟩🟦

🟪🟦🟩🟨🟧🟥⬜🟫⬛🟪🟦🟩🟨

