mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि.१८ नोव्हेंबर २०२४               

आज जाहीर प्रचार थंडावणार…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस सुरू असणारे जाहीर प्रचाराचे वादळ आज थंडावणार असून आज शेवटच्या दिवशी उमेदवारांकडून प्रचार यात्रांचे नेटके आयोजन करण्यात आले आहे.

      महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता आजरा शहरातून प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. सदर प्रचार फेरीची सुरुवात तहसील कार्यालय येथून होणार आहे.

      महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारार्थ भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ,आजरा येथून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात येणार आहे.

     सोशल मीडियासह प्रिंट मीडियावर गेले पंधरा दिवस सुरू असणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांना आज पूर्णविराम मिळणार आहे

स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय, आजरा येथे शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृती अभिवादन केले.

      यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

       याप्रसंगी ओंकार माद्याळकर, युवराज पोवार,रवी यादव, चंदर पाटील, इमाम चांद, सागर नाईक, महेश पाटील, सौरभ पाटील, संजूभाई सावंत इम्तियाज माणगावकर यांच्या शिवसैनिक उपस्थित होते.

गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन सामंत, विद्या हरेर उपाध्यक्षा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन दत्तात्रय सामंत, तर उपाध्यक्षपदी वि‌द्या परशराम हरेर यांची एकमताने निवड झाली. मावळते अध्यक्ष अशोक बाचूळकर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सन्नागार समितीचे प्रमुख अशोक चराटी प्रमुख उपस्थित होते. कार्यवाहपदावर कुंडलिक सदाशिव नावलकर, तर सहकार्यवाह पदी रविंद्र बाळाप्पा हुक्केरी यांची निवड झाली आहे.

      या वेळी कार्यकारणी सदस्य संभाजी इंजल, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, बंडोपत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ .अंजनी देशपांडे , सुचेता गड्‌डी, गीता पोतदार उपस्थित होते.

सुमन सावंत यांना पीएचडी


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता.आजरा येथील सुमन आंनदा सावंत यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

      शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ इन्टरॅकशन ऑफ आयोनायझिंग रेडिशन ऑन आरजीओ- पानी नॅनोकंपोसिट फॉर सुपरकॅपॅसिटर ऍप्लिकेशन ‘ या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले.

आजरा तालुक्यातील सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा यांच्या माध्यमातून पंढरपूर येथील गजानन महाराज मठाच्या वतीने, दहा टाळ, पकवाज, विना, ज्ञानेश्वरी, तुकाराम, गजानन महाराज अशा तीन गाथा असे भजनी साहित्य आजरा तालुक्यातील मेंढोली, हारूर, सरबंळवाडी, कानोली, सरोळी, वाटंगी, किणे, मोरेवाडी, कासार कांडगाव, मसोली, लाटगाव, आवंडी, मुंगूसवाडी, शेळप, आंबाडे, किटवडे इत्यादी सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप कार्यक्रम पंढरपूर येथे संपन्न झाला.

     यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा चे अध्यक्ष हभप गौरव सुतार उपाध्यक्ष हभप संतू कांबळे, कोषाध्यक्ष कोडिंबा आडे, जिल्हा प्रतिनिधी राजाराम जाधव, सदस्य पांडूरंग पाटील, नामदेव सुतार, पुंडलिक गुरव, बाळासाहेब सुतार, गंगाराम येडगे, लक्ष्मण शिंत्रे, कल्पना जाधव, कलावती गुरव याच्यासह तालुक्यातील भजनी मंडळ व वारकरी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निंगुडगे येथे मारहाणीत एक जखमी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!