रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५


मुक्ती संघर्ष समितीच्या लढ्याला यश…
कामांसंदर्भात लेखी पत्र

भारतनगरमधील प्रश्नांसाठी संघर्ष मोर्चा काढून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते .त्या लढ्याला अखेर यश आलेले आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाने लेखी पत्र आंदोलनाच्या मंडपात येऊन राकेश चौगुले प्रशासकीय अधिकारी आजरा नगरपंचायत यांनी दिले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही लेखी पत्र दिलेले आहे.त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यामध्ये नगरपंचायत आजरा यांनी शिल्लक राहिलेल्या निधीत व पुन्हा येणाऱ्या निधीमध्ये भारत नगर मध्ये आवश्यकतेनुसार प्राधान्य क्रमाने कामे केली जातील असे लेखी आश्वासन दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर झालेली कामे ताबडतोब करण्यात येतील यामधील प्राधान्य क्रमाने मेन गटर्स बांधून बांधण्याचे काम मे महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल व राहिलेली मंजूर कामे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येतील. असे लेखी पत्र आंदोलनाच्या स्थळी येऊन पंकज सुर्वे सहाय्यक अभियंता यांनी मुक्ती संघर्ष समिती व भारत नगर मधील लोकांना दिलेले आहे. जोपर्यंत भारत नगर मधील सर्व कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आता मात्र हा लढा तात्पुरता स्थगित केला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या विरोधात मुक्ती संघर्ष समिती व भारतनगर मधील रहिवाशांच्या वतीने निषेध व्यक्त करून या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हासंघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर, खुद्बुद्दीन तगारे, तौफिक माणगावकर, गुलाब शिकलगार, यासिन सैय्यद, शगुफ्ता शेख, चांगुणा सुतार, नाजूकबी मुल्ला, मुदस्सर इंचनाळकर, पापा लतीफ, रहीम लतीफ, असिफ काकतिकर, मुफिद काकतिकर, रहुफ नसरदी, रशीद लाडजी, शौकत पठाण, म्हमदू नसरदी, सलीम ढालाईत, संगीता सुतार, रेश्मा काकतिकर, शबाना काकतिकर, रुकैय्या तगारे, सालिया सैय्यद, मुमताज शेख, सानिया माणगावकर, जरीना नसरदी, हिना नाईक, फरजाना नसरदी आदि उपस्थित होते.

चीया सीडस् पिकाचा देवर्डे येथे यशस्वी प्रयोग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले पैसे मिळवून देणारे आणि औषधी गुणधर्म असलेल्या चीया सिडस् वा पिकाचा देवर्डे येथील शेतकरी निवृत्ती कांबळे यांनी यशस्वी प्रयोग केला आहे. मेक्सीकोमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येणाऱ्या या पिकाला जगभर मागणी आहे. आपल्या भागातही हे पिक चांगल्या पद्धतीने येत असल्याने शेतकऱ्यांना हे पिक वरदान ठरेल असा विश्वास शेतकरी कांचळे यांनी व्यक्त केला. तर या पिकाची लागवड तालुक्यात वाढविण्यासाठी आजरा तालुका शेतकरी मंडळ पुढाकार घेणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी सांगितले. शेतकरी मंडळाचे सदस्य व शेतकऱ्यांनी कांबळे यांच्या शेतावर भेट देऊन या पिकाची पहाणी केली.
रब्बी हंगामात हे पिक घेतले जात असून तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पिक येते. त्यामुळे तालुक्यात भात कापणी नंतर हे पिक घेणे शक्य आहे. थंड हवामानात या पिकाची चांगली वाढ होते. चांगल्या तसेच हलक्या जमिनीतही हे पिक घेता येते. चांगली रोगप्रतिकार शक्ती या पिकामध्ये असून विविध आजारावरील औषधे बनविण्यासाठी या पिकाचा वापर केला जातो. या पिकाच्या पानांना उग्र वास येत असल्याने कोणतेही पाळीव अथवा वन्यप्राणी याला तोंड लावत नाहीत. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून या पिकाचे नुकसान होत नाही. रब्बी हंगामात उसासह इतर पिकांच्या सभोवताली हे पिक घेतले तर हे पिक इतर पिकांचेही वन्यप्राप्यांपासून निश्चितपणे संरक्षण करेल असे मतही कांबळे यांनी व्यक्त केले.
आजरा तालुका शेतकरी मंडळाचे सदस्य जयसिंग नार्वेकर, संभाजी इंजल, ए. के. पावले, सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबईचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांबळे यांच्या शेतावर भेट देऊन या पिकाची पहाणी केली.

सर्वच सभासदांना साखर मिळावी…
सुनील शिंदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्याच्या दहा हजार व पंधरा हजार रुपये सभासद असणा-या सभासदांना साखर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच बिगर सभासद ऊस उत्पादकांना त्यांनी पाठवलेल्या ऊसाच्या टनेजप्रमाणे साखर देण्याचे जाहीर केलात ही बाब कौतुकास्पद आहे. पण जे सभासद पाच हजार किंवा त्या पेक्षा कमी भाग भांडवलाचे आहेत आणि ते ऊस उत्पादक सुद्धा आहेत तसेच साखर कारखाना उभारणी मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे आणि दर पाच वर्षांनी येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीत उत्पादक सभासद म्हणून यादीत येतात, ‘अ’ वर्ग सभासद म्हणून मतदानास येतात अशा सभासदांचा शेअर्स पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे म्हणून त्यांना साखरेपासून वंचित ठेवणे हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे.
तरी अशा सभासदांना सुद्धा कमीत कमी पंधरा किलो साखर देण्यात यावी अशी मागणी सभासद सुनील शिंदे यांनी केली आहे.
सर्वांना समान न्याय द्यावा, नाही देता आला तरी पाच हजार किंवा त्यापेक्षा कमी शेअर्स धारकांना पंधरा किलो साखर द्यावी ही विनंती.
झालेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा कारखान्याच्या उभारणीसाठी आपल्या घरातील दागिने, जमीन तारण ठेवून ज्यांनी हा कारखाना उभा केला आणि ते आपला ऊस आजरा कारखान्यालाच घालतात त्यांचे शेअर्स भांडवल आज पाच हजार च्या आतमध्ये आहे. म्हणून त्यातील बऱ्याच सभासदांना साखरेपासून वंचित ठेवणे हे भविष्यात कारखान्याच्या हिताच्या दृष्टीकोणातून अत्यंत धोकादायक आहे. कदाचित ते येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपण दिलेल्या वागणुकीचा मनात राग घेवून आपला ऊस इतर कारखान्याकडे वळवतील तर त्या पासून होणारा धोका व तोटा आपण कोणीही थांबवू शकणार नाही. तेव्हा या विषयावर संचालक मंडळाने विशेष बैठक तत्काळ लावून गांभीर्याने विचार करून कारखान्याच्या व सभासदांच्या हिताचा निर्णय घ्यावा व सर्व सभासदांना साखर द्यावी असे शिंदे यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.

निधन वार्ता
शंकरराव भाईंगडे

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन व उत्तूर गावचे माजी उपसरपंच श्री शंकरराव बापुसो भाईगडे याचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तर मुक्कामी त्यांच्यावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

मलिग्रे येथील भावेश्वरी दूध संस्थेचे बुधवारी उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री भावेश्वरी सह. दूध व्याव. संस्था मर्या, मलिग्रे या नवीन दूध संस्थेचे उद्घाटन श्रीमती अंजना रेडेकर ,संचालिका, गोकूळ दूध संघ यांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री. सतेज उर्फ बंटी पाटीलसोो , जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस यांच्या हस्ते व श्री. मुकूंददादा देसाई अध्यक्ष,साखर कारखाना यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ६.०० आयोजित केला आहे अशी माहिती मुख्य प्रवर्तक श्री. शंकर नेसरीकर व श्री. अशोक तर्डेकर संचालक, आजरा कारखाना यांनी दिली.

बांबू उत्पादक शेतकऱ्यांशी डॉ. प्रमोद कुमार यांनी साधला संवाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बांबू उत्पादक शेतकऱ्याशी डॉ. प्रमोद कुमार यांनी साधला संवाद
केंद्र सरकार कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी विकास व ग्रामिण परिवर्तन या केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. प्रमोद कुमार, सहाय्यक संशोधक डावे. विलास जाधव भेट दिली. संकेश्वर (ता. हुक्केरी) येथील वनपाल राजू पाटील त्यांच्यासोबत होते. डॉ .प्रमोद कुमार म्हणाले, इतर नगदी पिकांपेक्षा बांबू या पिकातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते. त्यासाठी केंद्रशासनाच्या कृषी मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. बांबू पिक अधिक असलेली आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा अभ्यास करण्यात येत आहे. बांबू उत्पादक शेतक-यांशी चर्चा करून याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्हयातील आजरा तालुक्यात बांबूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
याबाबत तालुक्यातील पेरणोली, आजरा येथील शेतकऱ्यांशी संशोधकांनी चर्चा केली.केंद्र सरकारकडून बांबू पिकाला नगदी पिकाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकार कृषी मंत्रालय अंतर्गत कृषी विकास व ग्रामीण परिवर्तन या केंद्राचे मुख्य संशोधक सहायक संशोधक डॉक्टर विलास जाधव यांनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची चर्चा करून संवाद साधला.
यावेळी आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, उद्द्योजक महादेव पोवार, दत्ता पाटील, हर्षद देसाई, रोहीदास दारुडकर यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा झाली.

आजऱ्यात संत गोरोबा पुण्यतिथी उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कुंभार गल्ली, आज़रा यथे भक्तिभावाने व उत्साहाने संत गोरोबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त भजन लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा नृत्य स्पर्धा महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी सुधीर कुंभार, आनंदा कुंभार,लक्ष्मण कुंभार, सुरेश कुंभार, सौ.सुरेखा फडके, सौ.स्मिता कुंभार यांच्यासह कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




