

रोजरी माऊली चर्च यात्रा आजपासून ..

आजरा: प्रतिनिधी
आजरा येथील रोजरी माऊली चर्च यात्रा आज पासून सुरू होत असून आज शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम व प्रार्थना होणार आहे.
फादर रिचर्ड सालडान्हा हे मुख्य प्रार्थना समर्पित करतील. प्रार्थना नंतर ख्रिश्चन बांधवांची चर्च गल्लीतून फेरी व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर रोजरी चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध प्रकारचे खेळण्याचे व मिठाईचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.
यात्रेसाठी कोकण,कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील प्रमुख भागातील ख्रिश्चन बांधव आजरा शहरात दाखल झाले असून शनिवार, रविवार व सोमवार अशी तीन दिवस यात्रा रोजरी चर्च परिसरात भरणार आहे.


रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर – आमदार प्रकाश आबिटकर

आजरा: प्रतिनिधी
आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्री रवळनाथ ग्रामदैवत मंदिर आजरा शहराच्या मध्यवस्तीत वसलेले आहे. मंदिर पूर्वी लाकडी व दगडी स्वरूपाचे होते. मंदिरामध्ये मोठे तीन चौक टप्पे होते. या मंदिराच्या भोवताली अन्य मुख्य देवस्थाने असून भावेश्वरी, पालवेर, महादेव मंदिर, गणेश मंदिर असून शेजारीच मंदिर आहेत. या देवस्थानच्या यात्रा व रथोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात.

मंदीरास अनेक वर्षे झाली असून या मंदीराचा जिर्णोध्दार करून त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी येथील नागरीकांच्या वतीने करण्यात येत होती. त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून मंदीर दगडी बांधणेसाठी नगरविकास विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले आहे.


एसटी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको…

आजरा: प्रतिनिधी
मौजे भादवण ता. आजरा या गावी एसटी महामंडळाच्या गडहिंग्लज व आजरा डेपो मार्फत प्रवासी सेवा सुरु आहे. परंतु या दोन्ही आगाराच्या एसटी वेळेवर येत व जात नसल्यामुळे गावातील जेष्ठ नागरीक, महिला, वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, विदयार्थी यांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास होत आहे. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये विध्यार्थी व नागरिकांनी याबाबत तक्रारी मांडल्या आहेत. ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेकवेळा पत्र व्यवहार करून व प्रत्यक्ष संपर्क साधून एसटी सेवा नियमित करणेबाबत विनंती केलेली आहे. परंतु यामध्ये अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
त्यामुळे गावसभेत यावर चर्चा होऊन मंगळवार दि.०६/०२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता भादवण उत्तूर फाटा येथे गावातील नागरिक व विदयार्थी एसटी प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन आहेत. अशा आशयाचे निवेदन सरपंच माधुरी गाडे व ग्रामस्थांनी आजरा एस.टी.आगार व्यवस्थापकांना दिले आहे.


आजरा अर्बन बँकेच्या निवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा

आजरा: प्रतिनिधी
दि. आजरा अर्बन को. ऑप बैंक लि. आजरा (मल्टीस्टेट) बैंकेला वैभव मिळवून दिलेल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्यांनी आपल्या पत्नी समवेत आजरा यथे एक दिवसीय स्नेहमेळावा साजरा केला.
यामध्ये ओळख, मनोगते, स्नेहभोजन, महिलांसाठी हळदी कुंकु, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेल्या जयसिंगराव देसाई, महावीर त्रिभूवणे, नबीलाल शेख, शिवाजीराव सरदेसाई, ग. ना. देसाई या सेवकांचा सत्कार करणेत आला.
माजी सेवकांनी मनोगतामध्ये आजरा बैंकेचे संस्थापक संचालक व सध्याचे संचालक मंडळांबददल गौरवपूर्ण उद्गार काढले व आजरा अर्बन बँकेच्या कायम ऋणात राहण्याची इच्छा प्रर्दशित केली.
यावेळी दिवंगत सेवक व अधिकारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली,
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रकाश देसाई, सूर्यकांत आजगेकर, बाळासो कुंभार, मारुती मोरे यांनी प्रयत्न केले.


निधन वार्ता…
केशव पाटील

आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे जेष्ठ संचालक केशव लक्ष्मण पाटील (देवर्डे ) यांचे शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले.. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून अंत्यविधी कार्यक्रम शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी देवर्डे या गावी सकाळी ९ वाजता होणार आहे.




