शिवसेनेची विजयादशमी ! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि पालिकेची याचिका फेटाळली
शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थी (शिवाजी पार्क) ही परंपरा आहे. मात्र यंदा शिंदे गटामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला. या वादावर उच्च न्यायालयात सुरू झालेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी तर शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास बाजू मांडली. मात्र युक्तीवादात शिवसेनेचा युक्तीवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरत शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे.
सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली
दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात तिन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची शिवसेनेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेच्या वतीने अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडताना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्याहस्तक्षेप याचिकेविरोधात जोरदार युक्तीवाद केला होता. सदा सरवणकर यांच्या हस्तक्षेप अर्जात विसंगती आहेत. केवळ आमचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही एवढाच त्यांचा हेतू आहे. सर्वोच्च न्यायालयात खरा शिवसेना पक्ष कोणता हा विषय प्रलंबित वगैरे अर्जातील काही मुद्दे या विषयाच्या बाबतीत पूर्णपणे निरर्थक. त्याचा या कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही, असा खणखणीत युक्तीवाद शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यामुळे सदा सरवणकर यांनी केलेली याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने युक्तीवाद मान्य केल्याचे दिसत आहे.

उ


सभासदांच्या विश्वासाहर्तमुळे संस्थेची यशस्वी घौडदौड : जनार्दन टोपले
स्वामी विवेकानंद पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा कोरोना महामारीचे आलेल संकट व या संकटामुळे सर्वसामान्य सभासदांसह सर्वच क्षेत्रामध्ये विपरीत परिणाम होत असतानाही सभासदांचा विश्वास व कर्मचारी वर्गाचे कष्ट या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी केले. ते संस्थेच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

सभेच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष टोपले म्हणाले, आजरा तालुक्यातील विकासाची गंगा अशी ओळख असणारा आजरा साखर कारखाना निधीअभावी बंद पडण्याची वेळ आली. परंतू सभासदांना विश्वासात घेऊन तब्बल दहा कोटी रूपयांची आजरा कारखान्याला मदत करून कारखान्याला नवसंजिवनी देण्यास हातभार लावला आहे. सद्या संस्थेचा सुवर्णमहोत्सव सुरू असून सभासदांना १२ टक्के प्रमाणे डिव्हीडंट देण्यात येणार आहे. सभासद व ठेवीदारांनी आपला विश्वास कायम ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेच्या गतआर्थिक वर्षातील ताळेबंद व आर्थिक पत्रकाचे वाचन जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी केले. अहवाल सालातील मान्यवरांना श्रद्धाजंलीचा ठराव संचालक सुधीर कुंभार यांनी मांडला. संस्थेचा सुवर्णमहोत्सव व उत्कृष्ट कामकाजाचे अवचित्य साधून संस्थेच्या मुंबई शाखेसह मडिलगे येथील सभासदांनी संचालकांचा विशेष सत्कार केला. सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेने राबविलेले उपक्रम व संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल सतीश कोगेकर यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडल
सभासदांच्यावतीने प्रा. सुधीर मुंज, शिवाजी येसणे, प्रा. विजय बांदेकर यांनी विविध सुचना केल्या. या सभेला बापु टोपले, संचालक मलिकुमार बुरूड, नारायण सावंत, रवींद्र कांबळे, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, संजय घंटे, सुरेश कुंभार, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर यांच्यासह विविध शाखांचे व्यवस्थापक शाखा चेअरमन अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

समाजाला दिशा देण्याचे काम सैनिकांनी करावे : आ. प्रकाश अबिटकर
आजऱ्यात माजी सैनिक व विधवा वीरपत्नी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव
उत्साहात
आजचा समाज राजकीय, सामाजीक अंगाने ढवळून निघाला आहे. या समाजाला शिस्त लावण्याचे व दिशा देण्याचे काम सैनिकांनी करावे असे प्रतिपादन राधानगरी, भुदरगड आजराचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील माजी सैनिक पत संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळीअण्णा भाऊ समूहाचे प्रमूख अशोक चराटी म्हणाले, जीवाचे रान करून रक्षण करणान्या सैनिकाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे.
डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, सैनिक कर्तव्य करत आला आहे तर आता राजकीय आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. विलास सुळकुडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व जेष्ठ सैनिक ,माजी सैनिक व यांचा सत्कार करण्यात आला.ह्नहन
याप्रसंगी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जयवंतरावं शिंपी,संभाजी सावंत,डॉ. अनिल देढापांडे, गोविंद केरकर, दत्तात्रय मोहिते, दिनकर पाटील, एकनाथ पाटील, गोपाळ बुवा, रंजना जाधव, सुशिला शेंद्रेकर, गोविंद निऊंगरे, मारूती फडके, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.
स्वागत शंकर पाटील यांनी केले . प्रा. शिवाजी पारळे यांनी सुत्रसंचलन केले तर व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी आभार मानले..

‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजऱ्यात ग्रंथदिंडी

आजरा सुपुत्र, साहित्यिक ‘मृत्युजंय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित आजऱ्याचे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्यावतीने आजरा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. व्यंकटराव हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला.
आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.
या ग्रंथदिंडीमध्ये आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, पं. दीनदयाळ विद्यालय व आजरा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. वाचन मंदिराच्या सभागृहामध्ये वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, रमेश कुरूणकर, एस. पी. कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, संभाजी इंजल, ज्योतीप्रसाद सावंत, सुरेश डांग, व्यंकटराव हायस्कूलचे प्राचार्य सुरेश खोराटे, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे, भरत बुरूड, बाळासाहेब आपटे, पी. बी. पाटील, बी. एम. दरी, उपाध्यक्षा गीता पोतदार, इराण्णा पाटील, डॉ. सुधीर मुंज, वामन सामंत, महमंदअली मुजावर, रवींद्र हुक्केरी, डॉ. अंजनी देशपांडे, विद्या हरेर, पंकज कांबळे, संतोष डांग, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडूसकर, निखील कळेकर, महादेव पाटील, अमृत घेवडे उपस्थित होते. संभाजी इंजल यांनी आभार मानले.
मृत्युंजय महान्यूजच्या वतीने आम.आबिटकर यांनी केले अभिवादन

‘मृत्युंजय महान्यूज’च्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मृत्युंजयकार’ शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार आबिटकर दिली आज आमची लोकांच्या साहित्यिक कलाकृतीचा आढावा घेतला याप्रसंगी , विजय थोरवत, इंद्रजीत देसाई, पत्रकार रणजित कालेकर, उदय चव्हाण संतोष भाटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



