mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

आजऱ्यात मारामारी. . तिघे जखमी… तेवीस जणांविरोधात गुन्हा नोंद

 

समोरासमोर राहणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे पर्यवसान मारामारीत.. तीन जखमी… २३ जणांविरोधात गुन्हा नोंद.. आजरा शहरातील प्रकार

आजरा शहरातील दर्गा गल्ली येथे समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील महिलांच्या विनयभंगाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये रजिया अशरफ माणगावकर,जुवेरीया इस्माईल माणगावकर व गौसअमीर माणगावकर हे तिघे जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने तब्बल २३ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत नाझिया मारूफ म्हेतर यांनी दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये २६ फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास व शनिवार दिनांक ५ रोजी सायंकाळी असलम जब्बार मुजावर याने नाझिया व त्यांची भाची जुवेरिया या कपडे धूत असताना त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने वर्तन केले. यासंदर्भातील जाब विचारणे करता नाझिया यांचा भाऊ इस्माईल गेला असता त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली त्याला मारहाण झालेली पाहताच त्यांचे नातेवाईकही गेले. त्यांनाही मारहाण करण्यात आली असे या फिर्यादीत म्हटले आहे. नाझिया म्हेतर यांच्या फिर्यादीवरून अकिब अस्लम मुजावर, अस्लम जब्बार मुजावर, याहिया निजाम बुड्डेखान, नासीर निजाम बुड्डुखान, निजाम अय्युब बुड्डेखान, नौमान नासीर बुड्डेखान, नौफेल नासीर बुड्डेखान, फिरोज निजाम बुड्डेखान , कौसर निजाम बुड्डेखान, रुकसाना निजाम बुड्डेखान, सुमय्या निजाम बुड्डेखान( सर्व रा.दर्गा गल्ली आजरा) या अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान अल्फिया अस्लम मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अल्फिया यांचा विवाह ठरलेला आहे, या रागातून ५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याचा सुमारास त्या स्वच्छतागृहांमध्ये गेल्या असता इमरान माणगावकर,इर्षाद माणगावकर व अब्दुल रहमान या तिघांनी स्वच्छतागृहांमध्ये डोकावून बघून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यापूर्वीही ते वेळोवेळी अल्फियाचा पाठलाग करताना आढळले  आहेत. यावरून वाद होऊन  त्यांना माणगावकर कुटुंबीयांनी वाईट शिवीगाळ केल्याचेही म्हटले आहे. या फिर्यादीवरून इस्माईल गौस माणगावकर, गौस आमिर माणगावकर, जाबीर इस्माईल माणगावकर,जुवेरिया इस्माईल माणगावकर, इमरान इस्माईल माणगावकर, फातिमा (पूर्ण नाव माहीत नाही), अब्दुल रहमान (पूर्ण नाव माहीत नाही) रजिया माणगावकर, इर्षाद माणगावकर, नजिया माणगावकर, रुक्सार (पुर्ण नाव माहीत नाही) रहीमा इस्माईल माणगावकर( सर्व रा. दर्गा गल्ली,आजरा) या बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी एकूण २३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघे जण जखमी झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

वाचकांना विशेष सूचना :-

ज्या वाचकांना या चॅनलवरून बातम्या मिळाव्यात असे वाटते त्यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ९६३७५९८८६६ हा नंबर समाविष्ट करावा.

……………..

 

संबंधित पोस्ट

पोलीस असल्याचे भासवून वृद्धा कडून 35 हजार रुपयांचे दागिने लंपास …पावसाचा पत्ता नाही… रामतीर्थ धबधबा मात्र सुरू…

mrityunjay mahanews

उचंगी संदर्भात पालकमंत्र्यांची बैठक… रामतीर्थ यात्रा होणार.. आजऱ्यातील नाट्यस्पर्धेत ‘स्टार’ची बाजी

mrityunjay mahanews

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले…. आजऱ्यात विविध संघटनांच्या वतीने विजयी रॅली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!