
गव्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन…
बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज- आजरा मार्गावर हॉटेल बिग बॉसच्या समोर मुंगूसवाडी कडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये मोटरसायकल वरील उस्मान कानडीकर ( वय वर्षे ६५) हे गंभीर जखमी झाले होते दरम्यान आज त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर रहमान लमतुरे ( वय वर्ष ४५ दोघेही रा. आजरा) गंभीर जखमी झालेले आहेत.
दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी कानडीकर यांचे निधन झाले.
गोंधळ बिगर शेतीचा…
चक्क जमिनीचे नकाशे बदलले…(बिगरशेती भूखंडांचे श्रीखंड)
प्रशासकीय यंत्रणा हाताला लागल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आजरा येथील गेल्या काही वर्षात झालेल्या बिगरशेती प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चक्क जमिनींचे नकाशे बदलून, मूळ कागदपत्रे गायब करून पद्धतशीरपणे शासकीय जमिनी खाजगी असल्याचे भासवत जागांची अदलाबदल करून भूखंड विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार आता चर्चेत येऊ लागले आहेत.
आजरा येथील बिगर शेती प्रकरणांमध्ये बराच सावळा गोंधळ दिसत आहे. काही प्रकरणांमध्ये जागांमधून जाणारे पारंपारिक रस्ते गायब केले आहेत तर काही प्रकरणांमध्ये विविध कारणास्तव बिगर शेती करताना ठेवावे लागणारे खुले भूखंडही मूळ मालकांनी विकून टाकले असल्याचे दिसत आहे. आजरा – आंबोली मार्गावरील एका जमिनीबाबत अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असल्याचे समजते.
प्रशासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याने खुलेआमपणे असे प्रकार सुरू आहेत. या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करण्यासाठी काही संघटना आता सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे अशा बिगर शेतीची प्रकरणे अनेक मंडळींना शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रीन झोन मध्ये असणाऱ्या जागा खुल्या करून अशा जागावरही प्लॉटिंग करण्यात आले आहे.
अशी प्रकरणे सुरू असताना महसूल यंत्रणा, नगररचना विभाग, भूमी अभिलेख यासह विविध शासकीय यंत्रणा नेमक्या काय करत आहेत ? असं सवालही आता उपस्थित केला जात आहे. अशा प्रकरणांमध्ये काही मंडळींनी रोख स्वरूपात तर काही मंडळींनी बिगर शेती झालेल्या भूखंडापैकी कांहीं भुखंड स्वतःच्या नावावर करून घेऊन अशा प्रकरणात सोयीस्कर भूमिका बजावल्याचेही समजते.
व्यापक आंदोलन करणार….देशमुख
‘ बिगर शेती ‘ प्रकरणातील सर्वच शासकीय विभागांशी संपर्क साधून झालेल्या प्रकरणामधील कागदपत्रांची सत्यता तपासून पाहिली जाणार असून याप्रश्र्नी व्यापक आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले आहे

संवेदना फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

संवेदना फाऊंडेशन , आजरा मधील आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या संवेदना संजीवनी टीम मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते . सदर रक्तदान शिबीराला संवेदना फाऊंडेशनचे कोअर सदस्य तसेच आजरा तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
संवेदना संजीवनी मेडिकल इक्विपमेंट लायब्ररीच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त संवेदना फाउंडेशन मार्फत बुधवार दि . २० सप्टेंबर २०२३ रोजी रक्तदान शिबिर , पंडित दीनदयाळ विद्यालय , आजरा येथे आयोजित केले होते . ह्या शिबिरात तब्बल १३७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आजरा पंचक्रोशीतील आरोग्य सेवेत महत्वाचे योगदान दिले .
सदर शिबिराला उपस्थित असलेले संजीवन ब्लड बँक कोल्हापूर चे डॉक्टर्स , जनसंपर्क अधिकारी तसेच इतर कर्मचारी वर्ग यांचे संवेदना फाउंडेशन मार्फत स्वागत करण्यात आले .
सध्या कारगिल येथे भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले सचिन पाटील यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले . दीनदयाळ हायस्कुल च्या क्रीडा शिक्षिका सौ. सुनीता कुंभार यांनी संवेदना फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांविषयी विषयी आपले विचार मांडले .
संजीवनी टीम चे समन्वयक डॉ. प्रविण निंबाळकर यांनी संवेदना फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांबाबत माहिती दिली .
संवेदना फाउंडेशन चे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांच्या प्रास्ताविका नंतर रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला .
सन २०२२ – २३ ह्या गेल्या एक वर्षाच्या कालावधीत संवेदना फाऊंडेशन च्या माध्यमातून तब्बल १५ गरजू रुग्णांना मोफत रक्त पिशव्या अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत .
गरजू रुग्णांना आपत्कालीन प्रसंगात कोणत्याही प्रकारची धावपळ करावी लागत नाही . अशा प्रकारची तत्पर सेवा फाउंडेशन मार्फत वर्षानुवर्षे पुरवली जात आहे ,
भारतीय लष्करात कार्यरत असलेले सचिन पाटील यांनी रक्तदानाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
सुरेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
बांधकाम मजूर साहित्य पेटी वाटप कार्यक्रम संपन्न

किणे येथे कोळींद्रे गावातील बांधकाम मजूर महिलांना साहित्य व पेटी वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सभापती विष्णूपंत केसरकर , नाना उर्फ आप्पा पाटील, उपसरपंच विजय केसरकर , हरिबा गुडूळकर , संजय पाटील अविनाश पाटील, विकास शेंदरकर ,भिकाजी गोंधळी, तानाजी जाधव , शशिकांत केसरकर उपस्थित होते.
…………………………………………………..
श्री गणेश दर्शन...

श्री.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आजरा, वर्ष…९७ वे
अध्यक्ष :- किशोर म्हापसेकर
उपाध्यक्ष :- सुधीर (बापू) कुंभार
सचिव :- धनाजी पारपोलकर (नगरसेवक)




प्रशासकीय यंत्रणा हाताला लागल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आजरा येथील गेल्या काही वर्षात झालेल्या बिगरशेती प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चक्क जमिनींचे नकाशे बदलून, मूळ कागदपत्रे गायब करून पद्धतशीरपणे शासकीय जमिनी खाजगी असल्याचे भासवत जागांची अदलाबदल करून भूखंड विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार आता चर्चेत येऊ लागले आहेत.