आजरा:-प्रतिनिधी
साळगाव मार्गावरील बंधा-यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर गव्याच्या व मोटारसायकलच्या धडकेत पेरणोली येथील संदिप निवृत्ती नावलकर (वय ३८) हा तरुण जखमी झाला आहे. नावलकर हे सोमवार दि ८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता आज-याच्या दिशेने जात होते. यावेळी बंधाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर सोहाळे मार्गाजवळ अचानक गवा आडवा आला. त्यामुळे त्यांचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने गव्याला मोटारसायकल धडकली. यावेळी नावलकर खाली कोसळल्याने त्यांच्या तोंडाला व हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर तातडीने खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. 

