mrityunjaymahanews
भारतमहाराष्ट्रराजकीय

कॉंग्रेसचे निवडणुकीपूर्वी महागाई विरोधात आंदोलन

काँग्रेसचे निवडणुकांपूर्वी ‘जन जागरण अभियान’; महागाईविरोधात देशभरात आंदोलन

विशेष प्रतिनिधी:-

१४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले होते.केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारविरोधात काँग्रेस आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. काँग्रेस वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन देशभरात आंदोलन करणार आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत घोषणा केली. १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. या अभियानांतर्गत अर्थव्यवस्थेचे अपयश, बेरोजगारी तसेच महागाईचे प्रश्न अग्रस्थानी असतील. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी शेती आणि शेतकऱ्यांवर होणारे हल्ले, अभूतपूर्व बेरोजगारी, वाढती महागाई या विरोधात लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले होते.

यामध्ये काँग्रेसने पक्षाचे खासदार, आमदारांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबरपासून केंद्राच्या विरोधात पदयात्र, प्रभातफेरी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन समितीची बैठक सोमवारी झाली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी- वड्रा राज्यातील निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये अशाच सभा घेऊ शकतात आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना देशाच्या विविध भागांना भेट देण्यास सांगितले आहे. प्रचाराच्या शुभारंभाच्या अगोदर, काँग्रेस १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान वर्धा, महाराष्ट्र येथे कार्यकर्त्यांच्या गटासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

त्यांना अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील तज्ञांकडून जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांना प्रभावित झालेल्या समस्यांना कसे स्पर्श करायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल. भाजपाच्या राजवटीत इंधनाच्या किमती वाढणे, महागाईचे परिणाम, कृषी कायदे आणि बेरोजगारी यासंबंधीची आकडेवारी पक्ष कार्यकर्त्यांकडे असेल.

संबंधित पोस्ट

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

देवेंद्र-अमृता फडणवीस व राज ठाकरेंमध्ये गुप्तगू …भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्येचा प्रयत्न… राज्याच्या मुख्य सचिवांना ईडीचे समन्स…कृषी कायदे घ्यावे लागले मागे

mrityunjay mahanews

Breaking News…

mrityunjay mahanews

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी सात जणांना अटक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!