mrityunjaymahanews
अन्य

आजरा आगारातील चालकाची आत्महत्या…?

आजरा आगारातील चालकाची आत्महत्या…??


आजरा आगारातील चालक प्रकाश अंकुश चौगुले (वय ४०) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांचा मृतदेह आज साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकाराने एकता कॉलनीसह आजरा शहरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक रहिवाशांना एकता कॉलनीतील भाडोत्री घरी राहणारे चौगुले यांच्या घरातून कुजका वास व प्रचंड प्रमाणावर माशांचा वावर आढळल्याने नागरिकांनी तातडीने सदर बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिली. यावेळी चौगुले यांचा मृतदेह  आढळला. सुमारे चार ते पाच दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौगुले यांचे मूळ गाव एकोंडी (ता. कागल) हे आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या घटनेची माहिती घेऊन पुढील तपास करीत आहेत. कौटुंबिक वादातून प्रकाश यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

छाया वृत्त

आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रामतीर्थ परिसरात ३०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

…………

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात आजीच्या समोरच नातीचा विहिरीत पडून मृत्यू

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखाना निवडणूक….

error: Content is protected !!