mrityunjaymahanews
अन्य

दारू दिली नाही म्हणून बार मालकावर तलवारसदृश्य हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न… आजरा येथील घटना

दारू दिली नाही म्हणून तलवार सदृश्य हत्याराने बारमालकावर हल्ला…?

 

बार बंद होण्याची वेळ झाल्यानंतर दारूची मागणी करणाऱ्या असिफ लतिफ, नितीन होआळ दोघे (रा. आजरा)वआयूब शहापुरे (रा. कोल्हापूर) या तिघांना दारू देण्यास नकार दिल्याने बार मालक विनोद मुरकुटे यांना वाईट शिवीगाळ करत तलवार सदृश्य हत्याराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला .सुदैवाने यामध्ये मुरकुटे हे बचावले. रात्री उशिरा सदर प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हॉटेल विनोद बार व रेस्टॉरंट मध्ये वरील तिघेही शुक्रवारी रात्री दारू पिण्यासाठी गेले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बार बंद करणार असे सांगितल्यानंतर त्यांनी आपणाला दारू पाहिजे असा हट्ट धरला. दारू देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी बारमधील बेटर व बारमालक मुरकुटे यांना वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली याच दरम्यान ज्या चार चाकी मधून हे तिघे जण आले होते त्या चारचाकीमधील तलवार सदृश्य हत्यार बाहेर काढून मुरकुटे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने मुरकुटे यांनी तेथून पळ काढत आजरा पोलीस स्टेशन गाठले. मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी आयुब शहापुरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघे जण फरारी आहेत. पोलिसांनी हत्यारासह चारचाकीही ताब्यात घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लग्न ठरवण्याच्या वादातून चाकूने हल्ला… एक जखमी

आजरा येथे सध्या मुक्कामास असणारे व फिरस्ते व्यवसायिक बाळकृष्ण बसवराज भोसले (मुळगाव अस्तपणाळी ता. चणगिरी जिल्हा दावणगिरी) यांनी आपली बहीण अरुण  शिंदे यांना देण्यास त्यांनी नकार दिल्याने अर्जुन रवी शिंदे व अरुण अर्जुन शिंदे(रा.पाटणे फाटा,चंदगड ) या दोघा बाप-लेकांनी त्यांना बेदम मारहाण करून चाकूने वार केला. यामध्ये बाळकृष्ण भोसले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकार भाई-भाई चित्र मंदिराशेजारी घडला. भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन शिंदे व अरुण शिंदे या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आजरा पोलिस करीत आहेत.

मडीलगे येथून महाविद्यालयीन तरूणी बेपत्ता

मडीलगे (ता.आजरा) येथून कु. सुजाता सुरेश शिमणे ही महाविद्यालयीन  तरुणी गुरुवार दिनांक ३ मार्च पासून बेपत्ता आहे. मैत्रिणीच्या यात्रेला जातो असे सांगून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडलेली सुजाता अद्याप घरी परतली नाही. याबाबतची वर्दी सुरेश माधव शिवणे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

लाकुडवाडी येथे पायवाटेवरून वाद… तिघा विरोधात पोलिसात गुन्हा नोंद..

लाकूडवाडी (ता. आजरा) येथील महादेव राऊ मांगले आणि संभाजी धोंडीबा मांगले, सचिन संभाजी मांगले, सुवर्णा संभाजी मांगले हे एकमेकांशेजारी रहात असून त्यांच्यामध्ये एकमेकाच्या हद्दीतून जाणाऱ्या पायवाटेवरून वाद सुरू आहेत. शुक्रवार दिनांक ४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बैलगाडी नेण्याच्या कारणावरून सदर वाद पुन्हा उफाळून आला. यामध्ये संभाजी मांगले, सचिन मांगले व सुवर्णा मांगले यांनी महादेव मांगले यांना शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद महादेव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. यावरून तीघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जवाहर’ पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम सुरू… १२ मार्च रोजी होणार मतदान…. दोन सक्षम आघाड्या आमनेसामने…

आजरा येथील मुस्लिम बांधवांची अर्थवाहिनी अशी ओळख असणाऱ्या जवाहर नागरी पतसंस्थेकरीता १२ मार्च रोजी मतदान होत असून निवडणुकीमध्ये जवाहर सहकार पॅनल व पै. सुलेमानसेठ दीडबाग पॅनल अशा दोन आघाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. सत्ताधारी पै.दीडबाग आघाडीतून  समीर चांद यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. एकूण १३८२ मतदार मतदानाला सामोरे जात आहेत.

सत्ताधारी सुलेमानसेठ दीडबाग आघाडीच्या पाठीशी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अबुताहेर तकिलदार, रियाज तकीलदार, इसाक शेख, इब्राहिम शेख, मुनाफ सोनेखान, मकसूद लमतुरे सिलेमान नसरदी, जमीर लाडजी जब्बार लमतुरे, रजाक सोनेखान आदी मंडळी आहेत. विरोधी जवाहर सहकार पॅनेलनेही सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. या आघाडीच्या पाठीशी रशीद पठाण, आलम नाईकवाडे, इब्राहिम लाडजी, हुसेन दरवाजकर, एम.डी. दरवाजकर, मामु सोनेखान, इब्राहिम इंचानाळकर जुबेर चाँद, अहंमद मुराद,गौस तकिलदार, अबुलास दरवाजकर, मंजूर मुजावर,शौकत लाडजी, मजीद पठाण इब्राहिम लाडजी हुसेन दरवाजकर ही मंडळी आहेत.

सत्ताधारी पै. सुलेमानसेठ दिडबाग आघाडीचे उमेदवार

तौफीक दादापीर आगा, इलियास गुलाब तकिलदार, आसिफ मुस्ताक दरवाजकर, असलम खादिर लमतूरे, इकबाल इब्राहीम शेख, आसिफ मुनाफ सोनेखान.

महिला राखीव- रुकसाना सलमान नसरदी, शबनमबानो अकबर मुल्ला.

इतर मागास प्रवर्ग- इस्माईल युसुफ बेपारी.

जवाहर सहकार पॅनलचे उमेदवार

दिलावर समशुद्दिन चांद,

अहंमद महम्मद तकीलदार, अब्बासअली अब्दुल भडगावकर, अष्कर नन्हू लष्करे,हसन हुसेन शेख, अब्दुलरहेमान हसन सोनेखान

महिला राखीव प्रवर्ग-नजमाबी सिकंदर खलिप, परवीन दाऊद लमतुरे.

इतर मागास प्रवर्ग- महम्मदअली बशीर मुजावर.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एस. पाटील काम पाहत आहेत.

डीजीटल बॅनरद्वारे प्रचार मोहीम सुरू

आजरा बस स्थानकासह शहरातील मोक्याच्या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे डिजिटल प्रचार फलक झळकताना दिसत आहेत. यामुळे ही निवडणूक चूरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

………

 

 

संबंधित पोस्ट

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews

नारायण उर्फ बाबूराव देसाई यांचे निधन स्व. अमृतकाका देसाई कुटुंबीयांवर सहा महिन्यात चौथा आघात

mrityunjay mahanews

आजरा महसूल विभागाच्या अधिकाऱ्याचा कार्यालयातच हृदयविकाराने मृत्यू .

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

साधनाताई : प्रभाग सहाच्या विकासाचे नवे पर्व

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!