
मासेवाडी येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा जप्त…
तिघांविरोधात गुन्हा नोंद

. …………..◼️आजरा- प्रतिनिधी◼️………..
मासेवाडी ता. आजरा येथे विनापरवाना देशी विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी राजाराम दत्तात्रय पाटील यांच्यासह गडहिंग्लज येथील दोन मद्य विक्री दुकानांच्या व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…
मासेवाडी येथील राजाराम पाटील यांचेकडे देशी विदेशी दारू विक्री करण्याचा परवाना नसताना गडहिंग्लज येथील दारू विक्रेत्यांनी ३६ हजार २१० रुपयांची देशी- विदेशी दारू त्याला विक्री केली. पाटील यांनी आपल्याजवळ विक्रीच्या उद्देशाने सदर दारू साठा जवळ बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मासेवाडी येथे पाटील यांचे कडून सदर दारूसाठा हस्तगत केला. याप्रकरणी राजू कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
या कारवाईत पो.हे.कॉ.समीर कांबळे,युवराज पाटील, अमर आडूळकर,राजेंद्र वरंडेकर (चालक),स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी भाग घेतला.

साखर कारखाना निवडणूक कार्यक्रमास निवडणूक प्राधिकरणाचा हिरवा कंदील

………….◼️आजरा- प्रतिनिधी◼️………….
आजरा साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू होण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली असून निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे यामुळे येत्या चार दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सुमारे 2000 संस्थांचा निवडणुकांचा कार्यक्रम प्रलंबित होता. तो सध्या सुरू झाला आहे. याचबरोबर ठीक ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा धुरळाही उडणार आहे.
सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक यंत्रणा राबवताना चांगली सुद्धा आमच्या होत आहे सद्यस्थितीत भोगावती साखर कारखाना, आजरा साखर कारखाना व बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाचे नगारे वाजू लागले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागून आहे.
निवडणूक प्राधिकरणाने आजरा साखर कारखाना निवडणूक कार्यक्रमास हिरवा कंदील दाखवल्याने चारच दिवसात अधिकृतरित्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.

तहसील कार्यालयाच्या दारात बेमुदत आंदोलन करण्याचा मेळाव्यात निर्धार

…………..◼️आजरा-प्रतिनिधी◼️………….
खेडे ( ता.आजरा ) येथे येथील हनुमान मंदिरामध्ये महामार्ग बाधित शेतकरी यांचा मेळावा पार पडला. यावेळी जाहीर सामुदायिक व व्यक्तिगत उत्तर देण्यासाठी व बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात आर या पारची लढाई करण्यासाठी येत्या १२ तारखेला बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या मेळाव्यात एकमताने करण्यात आला.
या मेळाव्यासाठी कॉ. शिवाजी गुरव कॉ. संजय तर्डेकर संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते शिवाजी इंगळे, आनंदा येसणे, गणपती येसणे, अनिल शिंदे, आदींनी मार्गदर्शन केले.
सर्व शेतकऱ्यांनी ताकदीनिशी लढण्याचा यावेळी निर्धार केला.

अडचणीच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार यांची चर्चा

………….◼️आजरा- प्रतिनिधी◼️………..
गिरणी कामगार व वारसदार बहुउद्देशीय सेवा संघ मुंबई यांचे मार्फत गिरणी कामगारांच्या समस्या व ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी या विषयावर चर्चा करणेत येऊन तसे प्रा.अर्जुन आबिटकर यांचेकडे निवेदन देण्यात आले व बुधवार दिनांक ११/१०/२०२३ रोजी होणाऱ्या गिरणी कामगारांच्या चर्चात्मक मिटींग व ऑनलाईन फॉर्म भरणे या बाबतीत नियोजन वर चर्चा करणेत आली.
यावेळी संस्थेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री.अर्जुन भादवणकर, संस्था अध्यक्ष संजय मांगले, उपाध्यक्ष रमेश पाटील, सेक्रेटरी अभिजित पाटील, खजिनदार प्रतिक पाटील , जेष्ठ संचालक श्री.उतम आर्दाळकर व संस्थेचे कायदेसल्लागार ॶॅडव्होकेट अशोक चौगुले उपस्थित होते
दाभिल येथे सोमवार १६ रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन

………….◼️आजरा- प्रतिनिधी◼️…………..
दाभिल (ता.आजरा) येथे नवरात्रौत्सवानिमित्त सोमवार दि. १६ रोजी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशंभो सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ व नवरात्रौत्सव उत्सव कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. १६ रोजी रात्री ८ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेसाठी ३५१/- रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५५५५/-, ४४४४/-, ३३३३/- व ११११/- असे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक व गायक यांना ५०१/- रूपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ह. भ. प. तानाजी हासबे, विजय राणे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छाया वृत्त

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

निधन वार्ता
विष्णू होडगे

आदर्श हायस्कूल शिरसंगीचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू महादेव होडगे (वय ६४) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली, मुलगा, पत्नी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आज शहरात…
आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने प्रशासकीय इमारत आजराच्या सभागृहात तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक दुपारी बारा वाजता होणार आहे.




