mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजऱ्यात धुवॉंधार…
साळगाव, ऐनापुर बंधारे पाण्याखाली


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यात  पावसाची संततधार सुरुच असून हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. साळगाव बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. ऐनापुर बंधाऱ्यावरही पाणी आले आहे.

      पावसाने तालुक्यातील सुमारे १५ घरांची पडझड सुरु झाली आहे. तालुक्यात चोवीस तासात ९० मिलीमीटर पावसासह सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

     ऐन श्रावण महिन्याच्या अखेरीस पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाने आता विश्रांती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

उद्याच्या आंदोलनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन

‘टोल ‘मुक्ती आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बुधवार दि.२८ रोजी होणारा टोल मुक्ती आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार टोल मुक्त मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले .

     यावेळी काँ.संपत देसाई म्हणाले, टोलमुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.शासन निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार आहे.विभागातील तीन आमदार,खासदार लोकप्रतिनीधींनी प्रयत्न करावा.केवळ केंद्र सरकार नव्हे तर राज्य सरकारही याला जबाबदार आहे.टोल हटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून राज्य सरकारने केंद्र सरकारला पैसे द्यावे.टोलचा प्रश्न निकाली निघेल.

      डाँ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले, जनतेचा टोलबाबत गैरसमज आहे.जनतेची मागणी नसताना राज्य मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा दिला आहे.तो चार पदरी नाही,दुभाजक नाही तसेच कोणत्याही सुविधा नाहीत तर का टोल लादला जात आहे.आमदार प्रकाश अबिटकर यांनी सांगूनही टोलचे काम रात्रीचे सुरू करण्यात आले आहे.प्रभाकर कोरवी म्हणाले, टोलमूक्ती झाली नाही तर विधानसभेत परीणाम भोगावे लागतील.आमदार अबिटकर यांनी ठरवले तर राज्य मार्गात रूपांतर करायला वेळ लागणार नाही असे प्रकाश मोरुस्कर यांनी सांगितले.

      यावेळी साखर कारखाना,काजू कारखाना,ट्रक वाहतूक,रिक्षा चालक,विविध संघटना यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

         यावेळी परशुराम बामणे,पांडूरंग सावरतकर,गोविंद पाटील,रविंद्र भाटले,वाय बी चव्हाण, दशरथ घुरे,रवी देसाई,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

रामगिरीच्या अटकेची कारवाई करा…
मुस्लिम बांधवांची मागणी


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      प्रेषित पैगंबर मुहम्मद यांच्या बद्दल रामगिरीचा चोला ओढून बसलेल्या भोंदू बाबाने दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी केलेल्या अंत्यत अपमानास्पद आणि व्देषपुर्ण माहितीहीन वक्तव्य केले ज्याच्या विरोधात संबंध राज्य व देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, या वर्तनामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि समाजात असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे पैगंबर मुहम्मद संपुर्ण जगताचे नबी असून त्यांना सर्वस्व मानणारे तब्बल ४०० कोटी लोक जगभरामध्ये राहतात, अशा कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याच काम या रामगिरीचा चोला ओढून बसलेल्या भोंदू बाबाने केली आहे. या भोंदू बाबा वर कारवाई व्हावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

      संबंधित घटनाक्रमाबाबत तक्रारींची नोंद केली गेली आहे, तरीही अद्याप तातडीने कारवाई होत नसल्याने समाजातील असंतोष व नाराजीचा सूर वाढत आहे. सदर प्रकरणात तातडीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या प्रशासनाने रामगिरीच्या अटकेसाठी तत्परतेने व कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     निवेदनावर हाफीज इरफान आबुतालीब चाँद,हाफिज नोमान मुहम्मद खलीफ,जमील नुरहुसेन नीशांदारै,म. गौस मुल्ला बबलु पाटेवाले,अ. मजिद भाई मुल्ला,सरफराज जैनापुरे ,टीपु वसिम मुल्ला, फारूक नसरदी सलाऊदीन शेख, असलम खेडेकर,आदिल नेसरीकर,सैफअली सिराज आदींच्या सह्या आहेत.

 सर्वसामान्यांच्या  विकासात रवळनाथ पतसंस्था अग्रेसर राहील : चेअरमन अभिषेक शिंपी


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       बहुजन समाजातील गोरगरीब सामान्य लोकांनी सुरु केलेली ही पतसंस्था निश्चितपणाने यावर्षी ठेवीचा २५ कोटीपेक्षा पुढचा टप्पा पार करेल असा विश्वास आहे. येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ५० कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून संस्थेची प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी केले. ते श्री रवळनाथ पतसंस्थेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व जि. प. चे. माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

     स्वागत संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना अध्यक्ष शिंपी म्हणाले, आगामी काळातही संस्थेच्या कामकाजात काही धोरणात्मक बदल करुन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन संस्थेची प्रगती सुरुच ठेवणार आहे, याला सभासदांचेही सहकार्य नक्कीच मिळेल असा विश्वास आहे. संस्थेतील सोने तारणासह इतर सर्व साहित्य व इमारत यास विमा कवच सुरु केले आहे. संस्थेला अहवाल सालात १९ लाखांवर नफा झाला असून १५ कोटींच्या ठेवी आहेत असेही अध्यक्ष शिंपी यांनी स्पष्ट केले.

     सुरुवातीला श्री रवळनाथ देवाच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजलीचा ठराव संचालक श्री किरण कांबळे यांनी मांडला. त्यानंतर दहावी, बारावी परीक्षेतील यश मिळविलेल्या सभासदांचे पाल्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, ज्येष्ठ सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला.

      अहवाल वाचन मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले.यावेळी जयवंतराव शिंपी, माजी अध्यक्षा सौ. सुरेखा फडके, संचालक इब्राहीम इंचनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

      सभेला उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, के. जी. पटेकर, सचिन शिंपी यासह सभासद उपस्थित होते.आभार संचालक विक्रम पटेकर यांनी मानले.

फोटो क्लिक…


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेवर चाकू हल्ला :आजरा येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दरोड्याचा २४ तासात तपास ….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!