दि. २२ सप्टेबर २०२४


राष्ट्रवादीची (शरद पवार) आजरा तालुका डॉक्टर्स सेल कार्यकारणी जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनील जगताप साहेब यांच्या आदेशानुसार डॉक्टर्स सेल तालुका अध्यक्ष पदी डॉ. रोहन सुधाकर जाधव यांची नियुक्ती मुकुंदराव देसाई तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन करण्यात आली.
इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
डॉक्टर सेल कार्याध्यक्ष आजरा – डॉ. बर्नाड एफ.गॉडद
डॉक्टर सेल महिला तालुका अध्यक्ष- डॉ. राजलक्ष्मी अजित देसाई
डॉक्टर सेल तालुका उपाध्यक्ष – आजरा डॉ . सुहास तुकाराम गुरव
डॉक्टर सेल ट्रेझरर- डॉ. हिम्मत मनोहर भोसले
डॉक्टर सेल आजरा शहर अध्यक्ष – डॉ. मनोज नारायण पाटील
डॉक्टर सेल आजरा शहर उपाध्यक्ष – डॉ. सुरजीत शिवाजी मोटे
डॉक्टर सेल तालुका मेडिया इनचार्ज – डॉ. अरविंद भिवा जाधव
यावेळी उदयराज पवार, माजी सभापती पंचायत समिती आजरा,रणजित देसाई संचालक, आजरा साखर कारखाना गवसे
राजू होलम संचालक, आजरा तालुका खरेदी विक्री संघ व डॉक्टर्स उपस्थित होते.

‘सन्मित्र’ ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘सर्वसामान्यांचा आर्थिक आधारस्तंभ’ अशी ओळख असणाऱ्या ‘सन्मित्र’ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाटंगी ची आज रविवारी दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालय, वाटंगी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व व्यवस्थापक परशराम गिलबिले यांनी दिली.
वाटंगी सारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा ओळखून आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेकडे ३१ मार्च २०२४ अखेर ७ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांच्या ठेवी असून ४ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेचे एकूण सभासद १५३२ इतके आहे तर संस्थेकडे सद्यस्थितीस ६६ लाख ५४ हजार ७२० रुपये इतके भाग भांडवल आहे. आर्थिक भक्कम अशा पायावर संस्थेची उभारणी असून संस्थेला ३१ मार्च २०२४ अखेर १९ लाख ३९ हजार ५८९ रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संस्थेकडे विविध ठेव व कर्ज योजना असून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्येही संस्था नेहमी अग्रेसर राहिली आहे. गत आर्थिक वर्षाकरिता ‘अ’ लेखापरीक्षण वर्ग प्राप्त झाला असल्याचेही डिसोझा यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपाध्यक्ष भीमराव सुतार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

आजरा तालुका कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
सभेचे औचित्य साधून सहकार पणन व वस्तू उद्योग विभाग, आशियाई विकास बँक अर्थ सहाय्यक महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे व आजरा कॅश्यू असोसिएशन यांच्या विद्यमाने ‘काजू : उत्तम कृषी पद्धती’ कार्यशाळा घेण्यात आली
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.सुभाष घुले, विभागीय उपप्रकल्प संचालक (मॅग्नेट) प्रकल्प कोल्हापूर, प्रकाश कोंडूसकर अध्यक्ष आजरा कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पांडुरंग काणे, डॉ. पराग तुरखडे, शास्त्रज्ञ कणेरी कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले
काजू फळ लागवड हवामान बदलामुळे उत्पादनावर होणारा चांगला- वाईट परिणाम काजू उत्पादनाबरोबरच काजू व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण, काढणी पश्चात हाताळणी, साठवण, विपणन व प्रक्रिया उद्योग याविषयीची माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क काजू उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांना मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत मनुष्यबळ भरती बाबत संदीप देसाई, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आजरा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत सुयोग टकले, व्यवस्थापक पणन मंडळ कोल्हापूर यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश कोंडुस्कर यांनी केले. आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी मानले. यावेळी परेश पोतदार, सुधीर वाघ,नितीन शेवाळे, संदेश भिसे, अनिल जाधव, निशांत जोशी, विकास फळणेकर, अमर सन्ने, विश्वास जाधव, जयसिंग खोराटे, संदीप पवार,सुरेश चौगुले, भास्कर निकम यांच्यासह काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक उपस्थित होते.

स्वतंत्र तालुका मागणीसाठी उत्तूरमध्ये सह्यांची मोहीम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल शनिवारी (दि. २१ रोजी) उत्तूर ता.आजरा येथील आठवडी बाजारामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी उत्तूरला स्वतंत्र तालुका म्हणून मान्यता मिळावी यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम थेट बाजारात बसून सुरू केली. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून बऱ्याच तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या सह्या शासनाला पोहोच केल्या जाणार आहेत.
उत्तूर स्वतंत्र तालुका झाल्यास उत्तूर गावच्या जवळपास असणाऱ्या चार तालुक्याच्या लांब अंतर पडणाऱ्या नागरिकांना चांगला फायदा होणार असून लोकांचा वेळ, पैसा व श्रम वाचण्यासाठी मदत होणार आहे.
राज्य शासनाने नवीन तालुके निर्माण विभाजनासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे असे समजते. उत्तूर स्वतंत्र मागणीबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी अहवालही मागवले आहेत. तसे लेखी आदेश आजरा – भुदरगडचे प्रांताधिकारी यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र प्रा.शिवाजीराव परुळेकर यांना आले आहे. अशी माहिती शिवाजी गुरव यांनी दिली.

(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता : समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969
व्यंकटराव मध्ये कौशल्य विकास केंद्रांतर्गत अभ्यास वर्ग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव प्रशालेमध्ये कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागामार्फत
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यासाठी आजरा तालुक्यातील व्यंकटराव महाविद्यालयाची निवड करण्यात आली असून त्याचा फायदा तालुक्यातील युवक युवतीना होणार आहे.
या केंद्राचे उदघाटन अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव एस. पी. कांबळे, आभिषेक शिंपी, सुनिल देसाई, व शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

आज-यात आज रक्तदान शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यांतर्गत भारतीय जनता पार्टी, आजराच्या वतीने वैभव लक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सहकार्याने आज रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृति दालन, जुनी पोस्ट गल्ली, आजरा येथे सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी दिली.



