

उचंगी प्रकल्प स्थळावर पुन्हा संचारबंदी जिल्हाधिकारी रेखावार यांनी आदेश केले लागू… कलम १४४ ची अंमलबजावणी सुरू
घळभरणी व्यत्यय नको म्हणून उचलले पाऊल.
. तालुक्यातील उचंगी प्रकल्पाच्या घळभरणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धरणाचं काम बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रकल्प स्थळावर संचारबंदी लागू केली आहे.
तणावाचं वातावरण निवळण्यासाठी आणि घळभरणी विनाअडथळा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अजून पुढील पंधरा दिवसांत करता (२३ मार्च अखेर) प्रकल्पस्थळी संचार बंदी आदेश लागू केला आहे.
आजरा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता व साखर पोती पुजन

आजरा साखर कारखान्यांचा सन २०२१-२२चा गळीत हंगाम १२४ दिवस चालला असुन ३५००७४.६८१ में टन ऊस गाळप करून ४३४०५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी १२.४२ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री. अनिल भिमा फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता अनिल फडके या उभयतांच्या शुभ हस्ते सत्यनारायण पुजा आयोजित करणेत आली. तसेच मा. संचालक मंडळाचे हस्ते साखर पोत्यांचे पुजन करणेत आले. सदर कार्यक्रमावेळी मा. व्हा.चेअरमन यांनी आपल्या मनोगतामध्ये कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली दोन वर्षे बंद असतांनाही हंगाम २०२१-२२ चालू करणेसाठी मा.मुख्यमंत्री श्री. ठाकरे, मा. हसन मुश्रीफ, मा. सतेज पाटील व इतर मंत्री महोदय, ठेवीदार, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी यांचे सहकार्याने व कारखाना कर्मचारी यांनी आर्थिक परिस्थितीचा विचार करून कारखाना सुरू व्हावा या हेतुने ५० टक्के पगारावर काम करणेची तयारी दाखवुन मोठे योगदान दिले त्यामुळे मा. संचालक मंडळास कारखाना चालु करणेस यश आले.. कारखाना व्यवस्थापनाने ४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उदिष्ट ठेवले होते पण कारखाना वेळेत ताब्यात न मिळालेने तोडणी वाहतुक यंत्रणा भरणेस उशीर झाला तसेच अवकाळी पाऊस झाल्याने व दोन वर्ष कारखाना बंद असलेने कांही तांत्रीक अडचणीमुळे गळीतावर परिणाम झाला त्यामुळे ठरविलेले उदिष्ट साध्य करता आलेले नाही. तरीपण संपुर्ण अडचणींना तोंड देत कारखान्याने गाळप केले. त्याकरीता कारखान्याकडे आलेल्या ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत आदा केले आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये विश्वासहर्ता निर्माण करणेत व्यवस्थापनास यश आले आहे. उत्पादकांनी व सभासदांनी कारखान्यावर विश्वास ठेवून आपला ऊस आमचे कारखान्यास पाठवून सहकार्य केले त्याबद्दल ऊस उत्पादकांचे तसेच तोडणी वाहतुकदार, कंत्राटदार, मालपुरवठादार यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे कारखान्याकडून देय असलेली बिले लवकरच आदा करणेचे नियोजन संचालक मंडळ करीत आहे. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे सदरचा सिझन यशस्वीरित्या पार पडला असुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढील हंगाम पुर्ण कार्यक्षमतेने चालविणेचा निर्धार केला आहे. त्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी हंगाम २०२२-२३ करीता आपल्या संपुर्ण ऊसाची नोंद आजरा कारखान्याकडे करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. अशोक काशिनाथ चराटी, संचालक श्री. मधुकर कृष्णा देसाई, श्री. दिगंबर यशवंतराव देसाई, श्री. सुधीर राजाराम देसाई, श्री. मारुती जानबा घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रमेश रेडेकर, श्री. उदयसिंह उर्फ मुकुंदराव बळीराम देसाई, श्री. लक्ष्मण धोंडीबा गुडूळकर, श्री. दशरथ आनंदा अमृते, श्री. राजेंद्र नारायण सावंत, श्री. मलिककुमार गणपतराव बुरूड, श्री. आनंदा सखाराम कांबळे, श्री. तानाजी श्रीपती देसाई, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. श्री.टी.ए.भोसले, जनरल मॅनेंजर (टेक्नी) श्री.व्ही.एच. गुजर, प्रोडक्शन मॅनेंजर श्री. एस.बी.मल्हारी, सेकेटरी श्री. व्ही. के. ज्योती, चिफ अकौंटंट श्री. प्रकाश चव्हाण, मुख्य शेती अधिकारी श्री. एस. आर. चौगुले उपस्थित होते. तसेच कामगार संघटना अध्यक्ष व सदस्य, कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष उपस्थीत होते.

राधाकृष्ण ज्वेलर्स तर्फे महिला दिन साजरा
आजरा येथील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या सुभाष गल्लीतील राधाकृष्ण ज्वेलर्स तर्फे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला ग्राहकांना गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले. महिला हा सराफ व्यवसायाचा कणा असल्यामुळे त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे. आमच्यासाठी वर्षाचे सर्वच दिवस हा महिला दिन असतो असे ज्वेलर्स चे रोहित रमेश कारेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
…..
मलिग्रे येथे महिलांना मार्गदर्शन

जागतिक महिला दिनानिमित्त मलिग्रे तालुका आजरा येथे महिलांना मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शन करताना मालिगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गुरव सोबत कोळीद्रे गावच्या प्रथम नागरिक,सरिता संदीप उगाडे,हजर ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील.
व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये जागतिक महिला दिन संपन्न

व्यंकटराव हायस्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्य शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शालेय विद्यार्थिनी यांना भेटवस्तू देऊन कार्यगौरव करणेत आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य ,संचालक सुनिल देसाई यांनी महिलांचे सामाजिक ,राजकीय,शिक्षण, आरोग्य,संशोधन,प्रशासन इत्यादी सर्व क्षेत्रातील योगदान व उल्लेखनीय कामगिरी यावर प्रकाश टाकला व शुभेच्छा दिल्या. प्र. प्राचार्य एस्. जी.खोराटे यांनी महिला दिनाचे महत्त्व व इतिहास याबद्दल माहिती देऊन सर्व उपस्थितांना प्रेरित केले. शिक्षिका श्रीमती पूंडपळ यानी मनोगत व्यक्त केले.आभार पारळे सर यांनी मांडले.सुत्रसंचलन पी व्ही पाटील यांनी केले तर कार्यक्रम व्यवस्था व सजावट कला शिक्षक श्री कृष्णा दावणे यांनी केली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आण्णा पाटील,सचिव एस.पी. कांबळे पर्यवेक्षक आर जी कुंभार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

पं. दीनदयाळ विद्यालय व ज्युनि. कॉलेज
पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या मा. डॉ. सौ. रश्मी राऊत यांचे स्रागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्र. विजय राजोपाध्ये यांनी पुष्पगुच्छ देवून केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजोपाध्ये यांनी केले. आंतररा ष्ट्रीय जागतिक महिला दिनाबद्दल माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्या डॉ. रश्मी राऊत (गाडगीळ) यांनी सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींशी हितगुज साधले. त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल मार्गदर्शन केले. आहार, आजचे संस्कार याबद्दल आपल्या अनुभवातून यार्थिनींना योग्य असे मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले अशा सर्व महान, धाडसी खियांकडून आपण सर्वांनी त्याचे आदर्श घेतले पाहिजेत. कर्तृत्ववान स्त्रियांचे आदर्श, अभिमान घेऊन आपण आपल्या आयुष्यात जगले पाहिजे. आपण लद शकतो. आपल्याकडे कौशल्य आहे. आपण खिया कुठेच कमी नाही. आपण खुप काही करू शकतो. आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. आपण आपल्या मनात कोणताच न्यूनगंड ठेवू नये. एक स्त्री म्हणून आपठा वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले पाहिजे असे स्पष्ट केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
देवर्डे विद्यामंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन

विद्यामंदिर देवर्डे शाळेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संयोगिता सुतार होत्या.
गिरिजा आंबले या विद्यार्थिनीने प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्तिक नीळकंठ आणि आनुष बागडी या विद्यार्थ्यांनी आई व महिलांविषयीच्या कविता सादर केल्या. मनोगतामध्ये आर्या पाटील, हर्षदा कांबळे, अक्षता तानवडे, संजीवनी पाटील, कार्तिक कांबळे, श्रेया कासले, वैष्णवी सुतार, सलोनी घाटकर, समृद्धी राणे, पूनम कांबळे या विद्यार्थिनींनी रमाई आंबेडकर, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिली भारतीय महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर डाॅ. आनंदीबाई जोशी, अंतराळवीर कल्पना चावला आदिंच्या यशोगाथा व्यक्त केल्या. शिक्षक सुनील सुतार व सरोजिनी कुंभार यांनीही मनोगतांमधून स्त्री शक्तीची महती विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संयोगिता सुतार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त मुलींसाठी संगीत खुर्ची, बटाटा शर्यत व तीन पायांची शर्यत या स्पर्धाही घेण्यात आल्या.
आर्यन गुरव या विद्यार्थ्याने आभार व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक नामदेव माईनकर यांचेसह अंगणवाडी सेविका जयश्री तानवडे, सुगंधा तानवडे, साधना भादवणकर, सुरेखा गुरव शीतल बुरूड, स्वाती चाळके आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.
असंघटित क्षेत्रातील महिलांना कपडे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोल्हापुरातील सखीसंपदाच्या संपादक व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नजा बाकीचे यांच्यातर्फे महिला दिना चे औचित्य गांधीनगर आजरा येथिल विजापुर मधुन आलेल्या असंघटित क्षेत्रात काम करणा-या मजुर महिला व मुलीना साड्या,चुडीदार ड्रेस, बिस्किट पुडे व खेळणींचे वाटप केले.पालावरील महिला, बाळगोपाळ व मुलींच्या चेहरयावर हसु फुलवले.यावेळी आज-यातील गीता पोतदार, प्रतिभा कांबळे,धनश्री देसाई भैरवी सावंत,माधुरी पाचवडेकर,नम्रता कांबळे.उपस्थित होत्या.
मडिलगे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू
मडिलगे (ता. आजरा) येथील वारकरी संप्रदाय, तरुण मंडळे, सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ व ग्रामपंचायत मडिलगे देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि. ८ मार्च ते १४ मार्च २०२२ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुभारंभ समारंभ नुकताच पार पडला. भक्तजनांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक मडिलगे यांनी भक्तजनांना व नागरिकांना केली आहे .
सात दिवस चालणा-या या सोहळ्यासाठी दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा आरती ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन व रात्री ११.३० ते बारा ३.३० हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम असून व्यासपीठ आधिपत्यक. ह. भ. प. श्री. दत्तात्रय निऊगरे आहेत.
या सोहळ्यासाठी कीर्तनकार दि रोजी ८ ह. भ. प तानाजी पाटील महाराज कोरीवडे, दि. ९ ह. भ. प. डॉ. एस. डी. पन्हाळर महाराज उत्तुर , दि. १० ह. भ. प. एकल महाराज जोगेवाडी. ता. राधानगरी, दि. ११ ह. भ. प. नारायण काळे महाराज आळंदी देवाची, दि. १२ ह. भ. प. आनंदा पाटील महाराज मळगे.ता.कागल, दि. १३ ह. भ. प. पांडुरंग कासार महाराज सांगली, दि. १४ ह. भ. प. वाघे महाराज, दि. १५ ७ ते ९ वा. ह. भ. प. वाघे महाराज आळंदी यांचे कीर्तन होणार आहेत. …..







