mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूर

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : आजरा येथील घटना

mrityunjaymahanews BREAKING

 

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू: आजरा येथील घटना

 

दहा दिवसापूर्वी आईचे निधन झाल्याने आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात दशक्रिया विधी करण्यासाठी मित्रासोबत आलेल्या मारुती आनंदा मुडे (रा.पायाचा हुडा,ता.भुदरगड वय ५५) यांचा आईचा दशक्रिया विधी सुरू असतानाच मृत्यू झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की मुडे यांच्या आईचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. आईचा दशक्रिया विधी करण्यासाठी ते आपले मित्र दत्ता कांबळे यांच्यासोबत मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आजरा येथील शिवाजीनगर घाटावर आले होते. दशक्रिया विधी सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे या परिसरात धुणे धुण्यासाठी आलेल्या महिला व आंघोळीसाठी आलेल्या इतर मंडळींमध्ये गोंधळ उडाला. आईच्या दशक्रियाविधी वेळीच झालेल्या या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . मारुती यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

…….

 

भारतीय जनता पार्टी व मनसेचा संयुक्त आक्रोश मोर्चा… एसटी कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा 

महाराष्ट्र राज्यामध्ये ऐन दिवाळी पासून जो एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे . त्यावर आज एक महिना दहा दिवस उलटून देखील तोडगा निघाला नाही . राज्यामध्ये सर्व महाविद्यालये , शाळा तसेच सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. पण गोरगरिबांची लाल परी एस. टी. ची वाहतूक बंद असेलमुळे गोर गरीब जनता, प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांचे वाहतुकीमुळेे  प्रचंड हाल होत आहेत.
राज्य सरकारने एस. टी.कर्मचाऱ्यांच्या मागणीचा योग्य तो विचार करून लवकर निर्णय घ्यावा आणि चालू असणारा संप लवकरात लवकर मिटवावा. महाराष्ट्रातील जनतेचे, शालेय विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत. अशी मागणी आजरा तालुका भारतीय जनता पार्टी व मनसेच्याया वतीने आक्रोश मोर्चा काढून  करण्यात आली. छत्रपती. शिवाजी महाराज स्मारकापासून आजरा तहसील  कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार  आजरा यांना प्रवाशी संघटना आणि सर्व प्रवाशी नागरिक यांच्यातर्फे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी  माजी उपसभापती निवृत्ती कांबळे , मनसेचे  आनंदा घंटे, भाजपा नगरसेविका सौ. शुभदा जोशी , प्रवाशी संघटनेचे सचिन इंदलकर, पुनम भादवनकर ,  कामगार संघटनेचे मुंढे , भाजपा तालुका अध्यक्ष  सुधीर कुंभार यांची भाषणे झाली.
यावेळी आजरा तालुक्यातील सर्व विद्यार्थी, प्रवाशी बांधव, नागरिक, भारतीय जनता पार्टी आणि मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा अर्बन बँकेमार्फत उद्योजकांना मार्गदर्शन शिबिर

 

कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांमधील  सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित झाली आहे. या योजने अंतर्गत असंघटीत उद्योगांना ३५% इतके अनुदान केंद्र शासना मार्फत मिळणार आहे. केवळ अनुदान एवढ्या पुरता हा विषय मर्यादीत न राहता या उद्योगांना सक्षमपणे उभे राहण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून ते ब्रॅंडींग आणि विपणन यासाठी देखील सहाय्यभूत साखळी तयार करण्याचे काम या योजने मार्फत होणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी विशिष्ट उत्पादन निश्चित केले आहे. याशिवाय अन्य उत्पादनासाठी आणि सध्या चालू असलेल्या उद्योगांसाठी व्यवसाय वाढ, आधुनिक तंत्रज्ञान सुधारणा इत्यादी बाबींसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. बहुराज्यीय असणारी दि आजरा अर्बन कोऑपरेटीव्ह बँक आपल्या ३२ शाखांद्वारे या उद्योगांना नेहमीच आधार देणारी ठरलेली आहे. या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आणि या योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी  दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा येथे उद्योजक मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय कृषी सह-संचालक श्री.उमेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री.ज्ञानदेव वाकुरे, तालुका कृषी अधिकारी श्री. खलिद मोमीन हे उपस्थित राहणार आहेत. अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री.अशोक चराटी, आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ.श्री.अनिल देशपांडे, उपाध्यक्ष श्री.किशोर भुसारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रशांत गंभीर आणि सर्व संचालक मंडळ यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना माहिती आणि शंका समाधान करून घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य केंद्र मलिग्रे ची रुग्ण कल्याण समितीची दुसरी नियामक सभा खेळीमेळीत पार.

 

मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण कल्याण समितीची दुसरी नियामक सभा  उत्साहात पार पडली. प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रेला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार सलग २ वर्षे प्राप्त झाले. कुटुंब कल्याण चे काम ६५ टक्के, कोविड लसिकरण पहीला डोस १०७ टक्के, दुसरा डोस काम ९६ टक्के झालेबददल रुग्ण कल्याण समिती सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. तसेच एन सी डी संदर्भात सिम्पल अॅप कामाबददल डब्ल्यु एच ओ टिम ने उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. सभेस सर्व कामाचा आढावा डॉ. आर. जी. गुरव वैदयकीय अधिकारी यांनी दिला. सदर सभेस सौ. सुनिता रेडेकर, अध्यक्ष, डॉ. वाय. एस. सोनवणे, श्रीम. शारदा गुरव, श्री. समिर पारदे, श्री. संजय घाटगे, श्री. शिवाजी भगुत्रे, श्रीम. रेश्मा बुगडे, श्रीम. शोभा जाधव उपस्थित होत्या. सदर सभेस प्रा आ केंद्राचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या. श्री. बोकडे आरोग्य सहाय्यक यांनी  आभार मानले.

……..

 

उ-तूर येथील त्रिवेणी व्याख्यानमाला २ जानेवारी पासून

 

उत्तूर येथील त्रिवेणी शैक्षणिक व क्रीडा संस्थे मार्फत २ते ४ जानेवारी दरम्यान संत ज्ञानेश्वर. लोकशिक्षण व्याखयानमाल आयोजित करण्यात आली आहे. २ जानेवारी दिवशी एस जी कुलकर्णी ʼहे आध्यात्मʼ ,३ जानेवारी रोजी दीपा देशमुख ʼयानिजियास येतो घराʼ तर ४ जानेवारी ला हिमतराव पाटील हे कथा कथन सादर करणार आहेत असे अध्यक्ष टी. के. पाटील आणि सांगितले.

……….

श्रीमती अन्नपूर्णा चराटी व संजय देवेकर यांचा सत्कार

आजरा येथील शिक्षणतपस्वी जे.पी.नाईक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांची अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सौ. अपर्णा उपासे यांच्या हस्ते करण्यात आला.याचवेळी दाभिल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संजय देवेकर यांचाही सत्कार ज्येष्ठ संचालक कृष्णा येसणे यांच्या हस्ते करण्यात आला. गडहिंग्लजच्या मुख्याध्यापक संघाने संजय देवेकर यांचा त्यांच्या स्वच्छ, सुंदर व आदर्श माध्यमिक शाळेबद्दल गौरव केला. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे दहावीचा निकाल १००% लावण्याची परंपरा कायम राखली आहे. सहकारी शिक्षक, सेवक यांच्या सहकार्याने त्यांनी हायस्कूलच्या इमातरीचेही बांधकाम केले आहे.सत्कार सभारंभावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, संचालक श्रावण जाधव, रविद्र देसाई, नंदकुमार पाटील, शिवाजी बिद्रे, सौ.मुग्धा चराटी उपस्थित होते. सभारंभाचे आयोजन संतोष जाधव संजय तेजम व सुभाष पाटील यांनी केले.

…….

 

आजरा साखर कारखान्यात १,५१,००० व्या साखर पोत्यांचे पूजन

 

आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादीत झालेल्या १ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे हजेरी पटावरील पहिले कामगार श्री. निवृत्ती जानबा जाधव त्याच्या सुविध्य पत्नी सौ नंदा निवृती जाधव यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे व सर्व संचालकांचे उपस्थित आजरोजी संपन्न झाला.

आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात ४९ दिवसांत १३४२६० मे.टन ऊसाचे गाळप करून १,५१,६०० मे. टन साखरेचे उत्पादन झाले असुन सरासरी ११.२८ टक्के इतका साखर उतारा प्राप्त झालेला आहे. यावेळी कारखाना चेअरमन श्री. सुनिल अर्जुन शिंत्रे यांनी कारखान्याचे गाळप नियोजना प्रमाणे व्यवस्थित सुरू असून, या गळीत हंगामात किमान ४ लाख मे.टन गाळप करणेसाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे. तसेच सर्व कारखान्यांचे बरोबरीने प्रति टन रू. २९००/- प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्यावेळी पाठविणेत आले आहे. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणेची बिलेही देणेत आलेली आहेत. येथुन पुढेही येणा-या ऊसाचे बिलेही वेळेत आदा करणेचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याकडे नोंदविलेला संपुर्ण ऊस आणण्याची जबाबदारीही कारखाना व्यवस्थापनानी आहे आणि याचे संपुर्ण नियोजन व्यवथापनाने केलेले आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. आनंदा कुलकर्णी, संचालक श्री. विष्णु केसरकर, श्री. वसंतराव धुरे, श्रीमती अंजना रेडेकर, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. दिगंबर देसाई, श्री. सुधिर देयाई, मारूती घोरपडे, मधुकर देसाई, सौ. सुनिता रेडेकर, सौ. विजयालक्ष्मी देसाई श्री. लक्ष्मण गुडुळकर, श्री.मलिककुमार बुरूड, श्री. अनिल फडके, श्री. आनंदा कांबळे, श्री. तानाजी देसाई, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. श्री.टी.ए.भोसले, जनरल मॅनेजर (टेक्नी) श्री. व्ही.एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेजर श्री.एस.के.सावंत, सेकेटरी श्री. व्ही. के. ज्योती. मुख्य शेती अधिकारी श्री.एस. आर. चौगुले आदी खातेप्रमुख, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.

………..

कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय येथे Pharmacist आवश्यकता आहे. संपर्क साधावा.
9765646788
7499688188
…………

संबंधित पोस्ट

यात्रेच्या पहिल्या दिवशीच पाटील कुटुंबियावर कोसळला दुःखाचा डोंगर…

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!