देवकांडगाव येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

देवकांडगाव तालुका आजरा येथील प्रशांत पुंडलिक परीट (वय २४ )हा शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला होता. तिथे त्याचा पाय घसरून तोल जाऊन तो विहीरीत पडल्याने पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .
याबाबतची वर्दी पुंडलिक रामचंद्र परीट यांनी आजरा पोलिसात दिली आहे. प्रशांत हा परीट कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात बहीण, आई, वडील असा परिवार आहे,.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
…………..

ट्रॅक्टर शेतातून घातल्या प्रकरणी मारामारी : बारा जणांविरोधात गुन्हा नोंद : बहिरेवाडी येथील प्रकार
बहिरेवाडी (ता. आजरा )येथे शंकर जयसिंग नाईक, आप्पा अशोक नाईक, मिथुन अशोक नाईक इत्यादी नाईक परिवार हे परस्परांचे नातेवाईक आहेत.शंकर जयसिंग नाईक यांचा भाऊ गोपाळ नाईक सकाळी ट्रॅक्टर घेऊन घरी जात असताना चिंतामणी नाईक यांच्या शेतातून ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून चिडून जाऊन आप्पा नाईक, मिथुन नाईक वगैरे १२ जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांचा वापर करून शंकर नाईक, जयसिंग नाईक ,गोपाळ नाईक, जयश्री नाईक या चौघांना त्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले,.
याबाबतची फिर्याद शंकर जयसिंग नाईक रा. बहिरेवाडी यांनी आजरा पोलिसात दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी आप्पा अशोक नाईक, मिथुन अशोक नाईक, चिंतामणी नाईक, सचिन चिंतामणी नाईक, लक्ष्मी चिंतामणी नाईक ,नागव्वा सुरेश नाईक ,शालाबाई अशोक नाईक यांच्यासह यांच्यासह बारा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.





