
शासनाच्या बदलत्या धोरणामुळे खत वितरणात अडचणी ; विठ्ठलराव देसाई
तालुका खरेदी विक्री संघाची सभा ‘ हाऊसफुल्ल ‘

शासनाच्या बदलत्या धोरणामुळे तालुका खरेदी विक्री संघाकडून तयार केल्या जाणाऱ्या हातमिश्रित खताचा सभासदांना,शेतकरी वर्गाला वेळेत पुरवठा करण्यात आला नाही यामुळे शेतकरी वर्गाची गैरसोय झाली असा प्रकार परत होणार नाही याकरिता काळजी घेतली जाईल. ज्या सभासदांचे भाग- भांडवल पूर्तता अद्याप केलेली नाही त्यांनी त्वरित पूर्तता करावी असे आवाहन तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई यांनी केले. ते आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सभेच्या सुरुवातीस अध्यक्ष देसाई व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
अहवाल सालातील विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवर, सभासद यांच्या श्रद्धांजलीच्या ठराव संचालक उदय पवार यांनी मांडला.
यावेळी बोलताना अध्यक्ष देसाई म्हणाले, अतिशय काटकसरीने तालुका संघाचा कारभार सुरू आहे. यामध्ये सभासद व कर्मचारी वर्गाचे योगदान मोठे आहे. सर्वसामान्यांची संस्था अशी ओळख असणाऱ्या संघाचा कारभार यापुढेही पारदर्शक ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी विद्यमान मंडळावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आर्थिक पत्रकांचे वाचन व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी केले.
सभेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुण प्राप्त सभासदांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभासदांच्या वतीने आजरा साखर कारखान्याचे संचालक तानाजी देसाई, इंद्रजीत देसाई (वेळवट्टी), तुळसाप्पा पोवार,हमीद बुड्डेखान यांनी विविध सूचना केल्या.

सभेस जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई, माजी पं. स. सभापती विष्णूपंत केसरकर, माजी उपसभापती दीपक देसाई, कॉ. संपत देसाई, आजरा साखर कारखान्याचे संचालक मारुती घोरपडे,अनिल फडके, दिगंबर देसाई, वसंतराव धुरे, रणजीत देसाई, विक्रम देसाई, सुरेश, देसाई भीमराव वांद्रे, मारुती देशमुख, शंकर पावले, धनाजी शिंदे सचिन पावले अमोल भांबरे, जम्बो गोरूले, तानाजी राजाराम, राजू मुरकुटे, गोविंद पाटील, यांच्यासह तालुका संघाचे संचालक एम.के. देसाई, महादेव हेब्बाळकर, महादेवराव पाटील धामणेकर, अल्बर्ट डिसोझा, राजाराम पाटील, संभाजी तांबेकर, डॉ. राजलक्ष्मी देसाई, सौ. मायादेवी पाटील, मधुकर यलगार, दौलती पाटील, ज्ञानदेव पोवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे, गणपती कांबळे, महेश पाटील सभासद व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचलन एकनाथ गिलबिले यांनी केले तर उपाध्यक्ष गणपतराव सांगले यांनी आभार मानले.

युक्रेन- रशिया युद्धामुळे सूत उद्योग अडचणीत
अशोकअण्णा चराटीअण्णा-भाऊ सहकारी सूतगिरणी ची सभा संपन्न

युक्रेन – रशिया युद्धाचे अप्रत्यक्ष परिणाम सूतगिरण्यांवर झाले असून कच्चामाल मिळवण्याबाबत सुरू असलेल्या अडचणी, कापसाचा तुटवडा, सुताला नसलेला उठाव अशा विचित्र परिस्थितीमध्ये सूतगिरण्यांची वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीतही आजरा सुतगिरण सुरू आहे. महाराष्ट्रातील काही मोजक्या व चांगल्या सूतगिरण्यांमध्ये आजरा सूतगिरणीचे नाव घेतले जाते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. सूतगिरणी मध्ये स्वयंचलित अशी आधुनिक यंत्रसामग्री आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार रुपये २००० च्या पटीत भाग खरेदी करणे बंधनकारक असल्याने सभासदांनी याकरिता सहकार्य करावे असे आवाहन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले.अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.
स्व. काशिनाथअण्णा चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी व उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेस सुरुवात झाली.
दत्तात्रय दोरूगडे यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
सूतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी यांनी मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा नकारात्मक परिणाम सूतगिरणीच्या वाटचालीवर झाला आहे. यातूनही सर्व सभासद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केल्याने सूतगिरणी चांगल्या स्थितीत आहे. यापुढेही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सभेमध्ये वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संचालक अशोकअण्णा चराटी यांच्यासह सूतगिरणीचे नूतन स्वीकृत संचालक अनिकेत चराटी, राजू पोतनीस,डॉ. संदीप देशपांडे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आजरा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर,सुरेश डांग,संजय चव्हाण, विलासराव नाईक, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते,किशोर भुसारी, ॲड.सचिन इंजल,बंडोपंत चव्हाण,
संचालक डॉ. संदीप देशपांडे, डॉ.इंद्रजीत देसाई, जी. एम. पाटील, राजू पोतनीस, नारायण मुरकुटे, सौ. मनीषा कुरुणकर,श्रीमती मालुताई शेवाळे अनिकेत चराटी, शंकर उर्फ भैया टोपले ,अमोघ वाघ,सौ.शामली वाघ सूतगिरणीचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन सटाले यांनी केले तर सूर्यकांत नाईक यांनी आभार मानले.

निंगुडगे मध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने गणेश उत्सव जल्लोषात

निंगुडगे येथील श्री. बसवेश्वर तरुण मंडळाने उत्सव काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक प्रबोधन केले. पहिल्या दिवशी विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळ व महिलांच्या सहभागाने दिंडींचे आयोजन करून पारंपरिक पद्धतीने गजराजाचे आगमन झाले.
दुसऱ्या दिवशी ‘रक्तदान शिबिराचे ‘आयोजन केले होते. ‘थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा ‘ या सामाजिक भावनेतून हे शिबिर घेतले. यासाठी गावातील सर्व तरुण मुलांनी या शिबिरात सहभागी होवून आपले सामाजिक हित जपले. या प्रसंगी वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटर चे सहकार्य लाभले.

शनिवार दि.२३ रोजी ‘होममिनिस्टर ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे निवेदन रमेश देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.खेळ ,गप्पा ,मनोरंजन आणि प्रबोधन अश्या परिपूर्ण मिलनाने भरलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण महिलांचे आणि ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधले.या कार्यक्रमाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी सौ. शुभांगी गणपतराव कुंभार. तर उपविजेत्या वंदना रविंद्र मगदूम ठरल्या.
सोमवार दि.२५ रोजी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक- गंगा गौरी ग्रुप, गिजवणे . द्वितीय क्रमांक – महालक्ष्मी ग्रुप निंगुडगे. व तृतीय क्रमांक – वक्रतुंड ग्रुप अत्याळ यांनी पटकवला.
तसेच उत्सव काळात संगीत खुर्ची, डोक्यावर घागर घेऊन धावणे, डोळे बांधून मडके फोडणे, लिंबू चमचा असे लहान मुलांपासून ते महिला वर्गापर्यंत सर्व समावेशक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सर्व ग्रामस्थांच्या व महिलांच्या सहभागाने उत्सव जल्लोषात संपन्न झाला.

व्यंकटराव हायस्कूल तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वप्रथम

येथील व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील १७ वर्षाखालील मुले या गटात शिरसंगी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. आदर्श हायस्कूल शिरसिंगी चे मुख्याध्यापक एम.एम. नागुर्डेकर उपस्थित पंच व क्रीडा शिक्षक यांचे हस्ते या संघाला गौरविण्यात आले.
या जिल्हास्तरीय खेळासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याना आजरा महाल
शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे शेलार त्यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक एस. एम. पाटील, संघ व्यवस्थापक ए. एस. गुरव व एस. व्ही. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
पाऊसपाणी
गेल्या २४ तासात आजरा शहर व परिसरात १४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे..


