
प्रभाग आठ मधून माझा विजय निश्चित…
सुहेल काकतीकर
अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या आजरा नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग आठ मधील उमेदवार सुहेल अ.सलाम काकतीकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रस्थापित मंडळींना प्रभागातील नागरिक कंटाळले आहेत. प्रभागातील पाणी व स्वच्छतेचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. केवळ वरिष्ठांच्या आशीर्वादावर व पुण्याईवर निवडणुका लढवून एकदा निवडून आल्यानंतर प्रभागाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांपैकी मी नाही. प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यास मी बांधील आहे.
तरुणांना केवळ सेंट्रींग काम व गवंडी काम करण्याबरोबरच इतर लहान सहान कामे करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. केवळ अल्पसंख्यांक व शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक शासकीय योजनां पासून वयोवृद्ध, ज्येष्ठ व गरजू मंडळी वंचित आहेत त्यांना योग्य दिशा दाखवल्यास निश्चितच अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात यासाठी वेळ देण्याची गरज आहे व मी तो वेळ देऊ शकतो.
सुशिक्षित, तरुण व समाजासाठी वेळ देणारा कार्यकर्ता अशी आपली ओळख असून यामुळेच तरुण कार्यकर्त्यांनी आपणाला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विश्वासाला कदापिही कला जाऊ दिला जाणार नाही या प्रभागातून आपला विजय निश्चित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





