mrityunjaymahanews
अन्य

अजातशत्रू ‘ दादा ‘

मंगळवार दि.१९ नोव्हेंबर २०२४               

अजातशत्रू ‘दादा ‘

    जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ते जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, आजरा साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य अशी वाटचाल करत सोबत येईल त्याला घेऊन राजकीय व सामाजिक वाटचाल करणाऱ्या मुकुंदराव देसाई यांचा आज वाढदिवस…

      वास्तविक जिल्हा बँकेत नोकरीत असताना राजकारणापासून अलिप्तता बाळगणारे मुकुंददादा यांच्यावर नोकरीपासून बाजूला होताच त्यांच्यावर अनपेक्षितरित्या विविध जबाबदाऱ्या पडत गेल्या. जिल्हा परिषदेचे सदस्यपद असो, आजरा साखर कारखान्याचे संचालक पद असो अथवा अडचणीत असणाऱ्या जनता बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी असो मुकुंददादा यांनी या सर्वच ठिकाणी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवले.

    आपली राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू असताना आजरा तालुक्यातील शांत व संयमी नेतृत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व, सहकारातील अभ्यासू अशी प्रतिमा त्यांनी जपली.तालुक्याचे माजी ज्येष्ठ नेते स्वर्गीय बळीरामजी देसाई यांचा संपन्न राजकीय व सामाजिक वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला आहे ‌

     ​मध्यंतरी अडचणीत असणाऱ्या जनता बँकेला केवळ अडचणीतून बाहेरच काढले नाही तर बँकेत पूर्ण वेळ लक्ष घालून बँकेला मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. बँकेच्या कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. बँकेच्या सभासदांनी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून मुकुंददादांवरील विश्वास सिद्ध करून दाखवला आहे.

     कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. तसेच ते आजरा शेतकरी साखर कारखान्यात संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर सुरू असणाऱ्या पक्ष बदलाच्या वादळात ते ठामपणे राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. अलीकडे त्यांच्या वक्तृत्वातही त्यांचा राजकीय सामाजिक परिपक्वतेचे दर्शन घडल्याशिवाय रहात नाही. तालुक्याचे दुसरे नेते अशोकअण्णा चराटी व त्यांच्यातील मैत्री संबंध म्हणजे दोन परस्परविरोधी विचारांचा अनोखा संगम म्हणावा लागेल. अनेकदा ते परस्परांविरोधात निवडणुकांना सामोरे गेले परंतु मैत्रीला तडा जाऊ दिला नाही.

     कोणताही निर्णय घेत असताना शांत व संयमपणा ते नेहमीच दाखवत असतात. यामुळेच दादांचा शब्द म्हणजे ‘ प्रमाण ‘ असे समीकरण बनले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद व वैचारिक उंची असणाऱ्या या समाजमान्य नेत्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

               …ज्योतिप्रसाद सावंत

प्रचाराला पूर्णविराम…
प्रचार फेऱ्यांनी शहर दणाणले

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आजरा शहरातून महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्यासह महायुतीच्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या प्रचार फेऱ्यांनी शहर दणाणून गेले. प्रचार फे-यांद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

      महायुतीचे प्रकाश आबिटकर यांची प्रचार फेरी व्यंकटराव हायस्कूल समोरून सुरू करण्यात आली तर महाविकास आघाडीचे के.पी. पाटील यांची प्रचार फेरी भगवा रक्षक चौकातून सुरू करण्यात आली.

      दोन्हीही प्रचार फेऱ्यांमध्ये प्रमुख स्थानिक नेत्यांसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार फेऱ्यांची सांगता झाली.

तालुक्यातील १३७ केंद्रावर होणार मतदान
८२२ कर्मचारी तैनात

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यात विधानसभेसाठी १३७ मतदान केंद्रावर बुधवार (ता. २०) मतदान होत आहे. निवडणुक विभाग व पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या मतदान केंद्रावर ८२२ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. आज सायंकाळी पाच प्रचार थांबला

      मतदार संघ पुर्नरचनेत तालुक्याचे तीन विधानसभा मतदार संघात विभाजन झाले आहे. यामध्ये चंदगड विधानसभा मतदार संघ (२७१) ४२ मतदान केंद्र आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघ (२७२) ४८ मतदान केंद्र तर कागल विधानसभा मतदार संघ (२७३) ४७ मतदान केंद्र आहेत. सर्वात जास्त मतदार असलेली चार मतदान केंद्र आहेत. यापैकी आजरा शहरात मतदार संख्या मोठी असल्याने येथे १५ मतदान केंद्र आहेत. उत्तुर मध्ये १० मतदान केंद्र आहेत. भादवण, मडिलगे येथे ४ मतदान केंद्र आहेत. बहिरेवाडी येथे ३ मतदान केंद्र आहेत. एक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तीन, शिपाई असे पाच कर्मचारी मतदान केंद्रावर असतील. पोलीस बंदोबस्तासाठी एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा मतदान विशेष…

एकूण मतदार संघ – १०
एकूण मतदान केंद्रे – ३४५२

जिल्ह्यात दहा महिला व दहा दिव्यांग केंद्रे

मतदानाची वेळ – बुधवार दिनांक २० रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत

प्रमुख पक्ष व उमेदवारांची संख्या

काँग्रेस – ०४

राष्ट्रवादी काँग्रेस – (एस पी) 

शिवसेना ( उबाठा २)

काँग्रेस पुरस्कृत – १

शिवसेना (शिंदे)- ३

भाजपा- २

राष्ट्रवादी (अजितदादा)-२

जनसुराज्य – ४

शिवसेना पुरस्कृत -१

दहा मतदारसंघातील एकूण उमेदवार संख्या – १२९

एकूण मतदार – ३३ लाख ५ हजार ९८

जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार १६ लाख ६९ हजार २७९

महिला मतदार १६ लाख ३५ हजार ४६३

 

 

संबंधित पोस्ट

Ground Report

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल

mrityunjay mahanews

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews
error: Content is protected !!