mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

आज-याची कन्या विधानसभेच्या आखाड्यात… प्रचारार्थ ‘टीम सतेज ‘ सरसावली..आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त २ कोटी ५० लाखाच्या ठेवी जमा..ग्रामपंचायतीमधील वित्तीय फेरफाराची चौकशीच्या पार्श्वभूमीवर पेद्रेवाडी ग्रामपंचायत सदस्याचे आजरा तहसील समोर उपोषण

 

आज-याची कन्या विधानसभेच्या आखाड्यात… प्रचारार्थ ‘टीम सतेज ‘ सरसावली…

‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदार संघातून आज-याच्या कन्या जयश्री जाधव या आखाड्याचा असून त्यांच्या प्रचारार्थ येथील ‘टीम सतेज’ सरसावली आहे.

कोल्हापूरवासीय आजरेकरांनी श्रीमती जाधव यांना मतदान करून आज-याच्या या कन्येला आमदार पदाची संधी द्यावी असे आवाहनही टीम सतेज च्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीमती जाधव या मूळच्या आजरा येथील रहिवासी असून येथील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. शंकरराव मोरे यांच्या त्या कन्या आहेत. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी कडून त्या ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला सामो-या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ टीम सतेज’ने आपल्या कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. . येते पाच ते सहा दिवस हे कार्यकर्ते कोल्हापूर येथे जाऊन जाधव यांच्या प्रचारास मदत करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते किरण कांबळे, नगरसेवक अभिषेक शिंपी, अमित खेडेकर, बशीर खेडेकर, अशोक पोवार, इम्रान सोनेखान, आदींनी स्पष्ट केले .

यावेळी विलास पाटील, विश्वास जाधव, आनंदा कुंभार, एस. पी. कांबळे, अण्णासो पाटील, भिकाजीराव गुरव यांच्यासह ‘टीम सतेज’ चे कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामपंचायतीमधील वित्तीय फेरफाराची चौकशीच्या पार्श्वभूमीवर पेद्रेवाडी ग्रामपंचायत सदस्याचे आजरा तहसील समोर उपोषण

कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद, कोल्हापुर यांचे आदेशावरून विस्तार अधिकारी, भुदरगड यांनी ग्रामपंचायत पेद्रेवाडी मधील वित्तीय फेरफाराच्या चौकशीचा अहवाल गटविकास अधिकारी आजरा यांना सुपूर्त केला आहे, परंतु सदरचा अहवाल हा फक्त १४ व्या वित्त आयोगाशी निगडीत असून ग्रामनीधी व इतर विषय यातून वगळण्यात आले आहेत. लेखी म्हणणे वारंवार मांडून सुद्धा सदरचे विषय कोणाला वाचवण्यासाठी वगळण्यात आले, यांवर संबंधित अधिकारयांकडून काहीही अभिप्राय आलेला नाही.याच्या निषेधार्थ पेद्रेवाडी ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण यांच्यासह चौघांनी आजरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले,
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दप्तरी मौजे ग्रामपंचायत पेद्रेवाडी मधील सदस्य / सरपंच यांनी निवडणूक आयोगासमोर खोटी माहिती व प्रतिज्ञापत्र देऊन जी आयोगाची फसवणूक केली त्यांवर विवाद अर्ज लहू विष्णू रेडेकर यांनी सादर केला आहे. त्यांवर संबंधीत कनिष्ठ अधिका-यांकडुन् चालढकल केली जात आहे.

वित्तीय फेरफाराची चौकशी निःपक्षपणे पार पडावी व संबंधीत सदस्य / सरपंच यांचे सदस्यत्व लवकरात लवकर रद्द व्हावे याकरीता एक दिवसीय लाक्षणिक उपोषणावर तहसील कार्यालया समोर केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट आहे.

जनवादी साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्याचा आजरा येथील परिवर्तनवादी  बैठकीत निर्णय

सावंतवाडी येथे होणारे जनवादी साहित्य संस्कृती संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आज आजरा येथे झालेल्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संयोजन समितीचे सचिव अंकुश कदम (कणकवली) होते.

बैठकीच्या सुरवातीला कॉम्रेड संपत देसाई यांनी दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संमेलनाचे आयोजन केले असून ते यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. हे संमेलन दक्षिण कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील परिवर्तनवादी चळवळींच्या वतीने होत असल्याचे सांगून आजरा तालुक्यातील सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे असे आवाहन केले.
यावेळी अंकुश कदम म्हणाले, दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्याकांसह स्त्रियांच्या प्रश्नांची साहित्य संस्कृतीच्या अंगाने चर्चा घडवून आणणे हा या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. संध्या नरे पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन वेगळा परिणाम साधणारे असेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी डॉ.नवनाथ शिंदे, नरेंद्र पाटील(चंदगड), अशोक शिवणे, संजय घाटगे, बजरंग पुंडपळ, युवराज जाधव यांनी समेलनाबाबत अनेक सूचना केल्या. बैठकिला वंदन जाधव, प्रकाश मोरुस्कर, शिवाजी भगूत्रे, काशीनाथ मोरे, दीपक जाधव, भूषण सुरंगे, कृष्णा सावंत, दशरथ घुरे, मारुती पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त २ कोटी ५० लाखाच्या ठेवी जमा

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे ७२३ कोटी रूपयाच्या ठेवी व ४४१ कोटी रुपये कर्जे आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजऱ्यातून अपहरण… देशी दारू विक्री करताना मडिलगे येथे एकास ताब्यात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!