सोमवार दि. २२ डिसेंबर २०२५

आजऱ्यात भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडीचा झेंडा
अशोकअण्णा झाले नगराध्यक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अखेर भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडीला नगराध्यक्ष पदाच्या जागेसह नगरसेवक पदाच्या आठ जागा पटकावत सत्ता मिळवण्यात यश आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी मतदारांनी ताराराणी आघाडीच्या अशोकण्णा चराटी यांच्या बाजूने कौल दिला. तर ऐनवेळी काँग्रेसकडून निवडणुकीला सामोरे गेलेल्या संजयभाऊ सावंत यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार मंजूर मुजावर यांनी मात्र धक्कादायक लढत देत ताराराणी आघाडीला चांगलाच घाम फोडला होता. अन्याय निवारण समितीच्या डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना मात्र नाममात्र मते पडली. आता नव्या सभागृहात दहा महिला व सात पुरुष नगरसेवक असे बलाबल राहणार आहे. यामध्ये अन्याय निवारण समितीने मिळवलेले दोन जागांवरील यश व ग्रामपंचायतीपासून तब्बल पाच वेळा पराभूत झालेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीला सामोरे गेलेल्या रहिमतबी खेडेकर यांनी विद्यमान नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांच्या विरोधात एकतर्फी मिळवलेला विजय कौतुकास्पद समजला जातो. सुमैय्या यांना तब्बल तिसऱ्या स्थानावर जावे लागले.
सभागृहात ताराराणी आघाडी ८, परिवर्तन आघाडी ६, अन्याय निवारण समिती २
राष्ट्रवादी (शरद पवार) १ असे बलाबल झाले आहे.
प्रमुख पराभूत उमेदवार
आजरा कारखाना संचालक रशीद पठाण,कारखाना संचालक व माजी नगरसेवक संभाजी पाटील, माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर, माजी नगरसेवक सिकंदर दरवाजकर, स्वीकृत माजी नगरसेवक आनंदा कुंभार, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा भैरवी सावंत
नगराध्यक्ष पदासाठी पडलेली मते
◾ अशोक चराटी ४२२४ (विजयी)
◾ मंजूर मुजावर ३४९६
◾संजय सावंत. २४७७
◾ डॉ.श्रध्दानंद ठाकूर १०५०
◾बाकीयू खेडेकर ११२
◾नियामत मुजावर. ३७
नगरसेवक पदासाठी पडलेली मते
प्रभाग – १
अश्विनी चव्हाण (ताराराणी आघाडी) – ३२३ (विजयी)
अनसा माणगावकर (अपक्ष) : ०२
भैरवी राजेंद्र सावंत (काँग्रेस) :१३३
प्रभाग – २
संजय इंगळे (अन्याय निवारण समिती) : १२१
पूजा डोंगरे (ताराराणी आघाडी विजयी) : ४८१
संभाजी पाटील (शिवसेना ठाकरे गट) : २३०
प्रभाग – ३
रहिमतबी खेडेकर ( शरद पवार गट) : ४०९ (विजयी)
समीना खेडेकर (ताराराणी आघाडी) : १९१
सुमैय्या खेडेकर (काँग्रेस) :१२४
प्रभाग – ४
मुसासरफराज पटेल (काँग्रेस) : २०० (विजयी)
जावेद पठाण (अन्याय निवारण समिती) : ५२
रशीद पठाण (ताराराणी आघाडी) : १७८
नदीम मुल्ला (अपक्ष) : ५३
प्रभाग – ५
नाझिया खेडेकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) : ६५
निशात चाँद (ताराराणी आघाडी) : १९४ (विजयी)
जास्मिन सय्यद (काँग्रेस) : ९४
प्रभाग ६
अन्वी केसरकर (ताराराणी आघाडी) : १४२ (विजयी)
शाहीन तकीलदार (अपक्ष) :3१०३
साधना मुरुकटे (काँग्रेस) : ११३
प्रभाग ७
कलाबाई कांबळे (काँग्रेस) : ४०७ (विजयी)
गीता कांबळे (अपक्ष) : १३
बालिका कांबळे (ताराराणी आघाडी) :२३७
प्रभाग – ८
सुहेल काकतीकर (अपक्ष) : ३३८
इकबाल शेख (ताराराणी आघाडी) : ४१०
असिफ सोनेखान (काँग्रेस) : ४९० (विजयी)
प्रभाग – ९
रेश्मा बुड्डेखान (काँग्रेस) : ८४१ (विजयी)
यास्मिन लतीफ (ताराराणी आघाडी) : १८८
प्रभाग – १०
आनंदा कुंभार (अपक्ष) : १९१
लहू कोरवी (अपक्ष) : ०७
सिंकदर दरवाजकर (ताराराणी आघाडी) : २९७
निसार लाडजी (काँग्रेस) : ३५६ (विजयी)
प्रभाग – ११
डॉ. स्मिता कुंभार (अन्याय निवारण समिती) – २३३ (विजयी)
गीता सावंत (ताराराणी आघाडी) : २२१
आरती हरणे (काँग्रेस) : ९७
प्रभाग – १२
समीर गुंजाटी (काँग्रेस) : ३३६
अनिकेत चराटी (ताराराणी आघाडी) : ४०४ (विजयी)
समीर तकीलदार (अपक्ष) :०५
गौरव देशपांडे : (अन्याय निवारण समिती) : ८५
दिलशाद पटेल (अपक्ष) : ११४
प्रभाग – १३
रवींद्र पारपोलकर (अन्याय निवारण समिती) : ३४३
परेश पोतदार (ताराराणी आघाडी) : ४४४ (विजयी)
प्रभाग १४
सिद्धेश नाईक (ताराराणी आघाडी) : १६१
सूर्यकांत नार्वेकर (अपक्ष) : ४४
अभिषेक शिंपी (काँग्रेस) : १७४ (विजयी)
प्रभाग १५
परशराम बामणे (अन्याय निवारण समिती) : ३७७ (विजयी)
शैलेश सावंत (ताराराणी आघाडी) : २५१
प्रभाग – १६
अश्विनी विजय कांबळे (अपक्ष) : ३०
रेश्मा खलीफ (अपक्ष) : ५३
आसावरी खेडेकर (ताराराणी आघाडी) : १८३ (विजयी)
संगीता चंदनवाले (अपक्ष) : 120
बानू तळगुळे (अपक्ष) :१११
श्रुती पाटील (अन्याय निवारण समिती) : ४९
मीनाक्षी संतोष पुजारी (शिवसेना ठाकरे गट) : ११८
प्रभाग १७
सरिता गावडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट) : २५७
स्नेहल निकम (अपक्ष) : ०८
आरती मनगुतकर (अन्याय निवारण समिती) : २९
पूनम लिचम (ताराराणी आघाडी) : ३०९ (विजयी)
सलग दुसऱ्यांदा पराभूत झालेले एकाच कुटुंबातील उमेदवार…
संजय इंगळे ,रशिद पठाण, रियाज तकीलदार, इकबाल शेख,जास्मीन सय्यद
मुस्लिम बहुल लोकसंख्या असणाऱ्या प्रभागात मंजूर मुजावर यांनी मोठी आघाडी घेतली. यामध्ये प्राधान्याने प्रभाग तीन, चार, पाच, सात, आठ, नऊ, दहा या प्रभागांचा समावेश होता. येथे काँग्रेसच्या सावंत यांना मोठा फटका बसला. क्रॉस वोटिंग मुळे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले परंतु सावंत यांना अत्यल्प मते पडत गेली. तर प्रभाग एक, दोन सह हिंदू बहुल मतदारसंख्या असणाऱ्या मतदारसंघात अशोक अण्णा चराटी यांनी आघाडी घेतली. यामुळे संजय भाऊंना धड काँग्रेसची नाहीत व इतरही मते नाहीत अशा विचित्र अवस्थेला सामोरे जावे लागल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले.
बाप- मुलगा, भाऊ बहीण विजयी
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी व त्यांचे चिरंजीव अनिकेत नगरसेवक पदाकरिता निवडून आले आहेत तर
प्रभाग चार मधून निवडणुकीला राष्ट्रीय काँग्रेस मधून सामोरे गेलेले मुसा सरफराज उर्फ आसिफ पटेल आणि प्रभाग ९ मधील रेश्मा बुड्डेखान या दोन बहिण भावांना नगरसेवक पदाची संधी मिळाली.

हे ठरले जायंट किलर…
प्रभाग दोन मधून ताराराणी आघाडीच्या सौ. पूजा डोंगरे यांनी माजी ग्रामपंचायतचे सरपंच व विद्यमान नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख व आजरा साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील यांना धक्कादायकरीत्या पराभूत केले. तर प्रभाग तीन मध्ये हुकमी उमेदवार अशी सुरुवातीपासून ओळख तयार केलेल्या विद्यमान नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांना चुलत सासू रहिमतबी खेडेकर यांनी पराभूत केले. विद्यमान नगरसेवक सिकंदर दरवाजकर यांना निसार दरवाजकर यांनी पराभूत केले.
बालेकिल्ले ढासळले…
प्रभाग ११ व प्रभाग १५ वर चराटी यांचे कायम वर्चस्व होते. यावेळी मात्र अन्याय निवारण समितीने या दोन्ही बालेकिल्लांना सुरुंग लावण्यात यश मिळवले येथे अनुक्रमे डॉ. स्मिता कुंभार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे हे विजयी झाले. तर राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या प्रभाग १७ मध्ये चराटी यांच्या गटाच्या सौ. पुनम लीचम या विजयी झाल्या.
कार्यकर्त्यांसह रस्ते गुलालाने रंगून गेले…
निवडणूक निकालानंतर गुलाबाची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण शहरभर गुलाल गुलाल दिसत होता.
दहा वर्षानंतर प्रभाग २ मध्ये चराटींचा प्रवेश
तब्बल दहा वर्षे चराटी यांच्या आघाडीचे उमेदवार शिवाजीनगर/ प्रभाग दोन मधून पराभूत होत होते. यावेळी मात्र येथील डोंगरे यांनी एकतर्फी विजय तर मिळवलाच त्याचबरोबर चराटी यांनाही नगराध्यक्ष पदाकरिता मतांची घसघशित आघाडी दिली.
गत सभागृहातील केवळ दोघांनाच संधी…
मावळत्या सभागृहातील माजी नगरसेवक अशोकांना सराटी यांना नगराध्यक्ष पदाची तर स्वीकृत नगरसेवक अभिषेक शिंपी यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. हे दोघे वगळता संपूर्ण सभागृहात नवीन चेहरे दिसणार आहेत.

आजरा हायस्कूल मध्ये युद्ध कला प्रात्यक्षिक कार्यक्रम
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूलमध्ये युद्ध कला प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सव्यसाची गुरुकुल वेंगळूर ता. भुदरगड चे प्रमुख प्रधानाश आचार्य लखन जाधव व टीम सदस्य श्री.शिवराज शिंदे (सांगली) श्री. लखन पवार (कोल्हापूर),श्री. निखिल लकंबरे (गडहिंग्लज), अक्षय घाडगे (सांगोला), दीक्षा भादवणकर ( गडहिंग्लज ), सानिका शिंदे ( कोल्हापूर ), तसेच आजरा हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक ए. एल. तोडकर यांनी केले. प्रात्यक्षिकावेळी सूर्यनमस्कार, भूमी नमस्कार, दंड बैठक, भालाफेक, दांडपट्टा चालवणे, तलवार,ढाल, लाठीकाठी, पोलादी बाणा, लिंबू कापणे, काकडी कापणे, नारळ फोडणे हे विविध प्रकार दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे व भारतीय संस्कृतीची ओळख याविषयी माहिती मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस. गोरे यांनी केले तर आभार आर.एस. देसाई यांनी मांडले.

निधन वार्ता
मारुती बुगडे

शिरसंगी तालुका आजरा येथील मारुती अप्पा बुगडे ( वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
मारुती बुगडे हे मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष होते. रक्षा विसर्जन मंगळवार दि. २३ रोजी होईल.




