mrityunjaymahanews
कोल्हापूर

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार…? किटवडे येथील प्रकार

 

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार…? किटवडे येथील प्रकार

 

किटवडे

(ता.आजरा) येथील दत्तू झीलू चव्हाण यांचा बेपत्ता असणारा बैल जंगल कक्ष क्रमांक १८४ मध्ये मृतावस्थेत आढळला. मंगळवार पासून बेपत्ता असणारा बैल मृतावस्थेत आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी स्थानिक वनपाल सुरेश गुरव यांच्याशी संपर्क साधला असता या परिसरामध्ये बिबट्यासह तरसाचा वावर आहे. बैल मृतावस्थेत व कुजलेल्या स्थितीत आढळल्याने नेमका वाघाच्या हल्ल्यात मृत झाला आहे की जखमी अवस्थेत असताना बिबट्याने हल्ला केला आहे याबाबत संभ्रमावस्था असल्याचे सांगितले. तर आंबोली परिसरात वावर असणाऱ्या वाघाच्या हल्ल्यात बैल मृत पावला असावा अशी शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

 

बेकायदेशीर बंदूक बाळगल्या प्रकरणी फरार पोर्टे अखेर गजाआड

 

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी आजरा तालुक्यातील धामणे व उत्तूर येथे छापे टाकून बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करण्यात आलेल्या चार बंदुका ताब्यात घेतल्या. सदर प्रकरणाची कुणकुण लागताच राधानगरी येथील संदीप पोर्टे हा फरार झाला होता. पोलिसांनी बाबुराव विठ्ठल लोकरे, सुनील आण्णा लोहार, कृष्णा शिवराम धामणकर, (तिघेही रा. धामणे) व विजय दिनकर घोरपडे (रा.उत्तूर) या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. यातील काही साहित्य हे संदीप रघुनाथ पोर्टे यांच्याकडून खरेदी केल्याचे समजते. पोलिसांनी छापासत्र सुरू केल्याचे लक्षात येतात पोर्टे हा फरारी झाला होता. पोलिसांनी चौघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संदीप पोर्टे याचीही शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. राधानगरी येथून त्याला दोन बंदुकासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

दारूच्या नशेत बहीरेवाडी येथे एकाची आत्महत्या

 

दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या बहीरेवाडी (ता. आजरा) येथील विजय कल्लाप्पा वरुटे (वय ३८) याने लोखंडी जिन्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी पत्नी वैशाली वरुटे यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

आज-यासह उत्तूर येथील शिवप्रेमी आक्रमक

हिंदुस्तान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच बंगळूर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या मार्गर्शनाखाली सर्व शिवभक्तांनी आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक व कानडी झेंडा जाळून निषेध केला त्या वेळी वामन सामंत, नौशाद बुडडेखान, बुरुडे सरपंच महेश कांबळे, राहुल नेवरेकर, तौफिक आगा, शशी अंगणे, रोहित सुतार, प्रदीप डोंगरे, भुपेश कुंभार, स्वराज्य तालीम मंडळाचे सर्व कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.

छत्रपती युवा ग्रुप उत्तुर तर्फे  निषेध 

छत्रपती युवा ग्रुप उत्तुर ता. आजरा वतीने बंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना च्या निषेधार्थ उत्तुर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दुधाचा अभिषेक केला व शिवभक्त मावळे यांच्या उपस्थितीत निषेध करण्यात आला. राजमाता जिजाऊ फाउंडेशन व छत्रपती युवा ग्रुप उत्तुर व शिवभक्त यांनी बेंगळुर येथे झालेली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबविटंबनेचातीव्र शब्दात निषेध केला. यावेळी उत्तुर व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी चा संप त्वरीत मिटवा : भाजपाची मागणी

महाराष्ट्र राज्यामध्ये ऐन दिवाळी पासून जो एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. त्यावर आज दीड महिना उलटून देखील तोडगा निघाला नाही. राज्यामध्ये सर्व महाविद्यालये, शाळा तसेच सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत आणि गोरगरिबांची एस.टी. वाहतूक बंद असेलमुळे सर्वसामान्य जनता, प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांचे वाहतुकीचे प्रचंड हाल होत आहेत.
राज्य सरकारने एस. टी.कर्मचाऱ्यांच्या मागणीचा योग्य तो विचार करून लवकर निर्णय घेऊन चालू असणारा संप लवकरात लवकर मिटवावा. आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा.
ह्या मागणी करिता उद्या सोमवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी छ. शिवाजी महाराज स्मारक आजरा येथे सकाळी ठीक १० वाजता प्रवाशी संघटनेला आणि सर्वच प्रवाशांना पाठिंबा देणेसाठी जास्तीत जास्त संख्येने सर्व भाजपा कार्यकर्ते आणि प्रवासी जनतेने उपस्थित राहावे. यावेळी तहसीलदार कार्यालय आजरा येथे निवेदन देण्यात येणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष सुधिर कुंभार यांनी सांगितले.

 उत्तुर ग्रामपंचायतीला महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कार प्राप्त

प्रधान मंत्री आवास योजना,ग्रामीण अंतर्गत व महाआवास अभियान अंतर्गत राबवण्यात आलेल्या अभियानात उत्तूर (आजरा) ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध योजना अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात उत्तूर ग्रामपंचायत अग्रेसर राहिल्याने उत्तूर ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार या प्रकारात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार व शासनाचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.यासाठी ग्रामसेवक नुले, सरपंच वैशाली आपटे, महेश करंबळी, उमेश आपटे, डॉ. सचिन पोवार,सचिन उत्तुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

उत्तूरच्या केंद्र शाळेची  हीरक महोत्सवाकडे वाटचाल…

आजरा तालुक्यातील उत्तूर येथील केंद्र शाळेची हीरकमहोत्सवाकडे वाटचाल सुरु आहे. तळागाळातील, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा नंदादीप असणारी उत्तूर येथील केंद्र शाळेची स्थापना १९५१ साली झाली. आधुनिक. शिक्षणाचे शिल्पकार, जगविख्यात शिषणतज्ञ डॉ.जे.पी नाईक यांनी तालुक्यातील वंचितांना शिक्षण मिळावं तसेच कोणी शिक्षणापासून लांब राहू नये.या उद्देशाने सुरू केलेल्या या शाळेकडे आज ‘आदर्श शाळा’ म्हणुन पहिले जाते.

शालेय विद्यार्थ्यांना ‘व्यंकटराव ‘ मध्ये समुपदेशनपर कार्यक्रम

 व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांचे समुपदेशन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .त्यामध्ये मोबाईलचा अतिरेक वापर व दुष्परिणाम, लैंगिक अत्याचार विषयी माहिती ,पोक्सो कायद्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत,तसेच विद्यार्थी आपल्या करिअर कोणत्या दिशेने घेऊन जावे ,खेळ, स्पर्धा परीक्षा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच, अमली पदार्थ व पोलीस ११२ या वाहनाबद्दल माहिती देण्यात आले. यावेळी संस्था चेअरमन जयवंतराव शिंपी व प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

आजरा कारखाना साखर गाळप

 

दिवस-४८

एकुण गाळप-१,३०,६६० मे.टन साखर उत्पादन एकुण- १,४७,३०० क्विंटल

सरासरी उतारा – ११.२६

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!