mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.८ डिसेंबर २०२४              

लाटगाव येथे अतिसार …?

२२ रुग्ण आढळले


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     लाटगाव (ता. आजरा) येथे अतिसार सदृश्य २२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसात या रुग्णांनी खासगी व सरकारी दवाखान्यात उपचार घेतले आहेत.

      वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आररोग्य पथक गावात तळ ठोकून आहे.काल गावात रॅपीड सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ६ रुग्ण आढळले.गेल्या दोन दिवसापासून गावात अतिसार सदृश्य रुग्ण मिळू लागले. यामध्ये कांही जणांनी खासगी तर काहीना सरकारी रुग्णालयात उपचारला दाखल केले होते. आरोग्य विभागाकडून १६ रुग्ण आढळले असल्याचे सांगितले जात असून आजरा येथील स्थानिक रुग्णालयामध्येही कांही रुग्णांनी उपचार घेतले आहेत. हा आकडा २२ पर्यंत असल्याचेही समजते.

    काल आरोग्य विभागाच्या पथकाने लाटगाव येथे सर्व्हेक्षण मोहीम राबवली. यामध्ये सहा जण आढळले. त्यांची माहीती घेण्यात आली. काही विद्यार्थी शिर्डी येथून सहलीवरून परतले आहे. स्थानिक यात्रा झाल्याने व अन्न पदार्थ व पाण्यातून बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी आरोग्य विभागाचे चार पथके गावात सर्व्हेक्षण करून गाव पातळीवर उपचार देण्यात येणार आहे.

       पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे संस्कार वाहीनीवरून आवाहन केल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र गुरव सांगीतले.

स्थानिक पाण्यामुळे गावकऱ्यांना त्रास…?

    लाटगाव येथील स्थानिक पाणीपुरवठा योजनेला गळती लागून दूषित पाणी या पाण्यामध्ये मिसळल्याने सदर प्रकार घडला असल्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

ऋतुजा तेऊरवाडकर हिचा सत्कार

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कु. ऋतुजा सुनिल तेऊरवाडकर हिची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कॅनॉल इन्स्पेक्टर व जिल्हा न्यायालय पुणे येथे लिपिक पदावर निवड झालेबद्दल श्रीमंत गंगामाई वाचनालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत , उपाध्यक्षा विद्या हरेर. कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, विनायक अमाणगी, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कॉडुसकर सौ. रंजना तेऊरवाडकर, बाळकृष्ण दरी, महादेव गवंडळकर, प्रसाद तिप्पट, बाळासाहेब कांबळे, कार्तिक गुरव, माधुरी गवंडळकर, मधुरा पंडित, निखिल कळेकर, महादेव पाटील उपस्थित होते.

      सामान्य कुटुंबातील ऋतुजा हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यांग निधीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दिव्यांग कल्याण कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींकरीता ५ टक्के राखीव निधीचे वाटप करण्यात येणार आहे., यासाठी आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग नागरीकांनी आपली कागदपत्रे आजरा नगरपंचायत प्रशासनाकडे जमा करावीत, असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी केले आहे.

      गेल्या आर्थिक वर्षात आजरा नगरपंचायतीकडे शहरातील १०२ – पात्र लाभार्थ्यांची नोंद झाली होती.या सर्व लाभार्थ्यांनी सन २०२४- २५ या आर्थिक वर्षातील लामाकरीता स्वयंघोषणापत्र, डिजिटल दिव्यांग प्रमाणपत्र, बैंक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे १८ डिसेंबर पूर्वी नगरपंचायत कार्यालयात सादर करावीत.

      याबरोबरच नव्या दिव्यांग व्यक्तींनी किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग नागरिकांनी डिजिटल प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता
सुरेश देसाई

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गांधीनगर, आजरा येथील सुरेश बाबू देसाई (वय ६९ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. आजरा येथील आठवडा बाजाराच्या ठेका बरीच वर्षे त्यांच्याकडे होता.

मारुती चौगुले

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हात्तीवडे तालुका आजरा येथील रहिवासी व आजरा तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी मारुती महादेव चौगुले (वय ७४ वर्षे )यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!