गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५


तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा नाहीतर आमची शेती भाडेतत्त्वावर करायला घ्या…
शेतकऱ्यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा.
तुमचे वन्यप्राणी राहायला जंगलात व खायला आमच्या शेतात येतात आमच्या शेत पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याकडून पंचनामा करून झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई अत्यल्प दिली जाते. एकतर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या नाहीतर आमची शेती तुम्ही भाडे तत्त्वावरती घ्या व वार्षिक उत्पन्नाइतकी रक्कम आम्हाला द्या व तुमचे वन्य प्राणी आमच्या शेतात आल्यास आम्हाला कोणती अडचण नाही. अशा शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
मडीलगे येथे वन विभागाचे नुकसान भरपाई बाबत चर्चासत्राचे ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. वन्य प्राण्यांपासून अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिक नुकसान होत आहे. परंतु त्याची नाममात्र नुकसान भरपाई दिली जाते.
याबाबत कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई आहे, कोण कोणत्या प्राण्यांपासून नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जाते याबाबतची माहिती वन विभाग कर्मचारी श्री. मुजावर यांनी दिली तर यापूर्वी मागील वर्षात एकुण ७२ प्रकरणे मंजूर होऊन मडिलगे गावात ४ लाख ७५ हजार नुकसान भरपाई निधी दिली असल्याचे सांगितले.
या बैठकीला के. व्ही. येसणे, शेतकरी अशोक पोवार, निवृत्ती पाटील, विश्वजीत मुंज, सदाशिव पोवार, गणपती घाटगे, पांडुरंग मुंज, बाळू जाधव, बबन पाटील, मारुती राठोड, सह शेतकरी ग्रामस्थ विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पेरणोलीत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावात सकारात्मक बदल घडावा. लोकसहभागातून गावचा कायापालट व्हावा हाच अभियानाचा मुख्य हेतू आहे. ग्रामस्थांना यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंचायत राज अभियानाचा शुभारंभ प्रा. आबिटकर यांच्या हस्ते झाला. गटविकास अधिकारी सुभाष सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
वाद्यच्या निनादात मान्यवरांचे स्वागत झाले. प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.ग्रामपंचायतच्यावतीने मान्यवरांना रोप देवून स्वागत केले. सरपंच प्रियांका जाधव यांनी प्रास्ताविकात पेरणोली गावातील विकासकामांचा आढावा घेतला. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रा. आबिटकर यांनी पेरणोलीतील अपुरी विकास कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
माजी सभापती उदयराज पवार, युवा आघाडीचे प्रमुख उदय कोडक यांची भाषणे झाली. विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार यांनी अभियानाच्या पुर्वतयारी, घटक व गुण याबाबत माहीती दिली. उपसरपंच संकेत सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र सावंत, तालुका प्रमुख संजय पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, अमर पवार, काकासो देसाई, जितेंद्र भोसले, संदिप नावलकर, अमोल जाधव, रणजित फगरे, सुषमा मोहीते, रुपाली पाईम, सुनिता कालेकर, शुभदा सावंत, जयवंत येरुडकर, राजेंद्र कळेकर, राजाराम कालेकर, मुख्याध्यापक एकनाथ पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय मोहीते यांनी सुत्रसंचालन तर ग्रामपंचायत अधिकारी अमिषा देवर्डेकर यांनी आभार मानले..

आजरा – महागाव मार्गावरील बुरुडे ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे बसवा
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – महागाव मार्गावरील संताजी पुलापासून बुरुडे गावाजवळील ओढ्यापर्यंत रस्त्यालगत मोठ्या वडाच्या झाडामुळे रस्त्यावर नेहमीच गडद अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना तसेच सकाळी व संध्याकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होत असून अपघात किंवा अन्य घटना घडण्याची शक्यता असल्याने या मार्गावर त्वरित पद्धतीने बसवावेत अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, वाय.बी. चव्हाण, दिनकर जाधव, दयानंद भोपळे, सुधीर कुंभार,जावेद पठाण आदींच्या सह्या आहेत .

निधन वार्ता
बाबुराव फडके

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी ता. आजरा येथील बाबुराव गोपाळ फडके ( वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, दोन भाऊ, सुना, नातवंडे मोठा परीवार आहे .
पोलीस पाटील पुंडलिक फडके यांचे ते वडील होत.

वाटंगी शाळेच्या
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उमेश घोरपडे तर उपाध्यक्षपदी रेश्मा कसलकर यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२५ ते २०२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतन शाळा व्यवस्थापन समितीची पालक सभेतून निवड करण्यात आली . यावेळी अध्यक्ष म्हणून श्री. उमेश घोरपडे यांची तर रेश्मा कसलकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अनिल तेजम होते . शाळेच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले . स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सुनिल कामत यांनी केले . नूतन शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी श्री. बबन शिटयाळकर, श्री .अनिल तेजम, श्री. विश्वास कांबळे, श्री सिद्धार्थ कांबळे, सौ. पल्लवी जाधव, सौ छाया जाधव, सौ . सुजाता कुंभार तर ग्रा.पं सदस्य प्रतिनिधी श्री. शिवाजीराव नांदवडेकर , शिक्षण तज्ञ श्री. संदिप देसाई, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. अनिता कुंभार यांची निवड करण्यात आली . शाळेचे मुख्याध्यापक तथा सचिव श्री. सुनिल कामत यांनी नूतन कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रंजना हसुरे मॅडम यांनी केले . तर आभार श्रीमती अनुजा केने यांनी मानले ..

जवाहर नागरी सह. पत संस्थेस २९ लाखाचा नफा : समीर चॉद

आजरा ,: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी संबोधल्या जाणाऱ्या जवाहर नागरी सहकारी पत संस्थेला २९ लाखाचा नफा झाला असल्याचे संस्थेचे संचालक समीर चाँद यांनी संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना म्हणाले. सदर वार्षिक सभेस संस्थेचे चेअरमन इकबाल शेख हे प्रमुख उपस्थित होते.
अहवाल वाचन व्यवस्थापक बशीर अहमद काकतीकर यांनी केले.
समीर चाँद म्हणाले, चालु आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन गतवर्षी वार्षिक उलाढाल १४ कोटीच्या आसपास असल्याचे म्हणाले, सभासदाना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय यावेळी घेणेत आला. संस्था स्थापन झाल्यापासून ते आजतागायत सर्वात जास्त गतवर्षाचा नफा व वार्षिक उलाढाल असल्याचे सांगण्यात आले. संस्थेचे कार्यक्षेत्र आजरा शहरापुरते मर्यादित वरुन कोल्हापूर जिल्हा करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला व त्यास मंजूरी घेण्यात आली.
श्रध्दांजलीचा ठराव संचालक आसिफ दरवाजकर यांनी मांडला. यावेळी संस्थेचे संचालक आसिफ सोनेखान, असलम लमतुरे, इलीयास तकिलदार, इस्माईल बेपारी , सौ. शबनम मुल्ला, सौ. रुक्साना नसरदी उपस्थित होते. संचालक तौफीक आगा यांनी आभार मानले.
सदर वार्षिक सभेस संस्थेचे कर्मचारी हाफिज भडगांवकर, इलियास दखाजकर, खलील दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, आयुन मुल्ला, अकिन दरवाजकर व सभासद उपस्थित होते.

हिंदी भाषा ही भारतीय संस्कृतीची ओळख : प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे,
आजरा महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय राज्यघटनेनुसार हिंदी ही आपली राजभाषा आहे. संपूर्ण भारतीयांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम हिंदी करत आहे. भारत देशात प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र भाषा आहे. परंतु सर्वजण जेव्हा एकत्र येताता तेव्हा एक – दुस-याशी संपर्क करण्याकरिता एका भाषेची गरज असते. ती गरज पूर्ण करण्यची क्षमता हिंदी भाषेत आहे, असे मत प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यानी व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ. सादळे पुढे म्हणाले, आपल्या भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन म्हणजे भाषा होय. परंतु आपली मूळं आणि संस्कृती याना जोडण्याचं कामदेखील भाषाच करते. आणि हे काम हिंदी भाषा अत्यंत प्रभावीपणे करत आहे. तीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हिंदी दिवसानिमित्त हिंदी शब्दशोध, हिंदी शुद्ध लेखन, हिंदी कथाकथन व हिंदी वाक्यप्रचार लेखन स्पर्धांचे आयोजन हिंदी विभागामार्फत करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ, पेन व पुष्प देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांमधील विजेते (अ) हिंदी शब्दशोध : प्रथम क्रमांक – वंदना भागोजी कस्तुरे, द्वितीय क्रमांक नागेश लक्ष्मण गाडीवड्डर, तृतीय क्रमांक माधुरी उदय कांबळे, शुद्ध लेखन : प्रथम क्रमांक तेजल तानाजी कांबळे, द्वितीय क्रमांक हर्षाली किरण पारके, तृतीय क्रमांक – स्मिता बळवंत आडसोळ, हिंदी कथाकथन : प्रथम क्रमांक – तमन्ना जबिला जमाल, द्वितीय क्रमांक – विठ्ठल बयाजी वरक, तृतीय क्रमांक – अथर्व उदय सुतार, (ई) वाक्यप्रचार लेखन : प्रथम क्रमांक – विठ्ठल बयाजी वरक, द्वितीय क्रमांक – तेजल तानाजी कांबळे, तृतीय क्रमांक – वंदना भागोजी कस्तुरे.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. अशोक बाचुळकर यानी केले. श्रीमती संजीवनी कांबळे यानी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रत्नदीप पवार यानी केले. यावेळी व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, श्री. शेखर शिऊडकर, ज्युनियर विभागाचे श्री. विनायक चव्हाण, श्री. अनिल निर्मळे व विद्यार्थी उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ विद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेसाठी समाजाभिमुख व राष्ट्रीय जाणीव वृद्धिंगत करणारे विषय देण्यात आले .आत्मनिर्भर भारत ,पर्यावरण व ऑपरेशन सिंदूर या विषयावर विद्यार्थ्यांनी कल्पक चित्रे काढली व निबंध लेखन केले यातील प्रथम तीन क्रमांक पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे देण्यात आले .तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे आयोजन केले आहे.यासाठी कराटे प्रशिक्षक श्री दिलीप घमे यांना नेमले असून त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजीव देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्री दिलीप घमे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे विविध प्रकार शिकवले. दैनंदिन जीवनात अनेक संकटांना सामोरे कसे जायचे याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. आभार सौ. तेजश्री बुरुड यांनी मानले.


