mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजरा तालुक्यात अतिवृष्टी…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यामध्ये काल रविवारी तुफानी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाच्या सरी कोसळतच होत्या. आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात ७४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे समजते.

     रविवारी तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तर अखंडपणे पाऊस सुरू होता.  नद्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली आहे.

   पावसामुळे दिवसभर वीज पुरवठा खंडित होत होता तर ठीक ठिकाणी झाडे व घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तालुक्यातील सर्वच पाणी प्रकल्पांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. चित्री मध्यम प्रकल्पामध्ये ६६.७६% इतका पाणी साठा झाला आहे. आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये ८४ टक्के इतका पाणीसाठा झाला असून एरंडोळ व धनगरवाडी लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर खानापूर लघु प्रकल्पामध्ये ४९% इतका पाणीसाठा झाला आहे. सर्फनाला प्रकल्पामध्ये ४०.५९% इतका पाणीसाठा झाला असून धरण क्षेत्रात ९९.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

     तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असली तरीही समाधानकारक पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात असून शेतकरी वर्ग पावसामुळे सुखावला आहे.

वर्षा पर्यटक वाढले...

     काल आठवडा सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी मंडळी वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडलेली दिसत होती. रामतीर्थ परिसरामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

तालुका भाजपातर्फे माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्याची मोहीम

     आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याचे शिबिर भाजपा कार्यालयात उत्साहात संपन्न झाले.

     यावेळी ८० महिलांनी प्रत्यक्ष येऊन फॉर्म भरले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष अभिजित रांगणेकर,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रुपेश परीट, शहर अध्यक्ष शुभम पाटील, सरचिटणीस राहुल पेंडसे यांनी फॉर्म संभाव्य लाभार्थ्यांचे भरले.

      यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध(बाळ)केसरकर, भास्कर पेंडसे, मयूर बांदेकर, गौतम भोसले, सुरज पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी कै. केदारी रेडेकर रुग्णालयाचा पुढाकार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज यांच्या वतीने पंढरपूरला दर्शनाला निघालेल्या आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध केले आहे.मु. पो. वाखरी ता. पंढरपूर येथे पुढील दोन ते तीन दिवस ही वैद्यकीय पथक थांबणार आहे तरी भागातील सर्व दिंड्यातील वारकऱ्यांनी आरोग्य विषयक काही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा असे आवाहन अनिरुद्ध रेडेकर यांनी केले आहे.

      या सेवेचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध असणारे वैद्यकीय सेवक व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :-
डॉ.अच्युत गुरव 8999022609
डॉ.आदित्य बागल 9960720344
डॉ.प्रथमेश कुंभार 7666004655
डॉ.राहुल सुतार 9309955904
डॉ.पराग जाधव 8605687187
डॉ.विशाल कवडे 9011793771
डॉ.अनंत चव्हाण 8329312004
डॉ.वैभव मदने 9657985225
डॉ.श्रीराम सावंत 9284856346
डॉ.स्वप्नील पवार 9067524656
डॉ.सुशांत चौगुले 8788224211
डॉ.गोपाल जाधव 9834619434
डॉ.अमेय तांदळे 7588113279
डॉ.प्रवीण गणगे 9604414390


 

संबंधित पोस्ट

अखेर पेरणोली-हरपवडे धनगरवाडा “प्रकाश’मय

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews

लातूरच्या ट्रक ड्रायव्हरचे पंधरा हजार रुपये व मोबाईल अज्ञाताकडून लंपास…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!