
जनता बैंक आजराला रू. ६ कोटी ५५ लाखाचा नफा
जनता सहकारी बैंक लि. आजरा या बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये रु.६ कोटी ५५ लाखाचा नफा झाला आहे. बँकेकडे चालू आर्थिक वर्षामध्ये रु. २८० कोटीच्या ठेवी व १८० कोटींची कर्ज आहेत. बँकेने आर्थिक वर्षामध्ये रु ४६० कोटीचा व्यवसाय केलेला आहे.नेट एन. पी. ए. ० टक्के आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा बँकेने नेत्रदिपक प्रगती केली आहे. कोरोनाचा कोणताही परिणाम बँकेवर झालेला नाही. याचाच अर्थ बँकेने आजपर्यंत केलेल्या पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवून सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी बँकेवर दाखवलेला हा विश्वास आहे. रिझर्व बँकेचा आर्थिक सक्षम व उत्तम व्यवस्थापन हा निकष पूर्ण करणारी आजरा तालुक्यातील एकमेव बँक आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
नुकतेच बँकेला रिझर्व बँकेकडून सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे या ठिकाणी कार्यक्षेत्र विस्ताराला मंजूरी मिळाली आहे. त्याबरोबरच रिझर्व बँकेने बँकेला उत्तूर, सिद्धनेर्ली (नदी किनारा) व बालिंगा या ठिकाणी नविन शाखा उघडणेस मंजूरी दिलेली आहे. लवकरच नवीन तिन्ही शाखा चालू करणार आहे.

तसेच बँकेने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व आण्णासाहेब आर्थिक विकास मागास व्याज सवलत योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा चालू केलेला असून वालू आर्थिक वर्षामध्ये बँकेने रु.१५ कोटी सदर योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेकडे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सुविधांचा वापर चालू असून बँकेने युपीआयची मेंबरशीप घेतली असून लगेच युपीआय सेवा सुद्धा ग्राहकांच्या सुविधेत आणणार आहे असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंद देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे संचालक श्री. रणजित देसाई, श्री. सुनिल डोणकर, श्री. महादेव टोपले. श्री. जयवंतराव शिंपी, श्री. बाबाजी नाईक, श्री. महादेव पोवार, श्री. विजय देसाई. श्री. जोतीबा चाळके, श्री. सहदेव नेवगे, श्री. संदिप कांबळे, श्री. शामराव चौगुले, सौ. वृषाली कोंडुस्कर व सौ. रेखा देसाई बँकेचे कर्मचारी श्री. मिनीन फर्नांडिस, श्री. माणिक सावंत, श्री. पांडुरंग सरंबळे, श्री. सुहास चौगुले व आय. टी. मॅनेजर श्री. संदिप पाटील उपस्थित होते.
दाभिल येथील शंभू महादेव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कदम…व्हा. चेअरमनपदी तानाजी हासबे

दाभिल येथील शंभू महादेव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कदम यांची तर व्हा. चेअरमनपदी तानाजी हासबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निंबधक एस. एम. थैल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवचर्चित संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
या निवडीवेळी सांभाजी पाटील, संचालक रामचंद्र सि. पाटील, तुकाराम नार्वेकर, शशिकांत पाटील, कमळाबाई मुगुर्डेकर, गंगाबाई राणे, नारायण झित्रे, तुळसाबाई कांबळे, सुनंदा गुरव यांच्यासह पांडूरंग राणे, पांडूरंग झित्रे, नामदेव पाटील, आनंदा पाटील, भिवा जाधव, कोडिंबा पाटील, श्रावण वाझे, रवींद्र मुगुर्डेकर, मुकुंद मुगुर्डेकर, महादेव नार्वेकर, कृष्णा आंगचेकर, सहदेव राणे उपस्थित होते. सचिव दशरथ मुगुर्डेकर यांनी आभार मानले.
देशी गायी व वासरांची बेकायदेशीर वाहतूक करणा-या चार चाकीसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात… पिंगोळी येथील एका विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद…

आजरा- आंबोली मार्गावर हॉटेल ऐश्वर्या नजीक बेकायदेशीररित्या देशी गायी व वासरांची चार चाकी मधून वाहतूक करणाऱ्या कादर बाबु शेख (वय ५७ रा.पिंगोळी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) याला आजरा पोलिसानी ताब्यात घेऊन
त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शेख हा महिंद्रा पिकअप गाडीतून मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास
सुमारे बारा लहान-मोठ्या गायींसह वासरांची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशीगायीसह जरशी पाडा, वासरे, रेडे आढळून आले पोलिसांत विशाल यशवंत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कादर शेख याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे .पोलिसांनी सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

आज-यात वळीव पावसाची जोरदार सलामी
आजरा शहरासह तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वळीव पावसाने आज सकाळी जोरदार हजेरी लावली.विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
मंगळवारी सकाळी पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली .दिवसभरात वातावरण ढगाळ होते.सायंकाळी पुन्हा एकदा ठीकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.






