
अखेर मदन बापट यांना मृत्युने गाठलेच...
दहा दिवसांची झुंज ठरली अपयशी..

आजरा येथील मदन मनोहर बापट यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. चार चाकी अपघातात दहा दिवसापूर्वी ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली.
गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी त्यांच्या चारचाकीला हरळी (ता.गडहिंग्लज) येथे गाडी झाडाला धडकून अपघात झाला होता. यामध्ये मदन हे गंभीर जखमी झाल्याने सुरुवातीला त्यांना गडहिंग्लज येथे व त्यानंतर पुढील उपचाराकरीता कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान (आज दि २३) रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३८ वर्षीय मदन हे आजरा येथील महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर उर्फ बंडा बापट यांचे चिरंजीव व मंदार बापट यांचे कनिष्ठ बंधू होत.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.





