mrityunjaymahanews
अन्य

आजऱ्यात रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची माहिती

 

 

आज-यात रविवारी शेतकरी मेळावा

जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांची माहिती...

आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ मिळावा यासाठी रविवार दि. १०/०४/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केमिकल युक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे का वळावे ? यासाठी आजरा महाल शिक्षण समूह, अण्णा- भाऊ संस्था समूह,सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन व  , आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने माहिती देण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना केमिकल युक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने व कॅन्सर मुक्त शेती करणे काळाची गरज आहे, यापूर्वी हा कार्बन क्रेडीट फंड जागतिक बँक प्रदूषण कमी करण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी देत होती, सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी जागतिक बँक हा फंड शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे. तसेच सभासद झाल्यानंतर आपल्या जमिनीचे सॅटेलाईट मार्फत निरीक्षणे नोंदवून त्या जमिनीमध्ये प्रत्येक गुंठ्याच्या भागात किती न्युट्रीशन मूल्य (किती कसदार जमीन आहे) जमिनीमध्ये कार्बनडाय ऑक्साईड षोशून घेण्याची शक्ती आहे, यावर कार्बन क्रेडीट फंड अवलंबून आहे. तसेच अति केमिकल युक्त खत वापरामुळे व फवारणीमुळे क्षारपड झालेल्या जमिनीची सुधारणा करून घेता येईल या संबंधीचे रिपोर्ट रोज सभासदाच्या मोबाईल वर पाठवले जातील. त्या अनुषंगाने त्या जमिनीमध्ये सुधारणा करून ती जमीन सेंद्रिय शेतीकडे वळवता येईल. या नोंदणीची मुदत फक्त २२ एप्रिल २०२२ पर्यंतच आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे आधारकार्ड, ७/१२ व ८ अ, सभासदाच्या पत्नीचा बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर व प्रत्यक्ष जमिनीवर जावून जमिनीचे अक्षांश व रेखांश याची नोंद घेण्यात येईल. सदरचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी हि कंपनी प्रती दिवस १ रु. चार्ज आकारणार आहे ,अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी पत्रकार बैठकीत  बोलताना दिली.

या योजनेकडे कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत व ते कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ घेत आहेत. याबाबत कनेरीमठ येथे सोमवार ०४ एप्रिल रोजी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित  करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक
सिद्धगिरी मठाचे मठाधीपती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी व कर्नाटक राज्य सेंद्रिय शेती चळवळीचे प्रमुख मा ए.एस.आनंदजी यांनी मार्गदर्शन केले होते.

कार्बन क्रेडिट काय आहे?  कार्बन क्रेडिट कसे मिळवावे?  यासाठी संघ स्थापन कशी करायची ? शेतीउत्पन्न वाढण्यास ह्याचा कसा लाभ घेता येईल?या अनुषंगाने  आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूनी या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांना उपस्थित राहण्यासंबंधी विनंती केली आहे. तसेच या योजनेसाठी काम करणारी प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी आजरा तालुक्यातील खातेदार शेतकरी यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून कार्बन क्रेडीट फंड या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जि.प.चे उपाध्यक्ष जयवंतराव अण्णा, अण्णा भाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोक चराटी, तसेच आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे व संचालक मंडळ यांनी केले आहे.

यावेळी डॉ.अनिल देशपांडे, श्री. नारायण रामचंद्र मुरुकटे, श्री संभाजी जाधव, श्री अनिकेत चराटी आदी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील… उपाध्यक्षपदी दौलती पाटील

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!