mrityunjaymahanews
अन्य

आजऱ्यात मनसेचे खळ्ळ -खट्याक : नगरपंचायतीचे गाळे अखेर मूळ मालकांना देण्याचा निर्णय…… पोलिसांकडून साडेपाच लाखांची दारू नष्ट….. चारचाकी ने धडक दिल्याने जाधेवाडीतील महिला जखमी

आजऱ्यात मनसेचे खळ्ळ -खट्याक : नगरपंचायतीचे गाळे अखेर मूळ मालकांना देण्याचा निर्णय

 

आजरा : प्रतिनिधी

आठवडा बाजाराचे औचित्य साधून मनसेच्या कार्यकर्त्यांनी भुदरगड पतसंस्थेचे शेजारील नव्याने बांधण्यात आलेले’ ते ‘ वादग्रस्त गाळे
हातोडा चालवून मूळ व्यवसायीकांकरिता खुले केले. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकामसह आजरा नगरपंचायत प्रशासनाने नमती भूमिका घेतली.

आजरा येथील भुदरगड पतसंस्थशेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्या शेजारीच नऊ गाळे बेकायदेशीररीत्या बांधण्यात आले आहेत . हे गाळे बांधत असताना मूळ मालकांना वाऱ्यावर सोडल्याने शहरातून नाराजीचा सूर उमटत होता. याबाबत मनसेचने आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले ,उपजिल्हाध्यक्ष सुधीर सुपल,तालुकाध्यक्ष अनिल नेऊंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामवर निवेदनांचा मारा केला होता, सदर गाळे तातडीने हलवण्यास आंदोलनाचा इशारा दिला होता,आज या पार्श्वभूमीवर रवळनाथ मंदिर येथे मनसैनिक मोठ्या संख्येने जमले. मोर्चाने गाळयांच्या ठिकाणी आल्यानंतर नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागावर यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. हे गाळे कायदेशीर आहेत का? नसतील तर त्याला जबाबदार कोण? यांना परवानगी दिली कोणी? असे विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांनी मूळ गाळेधारकांना गाळे वाटप करताना प्राधान्य दिले असल्याचे सांगितले. ज्या गाळेधारकांना गाळे मिळाले नाहीत त्यांना आपण कुलूप तोडून गाळे परत देणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सांगत गाळयाचे कुलुप तोडले. यावेळी झालेल्या चचेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सावंत, नागेश चौगुले, आनंदा घंटे, अनिल नेउंगरे, अनिरुद्ध केसरकर यांनी भाग घेतला.

यावेळी चंद्रकांत सांबरेकर, पुनम भादवणकर, सरिता सावंत , तेजस्विनी देसाई, शोभा कांबळे, सुरेखा पोतनीस, यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.                    …………….

 

आजरा पोलीस व उत्पादनशुल्ककडून साडेपाच लाखांची जप्त दारू नष्ट

आजरा पोलिसानी बेकायदेशीररित्या विक्री केली जाणारी, वाहतूक केली जाणारी, व साठा करून ठेवलेली अशी विविध गुन्हयात जप्त केलेली सूमारे साडेपाच लाख रुपयांची दारू आज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आली.

आजरा पोलिसांनी गेल्या दोन वर्षात विविध ठिकाणी कारवाई करत सदर दारू  जप्त केली होती. यामध्ये गोवा बनावटीसह हातभट्टीच्या दारूचा समावेश होता. या जप्त दारुमुळे पोलीस स्टेशनच्या दोन खोल्या अडून होत्या. दारू सांभाळणे पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले होते. अखेर आज गांधीनगर गायरान येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, युवराज जाधव उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक शिंदे, नगरपंचायतीचे कर्मचारी, महसूल विभागाचे शासकीय पंच यांच्या उपस्थितीत सदर दारू नष्ट करण्यात आली.

चारचाकीच्या धडकेत महिला जखमी

आजरा -आंबोली मार्गावर  आजरा पोलीस ठाण्याच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने जाधेेवाडी येथील यशोदा भिकाजी हरेकर (वय ६०) ही महिला जखमी झाली. तिच्यावर आजरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले आहे.

………………..

ओबीसी आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांचे आंदोलन

भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय हे मुलभूत हक्क देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही इतर मागास प्रवर्ग वर्गासाठी (O.B.C) प्रस्थापित झाले नाहीत. हे हक्क मिळविण्यासाठी लोकसंख्या निहाय सल्ला आणि संपत्तीचे वाटप झाले पाहिजे. यासाठी राजकीय हक्क अधिकार हे मुलभूत आहेत. त्या मध्ये सेवाकरी ओ.बी.सी समाजाला वाटा मिळविण्यासाठी व आम्हाला शासनाकडून हक्काचे ओ.बी.सी. आरक्षण मिळावे यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑरगनायझेशन मार्फत तालुका अध्यक्ष-आजरा अब्दुलहमिद बुड्डेखान यांच्या नेतृत्वाखाली आजरा येथे आंदोलन केले आहे.

या आंदोलनामध्ये बापू मुल्ला, शहर अध्यक्ष कोल्हापूर, रफिक शेख जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, हाजी गुलाब बागवान, मजिद मुल्ला माजी अध्यक्ष, जुबेर माणगावकर, नौशाद बुड्डेखान, सरवर मुजावर, अझरूद्दीन तकीलदार, शम्स ताकिलदार आदि उपस्थित होते.

होन्याळी  (ता.आजरा) येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीची पायाभरणी..

ग्रामपंचायत होन्याळीच्या नवीन मंजूर झालेल्या ग्रामपंचायत इमारतीचा पायाभरणी समारंभ पार पडला यावेळी सरपंच काशिनाथ तेली, वसंत धुरेसो ,पं.स.सदस्य शिरीष देसाई , माजी सरपंच उत्तम देऊसकर, मारुती घोरपडे , वसंत पाटील, सागर वागरे, रमेश भाटले यांच्यासह गावातील विवीध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते,आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

देवर्डे हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन

देवर्डे (ता. आजरा) येथील श्री. रवळनाथ हायस्कुल मधील १० वीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष सावंत होते. शाळेतील विज्ञान शिक्षक देवेंद्र शिखरे यांनी करिअर निवडीचे फ्रेम वर्क समजावून दिले. आवड, क्षमता, आणि संधी यांचे संबंध तसेच करिअरची विविध क्षेत्रे समजावून सांगितली. त्याचबरोबर ताण- तणाव व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. ताण: तणाव कमी करण्याचे उपाय सूचविले. मुख्याध्यापक सुभाष सावंत यांनी मुलांचे व घरच्यांचे संबंध कसे असावेत, किशोर वयात झालेले बदल, मुलांनी आपल्या आईवडीलांना समजावून घ्यावे या विषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन मेळाव्यासाठी चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, राजेंद्र पाटील या शिक्षकासह, विद्यार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार आकाश कुंभार याने मानले.

प्रा. संभाजी सावंत यांना पीएच.डी. पदवी

 

 

 

 

खेडूत शिक्षण मंडळाच्या र.भा.माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.संभाजी शिवाजी सावंत यांना डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ची पीएच.डी. पदवी नुकताच जाहीर झाली .सावंत यांनी कोल्हापूर विभागातील भात प्रक्रिया व्यवसायाचा आर्थिक अभ्यास या विषयावर आपला प्रबंध डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला सादर केला होता.त्यांनाअंबड, जि.जालना येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डाॕ.मारोती तेगमपुरे यांचे मार्गदर्शन लाभले .महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.पी.आर.पाटील यांचे तसेच संस्थेचे सर्व संचालक व सहकारी प्राध्यापक यांचे प्रोत्साहन लाभले.

ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल

चव्हाणवाडी- विजयी उमेदवार-सौ. मंगल बळवंत भोळे
खोराटवाडी विजयी उमेदवार- अपूर्वा सौरभ खोराटे

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेचे नूतनीकरण व उद्घाटन..

mrityunjay mahanews

आजऱ्यात मारामारी…

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!