mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


पावसाचा जोर ओसरला
पडझड कायम

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर थोडा ओसरला असून मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस असल्याने नद्या अद्यापही पात्रा बाहेरच आहेत साळगावसह किटवडे,गजरगाव बंधारे पाण्याखालीच आहेत.

      प्रचंड पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत पोलसह घरे,झाडे यांची पडझड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. याचा फटका विशेषत: ग्रामीण भागात बसत असून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

     आजरा मंडलमध्ये गेल्या २४ तासात ३० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सुमारे २०० घरांची पडझड झाली आहे. वडकशिवाले येथील प्राथमिक शाळेचे स्वच्छतागृह व भिंत कोसळून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

     प्रशासनाच्या वतीने नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांसह आजरा शहरातील नदीकाठच्या वस्त्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

शासनाच्या जाचक अटींमुळे धनगरवाड्यावरील लोकांचे जगणं मुश्किल : संजय वाघमोडे
एक वही समाज बांधवासाठी…  उपक्रम

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका आणि वन विभागाच्या अडमुठेपणामुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणं मुश्किल झाले आहे असे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितले ते एक वही समाज बांधवांसाठी… दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी… या उपक्रमांतर्गत आवंडी विद्यामंदिर शाळा नं १ येथे शैक्षणिक साहित्य वाटप आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बी आर सी चे नामदेव माने,आवंडी नं १ चे मुख्याध्यापक सोन्ने ३ नं चे कोकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

     ते पुढे म्हणाले,धनगरवाडे सह्याद्रीच्या कुशीत आणि जंगल हद्दीत हजारो वर्षापासून आहेत. त्यांना आज पर्यंतच्या राजे महाराजे, इंग्रज या सत्ताधाऱ्यांनी संरक्षण दिले राजेशाही, मोगलाई किंवा इंग्रजांच्या काळात ही त्यांच्या स्वातंत्र्याला कधी धक्का लागला नव्हता. जंगलामधील वाळलेली लाकडे, करवंदे,जांभळे यासारखे रानमेवा विकून धनगर बांधव उदरनिर्वाह करायचे. वाळलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करून मोळी बांधून महिलां चालत जाऊन शहरात विकुन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसार चालवायचे. परंतु देश स्वतंत्र झाला आणि धनगरवाडे मात्र पारतंत्र्यात गेले.आजही अनेक धनगरवाडे वनहद्दीत असल्याने वन अधिकारी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देतात. तिथे रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या मुलभूत सुविधाही पोहचलेल्या नाहीत. पाळीव जनावरे वन्यप्राण्यांनी मारले तर नुकसान भरपाई देण्याचे टाळतात.वाळलेल्या फांद्या गोळा करून ठेवल्या तर त्या पेटवून देतात.रानमेवा गोळा करू देत नाहीत.यामुळे धनगर वाड्यावरील लोकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याला वैतागून अनेक लोक धनगरवाडे सोडून निघून जात आहेत. त्यामुळे धनगरवाडे ओस पडायला लागलेले आहेत. धनगर वाड्यावरील धनगर बांधव गेले कुठे? हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.

     सोन्ने बोलताना म्हणाले, संजय वाघमोडे यांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. वाघमोडे धनगर वाड्यावरील समाज बांधवाशी चर्चा करून त्यांना अडीअडचणी मदत करुन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात.

      बी आर सीचे नामदेव माने म्हणाले, धनगर वाड्यावरील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ते विद्यार्थ्यांना गेले दहा वर्ष एक वही समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण अर्धवट सोडायला लागू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर ते धनगर वाड्यावरील आपल्या बांधवांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. मिळालेल्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण करावे.

     यावेळी यशवंत क्रांती चे जगन्नाथ कोकरे, ज्ञानदेव फाले, बीआरसीचे नामदेव माने, अरविंद कापसे , तुकाराम तरडेकर, मुनाप उत्तरकर, शामराव गुरव राजाराम नाईक सोन्नै,इ.शिक्षक,सुनिता बाबु गावडे,लक्ष्मी गंगाराम गावडे,सरिता रामचंद्र गावडे,कमल़ कोकरे, मंगल येडगे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते.

आम. सतेज पाटील व खा.शाहू छत्रपती यांचा आज आजरा दौरा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आमदार सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज हे आज रविवारी सकाळी १० :०० वाजता व्यंकटराव हायस्कूल आजरा (सिमला मैदान) येथे तालुक्यातील पूरबाधित नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.

      यावेळी पूरबाधित नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

निधन वार्ता…
श्रावण देसाई


        शिरसंगी येथील रहिवासी श्रावण बळीराम देसाई (वय ६८ वर्षे) यांचे मुंबई येथे निधन झाले.

      त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.शिरसंगी येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेचे व्हा चेअरमन भीमराव देसाई/ सडेकर यांचे ते पुतणे होत.

शकुंतला चौगुले

    शिरसंगी ता. आजरा येथे वास्तव्यास असणा-या शकुंतला उर्फ सखुबाई पांडुरंग चौगुले (वय ७२ वर्षे मुळगाव पोश्रातवाडी ता. आजरा) यांचे निधन झाले.
महादेव खवरे यांच्या त्या बहीण होत.


 

संबंधित पोस्ट

Ground Report

mrityunjay mahanews

बेपत्ता तरुणाचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

आजऱ्याचे माजी सरपंच मनोहर फळणीकर यांचे निधन…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!