दि.१ आक्टोंबर २०२४

कागीनवाडीच्या महिलेची
आज-यात आत्महत्या…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रेपैकी कागीनवाडी (ता.आजरा) येथील सोनाबाई बाळकृष्ण कुरळे या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आजरा येथील चित्री नदीच्या पात्रात आज सकाळी आढळून आला. सदर महिलेने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी…
आजरा शहरापासून जवळच असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलावरून जाताना काही स्थानिक नागरिकांना पाण्यामध्ये तरंगत असलेला मृतदेह आढळून आला.पाहता पाहता येथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. स्थानिक पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले.
अधिक चौकशी करता सदर मृतदेह हा सोनाबाई कुरळे यांच्या असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची वर्दी अण्णासो गंगाजी सावंत (रा.कागिनवाडी( यांनी आजरा पोलिसात दिली असून एस. जे. भदरगे पुढील तपास करीत आहेत.

जल्लोष आणि उत्साहात युवा महोत्सव
आज पारितोषिक वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जल्लोष आणि उत्साहात आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस सुरु असलेला मध्यवर्ती युवा महोत्सव पार पडला.
पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय समूह गीत, लोकनृत्य, एकांकिका, लोकनृत्य, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह आजरा शहरवासीयांनी कार्यक्रमांना हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते शरद भुताडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला
१ कोटी ७४ लाख नफा…
सभासदांना १२ % डिव्हीडंड मंजूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला गत अहवाल सालात रु. १ कोटी ७४ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती व्हा. चेअरमन दयानंद भुसारी यांनी संस्थेच्या ५२ व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलताना दिली. सुरुवातीला संस्थेचे व्हा. चेअरमन दयानंद भुसारी, जेष्ठ संचालक नारायण सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी सभा नोटीस, ताळेबंद व आर्थिक पत्रकाचे वाचन केले. संचालक शिवाजीराव येसणे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला व्हा. चेअरमन भुसारी म्हणाले, संस्थेकडे ४ कोटी ४७ लाखाचे वसुल भागभांडवल असून १८२ कोटी ७० लाखापेक्षा अधिक ठेवी आहेत, १४५ कोटी ४२ लाख कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ६०कोटी ७५ लाख आहे. अहवाल वर्षात ३२८ कोटीचा व्यवसाय केला असुन संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
संस्थेच्या व्यवहार वाढ व प्रगती करीता सभासद सतिश कोगेकर, बंडोपंत चव्हाण, भैरु शेलार, दिगंबर नार्वेकर यांनी सुचना मांडल्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्हा. चेअरमन दयानंद भुसारी, संचालक सुधीर कुंभार व जनरल मॅनेजर कुंभार यांनी समर्पक दिली.
सन २०२३ २४ सालाकरीता सभासदांनी डिव्हीडंड १२% मागणी केले प्रमाणे सभेत सर्वानुमते मंजूर करणेत आला.
यावेळी संस्थेचे संचालक रविंद्र दामले,रणजित पाटील, शिवाजीराव येसणे गणपत जाधव, विश्वजित मुंज, राजेंद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, संचालिका सौ. सुनिता कुंभार, सौ. सारीका देसाई, आनंदा मस्कर, शंकर हळवणकर, शंकर नावलकर, पांडुरंग परीट, निवृत्ती डोंगरे, धनाजी कुंभार तुकाराम पाटील सुकाणु समिती सदस्य अरुण देसाई, मलिककुमार बुरुड, डॉ.सुधीर मुंज, उत्तम कुंभार, संस्थेचे जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.
आभार संचालक सुधीर कुंभार यांनी मानले.

शासनाने काढलेला जी आर रद्द करावा. अन्यथा मते मागायला येवू नये. काॅ.अतुल दिघे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणीकामगारांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईत देण्यात यावी, यासाठी शासनाकडे सातत्याने रस्त्यावरची लढाई केली जात असताना, मांडवली करणाऱ्या शासनाने परिपत्रक काढून, गिरणीकामगारांना मंबई बाहेरचा रस्ता दाखवला असून, येत्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी काढलेले परिपत्रक रद्द करावे अन्यथा शिंदे सरकारने मत मागायला येवू नये असे मत किसान भवन आजरा येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलताना काॅ. अतूल दिघे यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले.
गिरणीकामगारना भुलवण्यासाठी काही टोणगे तयार होत आहेत. त्यांना त्याची जागा दाखवण्याचे आव्हान काॅ. शांताराम पाटील यानी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा पेन्शन संघटना सचिव काॅ. आप्पा कुलकर्णी यांनी केंद्र शासनाने पेन्शनरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी काॅ. गोपाळ गावडे गिरणीकामगार चंदगड तालूका अध्यक्ष, काॅ.संजय घाटगे, महादेव होडगे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी दौलती राणे, हिंदूराव कांबळे, शांताराम हारेर, मनप्पा बोलके, जानबा धडाम, दयानंद कांबळे, विठ्ठल बामणे, राजश्री कुंभार, अनिता बागवे, प्रभावती राणे, शांता करडे, सुगंधा पन्हाळकर, नंदा वाकर, याच्या सह गिरणी कामगार उपस्थित होते.
आबा पाटील आभार यांनी मानले.
शासनाने गिरणीकामगाराना मुंबईच्या बाहेर घरे देण्याच्या परिपत्रकाची रस्त्याच्या कडेला होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी गिरणीकामगारांना मुंबईतच मोफत घर मिळाले पाहीजे अशा घोषणा देण्यात आल्या.

दाभिल येथे शुक्रवारी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल (ता. आजरा) येथे दसऱ्यानिमित्त शिव शंभो सांस्कृतिक, कला, व क्रीडा डा मंडळाच्या वतीने संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुल्या गटात होणार असून शुक्रवार दि. ४ आक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ५५५५, ३३३३, २२२२ रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील अधिक माहितीसाठी अनिल सुतार, तानाजी हासबे, विजय राणे (९५४५२२५५९७) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वाती गुरव यांना शिक्षकरत्न पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कै.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर यांच्यावतीने जीवन शिक्षण मंदिर मुत्नाळ ता.गडहिंग्लज शाळेच्या शिक्षिका स्वाती सुरेश गुरव यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार डॉ. बी. एम. हिरडेकर (माजी परीक्षा नियंत्रक,शिवाजी विद्यापीठ, कुलसचिव संजय घोडावत विद्यापीठ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,शिष्यवृत्ती,प्रज्ञाशोध परीक्षा, सहशालेय स्पर्धापरीक्षा तज्ञ मार्गदर्शक, जि.प.अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये यश,समूहनृत्य, समूहगीत सांस्कृतिक स्पर्धेत यश,जि.प.सिंधुदुर्गचा विशेष उपक्रम ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत सलग तीन वर्षे यश,उपक्रमशीलता,आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन,पर्यावरण स्नेही उपक्रम आयोजन,५ लाख ४३ हजार रुपयांचा स्व-प्रयत्नातून शैक्षणिक उठाव, शिक्षक प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक, शासकीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी सहभाग, आपत्ती व्यवस्थापन व केलेली मदतकार्य,मराठी भाषा विशेष सुधार उपक्रम अशा कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

निवड…
श्रीपती यादव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीपती रामचंद्र यादव, उत्तूर यांची आजरा तालुक़ा संजय गांधी निराधार समिती सदस्य पदी नियुक्ति झाली आहे .

(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



