बुधवार दि.२६ मार्च २०२५


शंकर उर्फ भैया टोपले यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक व आजरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी शंकर उर्फ भैय्या रामचंद्र (दाजी) टोपले यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६२ वर्षे होते.
टोपले हे आजरा तालुक्यामध्ये नाट्यकर्मी म्हणून ओळखले जात होते. सूत्रसंचलनात त्यांचा विशेष हातखंडा होता. आजरा सह.ग्राहक संस्थेमध्येही त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज बुधवारी सकाळी करण्यात येणार आहेत.

तालुक्यात पहिल्या पावसाची हजेरी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.
पावसामुळे वारंवार विज पुरवठा खंडित होत होता. उसासह उन्हाळी पिकांच्या दृष्टीने कालचा पाऊस समाधानकारक मानला जातो.
तालुक्यातील पेरणोलीसह विविध भागातही पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

पंडित दीनदयाळ हायस्कूलचे यश

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गणित विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय श्री रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत पंडित दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मीरा सुनील हरेर इयत्ता आठवी ही प्रज्ञा प्रमाणपत्र पात्रधारक झाली आहे. तिला गणित शिक्षक श्री.पाटील ए. एन. व श्री.राजोपाध्ये व्ही. व्ही. यांचे मार्गदर्शन व संस्थेचे चेअरमन प्रा.डॉ.सुधीर मुंज व सर्व संचालक ,मुख्याध्यापक श्री. देसाई एस. वाय. यांचे प्रोत्साहन लाभले .
आजरा महाराष्ट्र एसटी कामगार (उ.बा.ठा.) सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगारातील कामगार सेनेची बैठक श्री दत्त मंदिर आजरा येथे पार पडली. सन २०२५-२०२६ करीता श्री सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
अध्यक्ष – मिलिंधर मोरे,उपाध्यक्ष- नारायण हत्तळगे, पुंडलिक गाडे,सचिव-तनवीर काकतिकर,सहसचिव- उमेश सरदेसाई,सूर्यकांत गुरव कार्याध्यक्ष -संदिप खवरे,संघटक सचिव-नितीन पारपोलकर खजीनदार – किरण एरंडोळकर,प्रसिध्दी सचिव- किशोरकुमार देसाई
महिला संघटक सचिव-सौ. दिपा कांबळे सौ रुपाली घडशी ,विभागीय सदस्य- जितेंद्र देसाई, गिरीष पोवार,आगार सदस्य- विजय गुरव, महबुब कोवाडकर, पुरुषोत्तम कनाके, वैभव यादव,दत्ता कांबळे

छायावृत्त

वनविभागाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते धनाजी राणे यांनी नुकतेच परिक्षेत्र वनाधिकारी मनोज शकुमार कोळी यांना निवेदन दिले.




