mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


महाराज जिंकले…


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या
निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी तयांनी शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा १ लाख ५४ हजार ९६४ मतांनी पराभव केला. अखेर कोल्हापूर वाशी यांनी सन्मानासह मते देखील शाहू छत्रपतींना दिल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.

       या निवडणुकीत शाहू छत्रपती यांना ७ लाख ५४ हजार ५२२ तर मंडलिक यांना ५ लाख १९ हजार ५८८ मते मिळाली.

करवीर विधानसभा मतदारसंघात ७१ हजार ३९५, तर राधानगरी मतदारसंघात ६५ हजार ६०४ इतके मताधिक्य शाहू छत्रपतींना मिळाले. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये मंडलिक यांना १३ हजार ८५८ चे मताधिक्य मिळाले. अन्यथा सर्वत्र शाहू छत्रपती आघाडीवर राहिले.

आज-यातील तीनही उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली. तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने मंडलिक यांना मताधिक्य दिले तर आजरा शहरासह तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागाने शाहू छत्रपतींना साथ दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

‘मृत्युंजय महान्यूज ‘ चा अंदाज खरा ठरला.

     मतदान प्रक्रिया पार पडतात मृत्युंजय महान्यूजने शाहू छत्रपतींना आजरेकरांनी दिला हात… अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून आजरा शहरातून अडीच ते तीन हजार व तालुक्यातून पाच ते सात हजारांचे मताधिक्य शाहू छत्रपतींना मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला. आजरा शहरातूनही सुमारे ३११४ इतके मताधिक्य शाहू महाराजांना मिळाले आहे.


    शाहू महाराजांच्या मतांच्या आघाडीचे वृत्त शहरांमध्ये जसजसे पसरत गेले तस- तसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली व आपला आनंद व्यक्त केला.

भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा-नेसरी मार्गावर यमेकोंड येथे भर पावसात डांबरीकरण करण्यात आले. वास्तविक कडक उन्हामध्ये डांबरीकरण करणे आवश्यक असताना केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे काल मंगळवारी दुपारी पावसाच्या सरी कोसळत असतानाच डांबरीकरणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. आता हे डांबरीकरण किती दिवस टिकणार ? हे संबंधित शासकीय विभागाला आणि त्या ठेकेदारांनाच ठाऊक.

      आता जून महिन्यात ठिकठिकाणी सुरू असणारे डांबरीकरण किमान थांबवावे अशी मागणी तालुकावासीय करत आहेत.

होनेवाडीच्या उपसरपंचपदी सौ.संगिता विश्वास सुतार


           आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         होनेवाडी ता.आजरा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.संगिता विश्वास सुतार यांची बिनविरोध निवड झाली.तानाजी पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती सरपंच श्रीमती प्रियांका आजगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत सौ. संगीता विश्वास सुतार यांची बिनविरोध निवड झाली शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ए.व्ही. देसाई यांनी काम पाहिले.

सिद्धी पाटील चे NEET परीक्षेत यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (वैद्यकीय शिक्षण NEET) निकाल जाहीर झाला असून आजरा येथील सिद्धि संदिप पाटील या विद्यार्थीनेने ७२० पैकी ६६६ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

      सिध्दी हिने माध्यमिक शिक्षण रोजरी हायस्कूल आणि बारावीचे शिक्षण सांगली  येथून घेतले आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जमिनीच्या वादातून भाऊ-बहिणीमध्ये हाणामारी चौघे जखमी…

mrityunjay mahanews

बाहुबली कोण ?आज फैसला…

mrityunjay mahanews

उत्तूर येथे तरुणाची आत्महत्या ? प्रेत विहिरीत सापडले…….जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

mrityunjay mahanews
error: Content is protected !!