mrityunjaymahanews
अन्य

जिल्हा बँकेसाठी आज मतदान… आजऱ्यात चराटी व देसाई यांच्यात चुरशीची लढत…. अनाथांची ‘माय’गेली

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकरीता आज मतदान : आजरा तालुक्यात काटातोड लढत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरिता आज मतदान होत असून आजरा तालुक्यामध्ये विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी व राष्ट्रवादीचे सुधिर देसाई यांच्यात थेट लढत होत आहे. गेले सहा महिने या निवडणुकीची चराटी व देसाई यांनी जोरदार तयारी केली आहे.ही निवडणूक ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने घेतल्याने देसाई यांच्या माध्यमातून चराटी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या तीन दिवसात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दोनदा आजरा येथे भेट देऊन स्वतः निवडणूक मतदानाची माहिती घेत देसाई यांच्या विजयाचा दावा केला आहे.या निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने आजरा तालुक्यात सह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. आजरा तालुक्याकरीता येथील उर्दू हायस्कूलमध्ये मतदान होत आहे .

      ‘अनाथांची’ माय ‘सिंधुताई सपकाळ  यांचे निधन

‘अनाथांची माय ‘ अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी पुणे येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पद्मश्री सिंधुताई यांच्या निधनाने महाराष्ट्राने ‘माई’गमावली आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

आजरा पंचायत समिती उपसभापतीपदी सौ. वर्षा कांबळे

आजरा पंचायत समितीच्या नुतन उपसभापतीपदी सौ वर्षा प्रकाश कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बागडी यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत सौ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिरीष देसाई, तहसीलदार विकास अहिर, बशीर खेडेकर, रचना होलम, वर्षाताई बागडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजरा येथील वन विभाग वतीने  ‘वन्य प्राण्यांबरोबर कसं जगायचं ‘याबाबत प्रशिक्षण व्याख्यान

आजरा. प्रतिनिधी

आजरा येथील वन विभाग वतीने आयोजित केलेल्या हत्ती व अन्य वन्य प्राणी संघर्ष यावर आजरा अण्णा – भाऊ सभागृह येथे कार्यक्रम संपन्न झाला.
मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा कधीतरी थांबला पाहिजे चंदगड,,आजरा, आणि गडहिंग्लज भागातील हत्तीचा व चिंतेची बाब असून हत्ती बरोबर इतर जंगली प्राण्यांचा प्राण्यांच्या बरोबर कसं जगायचं हे शिकले पाहिजे याबाबतची माहिती गजमित्र म्हणून सुप्रसिद्ध असलेले ‘ ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशन’चे संस्थापक आनंद शिंदे यांनी याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रामुख्याने लोकांना हत्तीशी व इतर प्राण्यांची वागण्याचे प्रशिक्षण देणे, हत्तीचे आवडते व नावडते अन्न कोणते, शेतकरी बंधूनी शेतात व घराजवळ कोणत्या वनस्पतीची लागवड करावी, हत्तींच्या संपूर्ण कुटुंबातील माहिती, हत्तींचे मानव प्राप्त व्यवहारात वागणूक बौद्धिक क्षमता राग – प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, आपण हत्तीचा वावरत असणाऱ्या भागातून जाताना घ्यावयाची काळजी अचानकपणे समोर आलेल्या हत्तीचा हत्तीला समोर कसे जावे या बद्दल संपूर्ण माहिती व प्रशिक्षण बाबतची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण पर व्याख्यान ना मुळे हत्तीच्या बाबतीत ज्ञान वाढेल व गैरसमज दूर होऊन लोक आपल्या कुटुंबाचे व शेत पिकाचे संरक्षण करण्यास सक्षम होतील यासाठी सदर हत्ती व इतर वन्य प्राण्या बरोबर कसं वागायचं यासाठी प्रशिक्षण पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आर. आर. काळे उप.वन निरिक्षक कोल्हापूर, एन एस कांबळे साह. वनरक्षक कोल्हापूर, स्मिता डाके वन परिक्षेत्र अधिकारी आजरा, संतोष शिंदे अर्जुन रिफायरीज. गडहिंग्लज. सह वन विभाग आजरा कर्मचारी आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

……

महाराष्ट्र लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर…

 

कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ…

 

शाळा महाविद्यालय बंद होणार…

 

निर्बंधही कठोर करण्याची शासनाची भूमिका…

 

कोल्हापूर जिल्ह्यातही रुग्ण आढळू लागल्याने जिल्हावासीयांना धोक्याचा इशारा…

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई

mrityunjay mahanews

सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्याचे काम आम. आबिटकर यांनी केले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!