mrityunjaymahanews
कोल्हापूरमहाराष्ट्र

आजरा अर्बन बँकेचा अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योजगांसाठी मेळावा उत्साहात

 

आजरा अर्बन बँकेकडून अन्न -प्रक्रिया सूक्ष्म उद्योजकांसाठी अल्प व्याजदर योजना… आजरा येथे उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र शासन कृषि विभाग जिल्हा कोल्हापूर आणि दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) यांचे संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया सुक्ष्म उद्योजकासाठीचा कार्यक्रम अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृह आजरा येथे पार पडला. कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.

कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांमधील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मा. श्री. उमेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री. ज्ञानदेव वाकुरे, उपविभागीय कृषि अधिकारी मा. श्रीमती भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी मा.श्री. मोमीन यांनी दिली. या योजने अंतर्गत असंघटीत उद्योगांना ३५% इतके अनुदान केंद्र शासना मार्फत मिळणार आहे. या योजने अंतर्गत गूळ, राईस, नाचणी, काजूगर, आवळा, कोकम इ. सूक्ष्म उद्योगाची माहिती देणेत आली. त्यानंतर विविध उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंका समाधान कृषि अधिकारी यांनी केलेले आहे. या बरोबर आजरा अर्बन बँकेच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित झाले बद्दल विभागीय कृषी सह-संचालक श्री. उमेश पाटील यांनी बँकेचे आभार मानले. या बरोबर श्री. अशोक येळकर (जिल्हा संसाधन व्यक्ती) यांनी DRP बद्दल सविस्तर माहिती दिली.

बहुराज्यीय असणारी दि आजरा अर्बन कोऑपरेटीव्ह बँक आपल्या ३२ शाखाद्वारे या उद्योगांना नेहमीच आधार देणारी ठरलेली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने अन्न प्रक्रिया सुक्ष्म उद्योगासाठी बँकेकडून कर्जासाठी १०% व्याजदर करणेत आलेची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी दिली याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती केली आहे.

बँकेचे चेअरमन मा. डॉ. अनिल देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तर आभार बँकेचे व्हा. चेअरमन मा. श्री. किशोर भुसारी यांनी केले. यावेळी भागातील उद्योजक, अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे संचालक श्री. अशोक चराटी, संचालक श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, श्री. प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, श्री. रमेश कुरुणकर, श्री. बसवराज महाळक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुनिल मगदूम, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याधिकारी श्री. तानाजी गोईलकर यांनी केले.

……………………………………………………..

संबंधित पोस्ट

अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…एकाचवेळी दोन हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर…सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले; ‘शिवसेना’ नाव सुद्धा वापरता येणार नाही

mrityunjay mahanews

ऊस ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला बेलेवाडी घाटातील प्रकार

mrityunjay mahanews

आजऱ्यातील गणेश बनणार करोडपती???…चाळोबावाडी येथील वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर … खाजगी व्यक्तीने वर्गखोलीचा ताबा घेतल्याने विद्यार्थी वाऱ्यावर…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!